High and Low Protein Fruits Benefits : आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी शरीरास प्रोटीनची खूप गरज असते. प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन केल्याने स्नायूंना बळकटी मिळते, वजन नियंत्रणात राहते, त्यामुळे आरोग्याचा नीट समतोल राखता येतो. पण, अनेक जण प्रोटीनयुक्त आहाराकडे दुर्लक्ष करतात. विशेषत: प्रौढांना रोजच्या आहारात प्रोटीनची खूप गरज असते. कारण वयोमानानुसार त्यांचे शरीर थकते, अशावेळी प्रोटीनच्या मदतीने त्यांना निरोगी आरोग्य राखता येते. दरम्यान, मांसाहारी पदार्थांमध्येही प्रोटीनचे प्रमाण अधिक असते, पण त्यात चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे अनेक जण मांसाहारी पदार्थ खाणं टाळतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की काही अशी फळं आहेत, ज्यात प्रोटीनचे प्रमाण सर्वात जास्त असते. नेमकं कोणत्या फळांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त आणि कमी असते जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना चेन्नईतील श्री बालाजी मेडिकल सेंटरमधील आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी म्हणाल्या की, फळं सामान्यतः प्रोटीनचे प्राथमिक स्रोत मानली जात नाहीत, परंतु काही फळांच्या जातीमध्ये इतरांपेक्षा जास्त प्रमाणात प्रोटीन असते, ज्यामुळे त्याचे दैनंदिन सेवन केल्यास शरीरात माफक प्रमाणात प्रोटीन मिळू शकते.

कोणत्या फळात असते सर्वाधिक प्रोटीन?

“सर्वसाधारणपणे खाल्ल्या जाणाऱ्या फळांमध्ये पेरू या फळात सर्वात जास्त प्रोटीन असते. शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक पोषक तत्वांसह पेरूमध्ये प्रथिनेही चांगल्या प्रमाणात आढळतात. प्रति १०० ग्रॅम पेरूमध्ये अंदाजे २.६ ते ३ ग्रॅम प्रोटीन असते. तसेच त्यात फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सदेखील भरपूर असते, ज्यामुळे पचनक्रिया, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांच्या मते, दररोज अंदाजे १५० ते २०० ग्रॅम एक मध्यम आकाराचा पेरू खाल्ल्याने शरीरास ४ ते ६ ग्रॅम प्रोटीन आणि आवश्यक पोषक घटक मिळू शकतात. यामुळे पेरूचा आहारात समावेश करणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.

विशेषत: ज्यांना नैसर्गिक स्त्रोतांमधून मिळणारे प्रोटीन, जीवनसत्त्व आणि फायबरचं सेवन करायचं आहे त्यांच्यासाठी पेरू उत्तम फळ आहे.

कोणत्या फळांमध्ये असते कमी प्रोटीन?

दीपलक्ष्मी यांच्या मते टरबूज हे असं फळ आहे, ज्यात सर्वात कमी प्रोटीन असते. प्रति १०० ग्रॅम टरबूजमध्ये फक्त ०.६ ग्रॅम प्रोटीन असते. या फळात भले प्रोटीनचे प्रमाण अधिक नसले तरी ते हायड्रेटिंग आहे, तसेच त्यात जीवनसत्त्वे अ आणि क, पोटॅशियम आणि लाइकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट्ससारखे महत्त्वाचे पोषक घटक आहेत. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्याच्या सेवनाने शरीर हायड्रेट ठेवता येते. विशेषतः उन्हाळ्यात आणि खूप व्यायाम केल्यानंतर टरबूज खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या कमी होते.

दररोज एक ते दोन कप म्हणजे अंदाजे २०० ते ३०० ग्रॅम टरबूज खाल्ल्याने हायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट संतुलन आणि अँटिऑक्सिडंट सेवन वाढू शकते, परंतु तुम्हाला यातून प्रोटीन मिळणार नाही.

फळांच्या दैनंदिन सेवनामुळे शरीरास आवश्यक प्रोटीन्सची गरज भागवली जाऊ शकत नाही, पण पेरूसारख्या प्रोटीनयुक्त फळाने काही प्रमाणात का होईना शरीरासाठी आवश्यक प्रोटीनची मात्रा राखता येते. प्रोटीनयुक्त पदार्थ अधिक खाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी काही पर्याय सुचवले आहेत. तुम्ही दही, काजू, कडधान्य किंवा शेंगदाण्यासह फळांचे सेवन केल्यास प्रोटीनची कमतरता दूर करता येते.

प्रोटीनयुक्त फळं आणि पोषक तत्वांनी युक्त पदार्थांचे एकत्रित सेवन करुन तुम्ही स्नायूंचे आरोग्य, चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवू शकता.