Home Remedies For Fever: ऋतूबदलामुळे सध्या अनेकांची तब्येत बिघडली आहे. अचानक ताप, थंडी भरून येणे, खोकला, नाक वाहणे किंवा स्नायू दुखणे असा अनुभव येत असेल तर ही फ्लूची लक्षणे असू शकतात. ताप- सर्दी ही आपल्याकडे इतकी सामान्य समस्या आहे की त्यामुळे प्रत्येक घरोघरी यावर वेगवेगळे उपाय केले जातात. असाच एक उपाय म्हणजे कच्च्या लाल कांद्याचे तुकडे तळव्यावर ठेवून मोजे घालणे. याविषयी, किरण दलाल, मुख्य आहारतज्ञ, फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटल यांनी हेल्थ शॉट्सला दिलेल्या माहितीनुसार आपण खरोखरच कांदा मोज्यामध्ये ठेवल्यास ताप कमी होतो का हे पाहूया…

कांद्याचे ६ बेस्ट फायदे (6 Benefits Of Eating Raw Onion)

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या माहितीनुसार, कच्चा लाल कांदा खाल्ल्याने पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असलेल्या महिलांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. डॉ. दलाल म्हणतात, फॉलिक ऍसिड, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, बायोटिन आणि तांबे यांनी समृद्ध असलेल्या कांद्यामध्ये आवश्यक पोषक घटक असतात जे शरीराला निरोगी नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात. कांद्याचे आणखी फायदे जाणून घेऊया.

  1. कांद्यामध्येआढळणारे क्वेर्सेटिन हे शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची जोखीम कमी करते.
  2. कांद्यामधील सल्फर इन्सुलिनच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यास मदत करू शकतात आणि उच्च रक्त शर्करा नियंत्रणात आणू शकतात.
  3. कांद्यामधील सल्फर रक्तातील प्लेटलेट्स एकत्रित होण्यापासून थांबवतात ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करते
  4. कांद्यामधील सल्फरमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.
  5. कांदा हा पॉलिफेनॉलचा उत्तम स्रोत आहे. ते अँटिऑक्सिडंट्स म्हणून कार्य करतात जे शरीराला रॅडिकल्सपासून संरक्षण पुरवतात. हे एक अस्थिर रेणू आहेत आणि आपल्या शरीरातील पेशींच्या संरचनेत हस्तक्षेप करून नुकसान करू शकतात. कांद्यामधील अँटिऑक्सिडंट्स या मुक्त रॅडिकल्सला नियंत्रित ठेवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
  6. चांगल्या पचनासाठी कांदा कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, यामुळे पचन चांगले होते. कांद्यामध्ये आढळणारे फ्रक्टो-ऑलिगोसॅकराइड प्रोबायोटिक्स म्हणून काम करतात. ते मोठ्या आतड्यात निरोगी बॅक्टेरिया वाढवून पचनास मदत करतात व कोलन कर्करोगाचा धोका देखील कमी करतात.

हे ही वाचा<< प्रियांका चोप्राने ३० व्या वर्षी Eggs Freeze केली; ‘ही’ प्रक्रिया कशी होते, तुम्हाला याचे फायदे काय? योग्य वय किती?

कांदा मोज्यामध्ये ठेवल्यास ताप कमी होतो? (Can Raw Onion Reduce Flu & Fever)

डॉक्टर सांगतात की, कांद्यामध्ये असलेले सल्फर शरीरात जाऊन बॅक्टेरिया आणि व्हायरस मारतात, असे मानले जाते. अशा प्रकारे, ते रक्त शुद्ध करतात आणि त्यामुळे ताप- सर्दीची लक्षणे नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे तुमच्या मोज्यामध्ये कांद्याचा एखादा काप ठेवून विश्रांती घेतल्यास आराम मिळू शकतो. असे असले तरीही यासाठी कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत.

(टीप: वरील माहिती ही तज्ज्ञांनी सांगितली असली तरी घरगुती उपचार आहे, गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवश्य घ्या)