डॉ. सारिका सातव

रोजच्या धावपळीच्या जीवनात अवांतर काहीतरी असतंच. म्हणजे काहीतरी अवांतर घडत असतं. मग त्यात पर्यटन, तंत्रज्ञान, वाहनविश्व, आरोग्यविषयक सल्ला आणि आहार! मग हे सारं वाचण्यासाठी आजपासून ‘अवांतर’सदर.

share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
mother and son died drowning Nashik district,
नाशिक जिल्ह्यात बंधाऱ्यात बुडून मायलेकासह तिघांचा मृत्यू
central cabinet, minimum selling price of sugar
साखरेची किमान विक्री किंमत वाढीचा प्रस्ताव लांबणीवर, केंद्रीय मंत्रिगटाचा निर्णय; साखर उद्योगात नाराजी
sensex drops 663 point nifty ends below 24200
‘मुद्रा’ कर्जांची मर्यादा दुपटीने वाढून २० लाखांवर
Methi Sprouts Benefits
वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत मोड आलेली मेथी आहे फायदेशीर; किती प्रमाणात खावी? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून
A 15 year old girl was saved by advanced treatment in Pune print news
मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचूनही ‘ती’ बचावली! पंधरा वर्षीय मुलीची कहाणी
Painkillers side effects advantage disadvantage overusing painkillers harming your stomach and kidney
डोकेदुखी, पोटदुखी झाली की लगेच पेनकिलर घेताय? अतिवापरामुळे होऊ शकतो आरोग्याला धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

अनुवंशिकता हे जरी महत्त्वाचे कारण असले तरी जीवनशैली आणि आहार हे सुद्धा त्यात मोठय़ा प्रमाणात भर घालणारे घटक आहेत. जास्त चरबी असलेले खाद्यपदार्थ अति प्रमाणात खाणे, फास्ट फूड, अतिरिक्त मिठाचे सेवन, पॅकेट फूड जास्त प्रमाणात खाणे, बैठी जीवनशैली, स्थौल्य, अति ताण, कमी झोप, मैदा, साखर, मद्यपान यांचे अति सेवन, धूम्रपान इत्यादी एक न अनेक कारणांमुळे रक्तदाब सुरू होतो व वाढतो.

हेही वाचा >>> Mental Health Special: डिजिटल लिंगभेद काय असतो?

१) डॅश डाएट

Direct approach to stop hypertension या शीर्षकाद्वारे एक नवीन आहारशैलीचा उगम झाला. या अंतर्गत आहारामध्ये पुढील बदल केले असता रक्तदाबावर उत्तम नियंत्रण ठेवता येते. त्यापासून स्वत:चा बचाव सुद्धा करू शकता. भरपूर प्रमाणात भाज्या, फळे, पूर्ण धान्ये, कमी चरबीचे दूध व दुधाचे पदार्थ, मासे, चिकन, कडधान्य, चांगल्या प्रकारची तेले, बदाम, अक्रोड, तेलबिया इत्यादी पदार्थ आहारात नियमित अंतर्भावित करावे. त्याचबरोबर पुढील पदार्थ आहारातून वर्ज करावे किंवा अतिशय नियंत्रित प्रमाणात खावे.

१)चरबीयुक्त मांसाहार

२) चरबीयुक्त दूध व दुधाचे पदार्थ

३)अति गोड पदार्थ

४) खारट पदार्थ

५) पॅकेज फूड

६) बाटलीबंद पेये इत्यादी

२) मीठ

साधारणता दिवसभराची मिठाची निरोगी मनुष्याची आवश्यकता एक चमचा म्हणजेच पाच ग्रॅम इतकी असते. पण वरून मीठ घेणे, पॅक फुड जास्त घेणे, (प्रीझर्वेटिव्हज सोडियमयुक्त असणे) खारट पदार्थ, उदाहरणार्थ वेफर्स इत्यादी सतत खाणे, फास्ट फूडचा अतिरेक इत्यादी अनेक कारणांमुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते. या अतिरिक्त सोडियममुळे रक्तदाब वाढला जातो, म्हणून हे पदार्थ टाळणे उपयुक्त ठरते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांने मिठाचे प्रमाण दोन तृतीयांश टी स्पून एवढे करावे.

हेही वाचा >>> Health Special: श्रावणात उपास करताय आणि ‘हे’ पदार्थ खाताय?

३) फायबर

चोथायुक्त आहार जास्त प्रमाणात घेतल्याने शरीरातील चरबी व वजन आटोक्यात राहते. पचन प्रक्रिया सुरळीत राहते. भूक नियंत्रणात राहते. कोलेस्ट्रॉल, रक्तवाहिनीमधील चरबी नियंत्रणात राखण्यास मदत होते.  हिरव्या पालेभाज्या, सॅलड, फळे, कडधान्ये, धान्यांचा कोंडा इत्यादी पदार्थामधून फायबर भरपूर  मिळते.

४)पोटॅशियम, मॅग्नेशियम

रक्तदाब नियंत्रणासाठी पोटॅशियम व मॅग्नेशियम अतिशय उपयुक्त आहे. भाज्या फळे यामधून पोटॅशियम, मॅग्नेशियम चांगल्या प्रकारे मिळते. सुकामेवा, विविध प्रकारच्या बिया हे मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहेत.

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात खूप जणांच्या तोंडून एक वाक्य आपण नेहमी ऐकतो, ‘‘बीपी खूप वाढला, रोज गोळय़ा घ्याव्या लागतात.’’ कदाचित या वाक्याला आता काही वयोमर्यादा राहिली नाही. पूर्वी फक्त ४० -५० च्या पुढील मंडळींमध्ये अशा गोष्टींवर चर्चा व्हायची. आता मात्र याला वयोमर्यादा नाही. उच्च रक्तदाबाचा त्रास कुठल्याही वयात सुरू होऊ शकतो आणि वाढू शकतो. रक्तदाब विशिष्ट प्रमाणापेक्षा/ साधारण प्रमाणापेक्षा जास्त वाढणे यालाच उच्च रक्तदाब म्हणतात.

dr.sarikasatav@rediffmail.com