Morning Drinks to Lower Cholesterol Levels: बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे सध्या कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) समस्या वाढली आहे. वाढलेलं कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर समस्या आहे. कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा पदार्थ आहे, जो रक्ताच्या नसांमध्ये आढळतो. कोलेस्ट्रॉल तुमच्या यकृतामध्ये तयार होते, परंतु काही वेळा ते तुम्ही खाल्लेल्या अन्नामुळेदेखील तयार होते. त्यामुळे जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी राखणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत, चांगलं आणि वाईट कोलेस्ट्रॉल. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानं हृदयविकाराचा धोका वाढतो. तर, चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी अनेक लोक विविध उपाय आणि औषध उपचारांचा अवलंब करतात, परंतु तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही बदल करूनदेखील कोलेस्ट्रॉल सहजपणे नियंत्रणात आणू शकता. कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आहारात विविध आरोग्यदायी पेयेदेखील समाविष्ट करू शकता, असे उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी सांगितल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
आहारतज्ज्ञ सांगतात, “निरोगी पेशी तयार करण्यासाठी तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल आवश्यक असते. मात्र, जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल जमा झाले तर त्याचाही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असते : उच्च घनता लिपोप्रोटीन (एचडीएल किंवा चांगले कोलेस्ट्रॉल) आणि कमी घनता लिपोप्रोटीन (एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉल). एचडीएल तुमच्या पेशींचे आरोग्य राखते, तर एलडीएल तुमच्या धमन्यांमध्ये जमा होते, ज्यामुळे तुमच्या हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यासाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी काही पेय फायदेशीर ठरू शकतात”, असे त्या म्हणतात. कोणते पेय प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते ते जाणून घेऊया.
(हे ही वाचा : रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ ४ आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा; फक्त तज्ज्ञांकडून सेवनाची योग्य पद्धत समजून घ्या )
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘ही’ पेये प्या!
१. ग्रीन टी (Green tea)
सिंघवाल यांच्या म्हणण्यानुसार, ग्रीन टी हा अँटी-ऑक्सिडंटचा चांगला स्रोत आहे. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन असतात, जे कोलेस्ट्रॉलची पातळी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्याशी संबंधित आहेत. ग्रीन टी प्यायल्याने एलडीएल आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. ग्रीन टी अँटी-ऑक्सिडेंट गुणांनी भरलेलं असतं, त्यामुळे ते सर्वांगीणदृष्ट्या शरीरासाठी फायदेशीर असतं. ग्रीन टीमध्ये असलेले पॉलिफेनॉल आतड्यात पॉलिफेनॉलचे शोषण रोखतात आणि अवरोधित करतात. साधारण २-३ कप ग्रीन टी तुमच्या शरीरासाठी पुरेसा असतो.
२. हळद टाकलेलं दूध (Turmeric golden milk)
कोलेस्ट्रॉलच्या समस्येवरही हळद अतिशय उपयुक्त आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हळद हा एक असा मसाला आहे, जो रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर जमा होणारा प्लेक कमी करतो आणि नसांमध्ये जमा होणारे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतो. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे सक्रिय संयुग असते, ज्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात आणि कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर सकारात्मक प्रभाव पडतो, असे सिंघवाल यांनी नमूद केले.
३. बीटरूट आणि गाजर रस (Beetroot and Carrot Juice Blend)
सिंघवाल यांनी सांगितले की, बीटरूट आणि गाजरमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि आहारातील फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयाच्या आरोग्यास मदत करतात आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. बीटरूट वजन कमी करण्यासाठी आणि डिटॉक्सिफाय करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यात चरबी म्हणजेच फॅटचे प्रमाण कमी आणि आहारातील फायबरचे प्रमाण जास्त आहे, हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
अशाप्रकारे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वरील सांगितलेली पेय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. परंतु, आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी तुमच्या डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या…