High Uric Acid Cause Joint Pain And Swelling: युरिक ऍसिड हा एक घातक विषारी घटक आहे ज्याचे शरीरातील प्रमाण वाढल्यास किडनी निकामी होण्याचा धोका असतो. जेव्हा किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा युरिक ऍसिडचे क्रिस्टल म्हणजेच छोटे खडे शरीरात जमा होत असतात. अनेकदा हे खडे तुमच्या सांध्यांमध्ये अडकून पडल्याने स्नायू ताठ होतात व लवचिकता कमी झाल्याने सांधेदुखीचा त्रास वाढू लागतो. अनेकदा सांध्यांना सूज येऊन मांसपेशींमध्ये गाठ तयार होऊ शकते. युरिक ऍसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक मार्गच सर्वात सोयीस्कर ठरू शकतो.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे युरिक ऍसिड हे शरीरातुन मलमुत्राच्या मार्फत बाहेर टाकले जाते. याचा अर्थ तुम्हाला शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात बदल करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः थंडीच्या काळात युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण शरीराला काही सवयी लावू शकता. तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून व काही पदार्थ वर्ज्य करून आपण सूज, दुखणी यावर उपाय मिळवू शकता. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार सांवलिया यांनी युरिक ऍसिडसाठी काही पदार्थांना मुख्य कारण ठरवले आहे.

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Shocking Video Udupi Man Tossed In Air
हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे….;अंगावर शहारा आणणारा Video Viral
two dead in tanker accident
जळगाव जिल्ह्यात टँकरच्या धडकेने दोन जणांचा मृत्यू
Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?
Syphilis cases increase in city Mumbai
सिफिलीस बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ
Six reasons to start chewing guava leaves every day
फक्त पेरु नव्हे तर पेरुची पाने देखील आहेत गुणकारी! रोज पेरुची पाने चघळण्याची सहा कारणे

मंद मेटाबॉलिज्म, गतिहीन जीवनशैली, प्रोटीनचे अधिक सेवन, रात्रीच्या जेवणात पचनास जड पदार्थांचे अधिक प्रमाण, कमी पाणी पिणे, अधिक मांसाहार या गोष्टी तुमच्या किडनीसाठी घातक मानल्या जातात. युरिक ऍसिड कमी करून तुमच्या स्नायूंना मजबुती व लवचिकता देण्यासाठी खालील टिप्स वापरून पाहू शकता..

४५ मिनिटांचा नियम (Everyday 45 Min)

दररोज आपण ४५ मिनिटांचा व्यायाम केल्यास तुमचे शरीर दीर्घकालीन तरुण राहण्यास मदत होऊ शकते. व्यायामाने घाम येत असल्याने काही अनावश्यक घटक शरीरातून घामावाटे सुद्धा बाहेर टाकले जातात. तर रक्ताभिसरण सुधारल्याने सर्व स्नायूंना आवश्यक रक्ताचा व पोषक सत्वांचा पुरवठा होतो. तुम्ही कोणताही व्यायाम करू शकता पण त्यात निदान ४५ मिनिटांचा नियम पाळायला विसरू नका.

पाण्याला नाही म्हणू नका (Drink Enough Water)

थंडीच्या दिवसात तहान कमी लागते. परिणामी कमी पाणी प्यायले जाते, शरीराचे डिटॉक्स हे केवळ पाण्यामुळेच शक्य होऊ शकते. त्यामुळे थंडीत शक्य तितके पाणी प्या. तुम्हाला वाटल्यास कोमट पाणी टाकून पिऊ शकता.

रात्रीच्या जेवणात ‘हे’ पदार्थ टाळा (Don’t Consume Lentils or Beans And Wheat For Dinner)

युरिक ऍसिड नियंत्रणात राहण्यासाठी रात्रीच्या जेवणात काही डाळी जसे की राजमा, तूर यांचे सेवन करणे टाळा. तसेच डाएटवर असताना पोळ्या खाणे जास्त पसंत केले जाते. मात्र गव्हामुळे युरिक ऍसिड वाढू शकते. प्रोटीन युक्त आहार हा युरिक ऍसिडचा स्तर वाढवतो म्हणूनच शक्य झाल्यास हिरव्यागार भाज्या रात्रीच्या जेवणात समाविष्ट कराव्यात.

सूर्यास्ताच्या आधी जेवण (Practice Early And Light Dinner)

युरिक ऍसिड नियंत्रणाची सर्वात सोपी पद्धत म्हणजे रात्रीच्या जेवणाची वेळ. शक्य झाल्यास झोपण्यात आणि जेवणात निदान २ तासांचे अंतर ठेवा. रात्रीचे जेवण हे हलके व लवकर असल्यास पचनप्रक्रिया वेगाने व सुरळीत होऊ शकते.

हे ही वाचा<< किडनी निकामी होण्याची ‘ही’ लक्षणे वेळीच ओळखा; तुमचंही शरीर नेहमी देतं संकेत

आवळा व बेरीचे सेवन (Consume Sour Fruits Like Amla, Berries)

युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आमलयुक्त फळे जसे की आवळा, संत्री, किवी यांचे सेवन वाढवा. थंडीच्या मोसमात येणाऱ्या बेरी चे सेवनही युरिक ऍसिड कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Story img Loader