High Protein Breakfast Ideas : तुम्ही पोटावरची चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात? तर यासाठी विशेषत: नाश्त्यासाठी तुम्ही काय खाता हे पाहणं गरजेचं आहे; तर फिटनेस तज्ज्ञांच्या मते, ३० ग्रॅमपेक्षा कमी प्रोटीन घेणे तुमच्या शरीरासाठी पुरेसे नाही, हे फिटनेस कोच चेस चेंबर्स थ्रेड्सने सोशल मीडियावर काही सोप्या समीकरणांसह समजावून सांगितले आणि दोन अंडी खाणे हा भरपूर प्रोटीन असणारा नाश्ता (High Protein Breakfast) नाही तर त्याऐवजी तुम्ही पुढील पर्याय निवडले पाहिजेत.

१. २ अंडी + एक कप अंड्याचा पांढरा भाग
२. २ अंडी + २ चिकन सॉसेज
३. २ अंडी + २ ग्रीक योगर्ट

Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Consume nutritious snacks to keep weight under control
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पौष्टिक स्नॅक्सचे करा सेवन; आहारतज्ज्ञांनी सांगितले बेस्ट ऑप्शन
What to do after waking up in the morning for health
निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर काय करावं? आरोग्यतज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स
Roasted chana with kishmish benefits
उपाशीपोटी हरभरा आणि मनुक्यांचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे
eating in a bowl is a good practice Or Not
Malaika Arora: मलायका अरोराने सांगितल्याप्रमाणे बाऊलमध्ये खाणे ‘हा’ एक चांगला पर्याय असू शकतो का? तज्ज्ञ म्हणतात की…
poha rate increase, poha , poha rate, poha pune,
पोहे तेजीत, सामान्यांचा नाश्ता महाग; पोह्यांच्या दरात किलोमागे पाच ते सात रुपयांची वाढ
Masaba Gupta's Winter Breakfast
मसाबा गुप्ता हिवाळ्यात नाश्त्यामध्ये खाते बाजरीचे धिरडे; जाणून घ्या तज्ज्ञांकडून याचे फायदे

फिटनेस कोच चेस चेंबर्स थ्रेड्स म्हणाले की, जर पदार्थांमध्ये ३० ग्रॅमपेक्षा कमी प्रथिने असतील तर तो भरपूर प्रोटीन असणारा नाश्ता (High Protein Breakfast) नाही.

याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने मुंबईच्या झिनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी सांगितले की, प्रथिनेयुक्त नाश्त्यासह (High Protein Breakfast) दिवसाची सुरुवात शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यास आणि संज्ञानात्मक कार्य करण्यास मदत करते. म्हणजेच प्रथिने रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत, विचार करण्याचे, लक्ष केंद्रित करण्याचे, शिकण्याचे, समस्यांचे निराकरण करण्याचे कौशल्य सुधारण्यास मदत करते. “जे लोक दिवसाच्या सुरुवातीला प्रोटीन खातात, त्यांना नंतर आरोग्यदायी खाण्याच्या निवडी करणे सोपे जाते आणि त्यांना ऊर्जेत कमी साखर असलेल्या स्नॅक्सची आवड कमी करण्यात मदत होते,” असे जिनल पटेल म्हणाल्या आहेत.

हेही वाचा…Chopping Board : तुम्हीसुद्धा भाज्या कापण्यासाठी चॉपिंग बोर्ड वापरता का? मग डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

नाश्ता टाळू नका…

सोशल मीडिया पोस्टशी सहमती दर्शवत पटेल म्हणाले की, ग्रीक योगर्ट, अंडी, नट्स खाल्ल्याने पोट भरल्याची भावना देते आणि भूक नियंत्रित करण्यात मदत होते. जेव्हा भरपूर प्रथिनेयुक्त नाश्त्याचा विचार केला जातो तेव्हा असे मानले जाते की, कोणताही पदार्थ यासाठी पुरेसा असतो. पण, फक्त त्या पदार्थांमध्ये ३० ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन (High Protein Breakfast) असावे. शिवाय, प्रथिने चयापचय कार्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

तर ३० ग्रॅमपेक्षा कमी प्रोटीन खाल्ल्यास आपल्याला आवश्यक ऊर्जा मिळू शकत नाही, ज्यामुळे व्यायामानंतर किंवा झोपेनंतर योग्य कामगिरीसाठी आणि पुनर्प्राप्तीसाठी पुरेशी ताकद मिळत नाही. त्यामुळे नाश्त्यात किमान ४० ते ५० ग्रॅम प्रथिने असणे केव्हाही चांगले ठरेल. पण, ही बाब लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, नाश्त्यासाठी आयडियल प्रथिनांच्या प्रमाणाबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेणेदेखील आवश्यक आहे. त्यामुळे नाश्ता टाळू नका, कारण तो दिवसाचा पहिला आहार आहे. प्रथिनांचे प्रमाण अधिक असलेल्या आणि तुमच्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या योग्य प्रकारच्या खाद्यपदार्थांबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे जिनल पटेल म्हणाल्या आहेत.

Story img Loader