संधिवात हा आजार अनेक लोकांमध्ये दिसून येतो. संधिरोग होण्यामागे अनेक कारणे दिसून येतात. यासंदर्भात द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मॅक्स सुपर स्पेशिअ‍ॅलिटी हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसीनचे संचालक डॉ रॉमेल टिक्कू (Dr Rommel Tickoo) यांनी संधिरोग होण्यामागील कारण आणि त्यावरील उपाययोजनांविषयी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ रॉमेल टिक्कू सांगतात, ” एक दिवस माझ्या क्लिनिकमध्ये ५८ वर्षीय गृहस्थ आले आणि त्यांच्या टाचा आणि घोटया भोवती खूप जास्त त्रास होत असल्याचे ते सांगत होते. त्यांचा पाय खूप सुजलेला आणि लाल दिसत होता. मी त्यांना विचारले की तुम्ही या दुखण्यावर औषध घेतले का? त्यावर ते म्हणाले की जेव्हापासून युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढली तेव्हापासून त्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यामुळे त्यांनी युरिक अ‍ॅसिड कमी करण्याचे औषध घेतले होते पण त्याचा काहीही फायदा झाला नाही उलट दुखणे आणखी वाढले. “

हेही वाचा : १६,००० हार्ट सर्जरी केलेल्या डॉक्टरांचेच हार्ट अटॅकने निधन! सायलंट अटॅकचा धोका कसा ओळखावा, जाणून घ्या

डॉ टिक्कू सांगतात, ” यांच्यासारखे अनेक लोकांना जेव्हा संधिवाताचा त्रास जाणवतो तेव्हा ते युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्याचे सांगतात. जेव्हा तुम्हाला संधिवाताचा त्रास जाणवतो तेव्हा जर तुम्ही युरिक अ‍ॅसिड कमी करण्याचे औषध घेतले तर त्रास आणखी वाढतो. त्यावेळी तुम्हाला वेदना किंवा जळजळ सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. यासाठी आम्ही तुम्हाला colchicine ही औषध घेण्याचा सल्ला देऊ कारण या औषधीमुळे संधिवाताचा त्रास विशेषत: वेदना आणि जळजळ दूर होते आणि आराम मिळतो. जेव्हा संधिवाताचा त्रास जाणवतो तेव्हा युरीक अ‍ॅसिडचे क्रिस्टल्स तुमच्या सांध्यामध्ये तयार होतात आणि यामुळे होणाऱ्या जळजळीला कमी करण्यासाठी हे औषध काम करते. “

युरिक अ‍ॅसिड शरीरात कोणते काम करते?

युरिक अ‍ॅसिड हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते याशिवाय एंडोथेलियल फंक्शनसाठी आणि रोगप्रतिकारशक्ती नियमन करण्यासाठी मदत करते म्हणजेच युरिक अ‍ॅसिड हे एक प्रकारे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते. अर्ध्यापेक्षा जास्त ब्लड प्लाझमाची अँटिऑक्सिडंट क्षमता युरिक अॅसिडमधून येते. याशिवाय युरिक अ‍ॅसिड लिव्हर, वस्कूलर एंडोथेलियल सेल्स, ह्यूमन नसल सिक्रेशन्स (human nasal secretions) मध्ये अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात पण जेव्हा युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते तेव्हा त्याचा नकारात्मक प्रभाव आरोग्यावर दिसून येतो.

हेही वाचा : हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी वेळीच करा कॅल्शियम स्कोअर टेस्ट, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढले तर काय होतं?

जेव्हा युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते तेव्हा त्याचे क्रिस्टल्स सांध्यामध्ये साचतात. पायांची मोठे बोटे, घोटे, मनगट, गुडघे आणि अगदी लहान सांध्यामध्येही युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण दिसून येते ज्यामुळे तुम्हाला अंगदुखीचा त्रास जाणवतो.
जर अति प्रमाणावर युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढले तर किडनी स्टोनचाही त्रास जाणवू शकतो आणि जर तुम्ही योग्य उपचार केले नाही तर किडनी खराब होण्याची शक्यता असते.
जरी युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने स्टोन निर्माण होत नाही तरीसुद्धा किडनी खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने रक्तदाब वाढतो पण जर तुम्ही उच्च रक्तदाब नियंत्रित केला तर ब्लड प्रेशरची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते ज्यामुळे हार्ट अॅटक, हार्टसंबधीत आजार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. हाय युरिक अ‍ॅसिडसह हाय कोलस्ट्रॉल, डायबिटीज, लठ्ठपणा, अपुरी झोप यामुळेही आरोग्यावर धोका निर्माण होतो.

युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण काय असावे ?

युरिक अ‍ॅसिडची सामान्य रेंज ही ३.५ ते ७.२ मिलिग्राम/डेसीलिटर असावी. स्त्रियांसाठी ही ६ असावी तर पुरुषांसाठी ही ७ असावी. जोपर्यंत तुम्हाला संधिवात किंवा किडनी स्टोनचा त्रास होत नाही तोपर्यंत औषध घेण्याची गरज नाही पण जेव्हा युरिक अॅसिडचा आकडा हा ९ च्या वर असेल तर योग्य औषधी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा : रोज द्राक्ष खाल्यामुळे आतड्यांतील बॅक्टेरिया वाढतात का? जाणून घ्या काय सांगते संशोधन

युरिक अ‍ॅसिड वाढण्यामागील धोकादायक घटक कोणते?

युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढण्यामागे डाएट आणि अल्कोहोलचे सेवन ही दोन खूप महत्त्वाचे कारणे आहेत.

१. डाएट आणि अल्कोहोल : प्युरीन (purine) नावाचा कंपाऊंड ब्रेक झाल्यामुळे युरीक अ‍ॅसिड निर्माण होते. त्यामुळे कोणत्या फूडमध्ये प्युरीन कपाऊंड आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. प्युरीन फूड हे मुख्यत: प्राण्यांपासून मिळते. अल्कोहोलमध्येही बऱ्या प्रमाणात प्युरीन कंपाऊंड आढळते. त्यामुळे स्वीट बेवरेज कार्बोनेटेड आणि फ्रक्टोस कॉन सिरपचे सेवन टाळणे, गरजेचे आहे.
याशिवाय अनेक सल्लागार रुग्णांना प्युरीनने समाविष्ट असलेले घटक जसे की पालक, बिन्स, मटर, आणि टमाटर न खाण्याचा सल्ला देतात पण लेटेस्ट रिसर्चनुसार युरिक अ‍ॅसिड वाढवण्यात त्याचं योगदान तितकं नसल्याचे समोर आले आहेत पण धान्ये, शेंगा, फळ आणि फायब्रस फूड, कॉफी आणि व्हिटामिन सी हे युरिक अ‍ॅसिड कमी करण्यास मदत करतात.

२. वजन : वजनवाढ किंवा लठ्ठपणा अनेकदा युरिक अ‍ॅसिड वाढण्याचं कारण ठरते.

हेही वाचा : चहाबरोबर बिस्किटे खाता? आताच थांबवा, नाही तर रक्तातील शुगरसह वजनही वाढतं? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या…

३.औषधी : क्षयरोग(TB), मेडिसीन पिरॅझिनॅमिड( medicine Pyrazinamide), डायरुटीक्स (diuretics), बीपी मेडिकेशन (BP medication), अँजिओटेन्सीन-कन्व्हर्टींग एन्झाम्स (angiotensin-converting enzyme)(ACE), इनहिबिटर्स (inhibitors) आणि बेटा ब्लॉकर्स beta blockers सारख्या औषधी युरिक अ‍ॅसिड वाढवतात.

४. वय आणि लिंग : स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये संधिवात जास्त आढळतो पण स्त्रियांमधील मोनोपॉजनंतर युरिक अ‍ॅसिडची पातळी ही पुरुषांच्या युरिक अ‍ॅसिडच्या पातळीपर्यंत पोहचते.

डॉ रॉमेल टिक्कू सांगतात की युरिक अ‍ॅसिडच्या पातळीकडे नियमित लक्ष देणे गरजेचे आहे आणि जर आपण युरिक अ‍ॅसिडच्या पातळीवर समतोल राखला तर आपल्याला चांगला फरक दिसून येणार.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High uric acid levels caused gout what happen when uric acid levels go higher read what expert said ndj