छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानने अभिनयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. “ये रिश्ता क्या कहलाता है” मालिकेत ‘अक्षरा”ची भुमिका आणि “कसौटी जिंदगी की” या मालिकेत “कोमलिका”ची भुमिका साकारून हिना घराघरात पोहचली. “खतरो के खिलाडी”, बिग बॉस अशा रिअ‍ॅलटी शोमुळे हिनाची लोकप्रियता आणखी वाढली. हिनाचे आज लाखो चाहते आहेत जे तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. हिना सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते. नुकताच हिनाने धक्कादायक खुलासा केल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कॅन्सरचं निदान झाल्याचं तिने चाहत्यांना सांगितलं. या आधीही काही अभिनेत्रींनी ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे सांगितले आहे. दरम्यान जगभर अधिकाधिक तरुण स्त्रियांनी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी लवकर का करावी? ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी जनुक चाचणी (gene testing)का करावी? स्त्रियांनी त्यांच्या जीवनशैलीकडे थोडे अधिक का लक्ष द्यावे? याबाबत सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे.

View this post on Instagram

A post shared by ???? ???? (@realhinakhan)

mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Isha Ambani opened up giving birth to her twins through IVF
आईप्रमाणेच ईशा अंबानीने देखील IVF द्वारे दिला जुळ्या मुलांना जन्म; खुलासा करत म्हणाली, “ही एक अवघड…”
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
sun entering the Leo sign these four sign
सूर्याचा जबरदस्त प्रभाव! सिंह राशीतील प्रवेशाने ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार भरपूर पैसा
Aishwarya Narkar age and village
ऐश्वर्या नारकर पन्नाशीच्या नसून ‘इतकं’ आहे वय, जन्मतारीखच सांगितली; कोकणातलं गाव कुठलं अन् कुठे राहतात? जाणून घ्या
2-2-2 diet really beneficial for weight loss
वजन कमी करण्यासाठी ‘२-२-२ आहार पद्धत’ खरंच फायदेशीर आहे का? काय सांगतात तज्ज्ञ…

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांची संख्या २०१६ मधील १.५ लाखांवरून २०२२ मध्ये २ लाखांपर्यंत वाढली आहे. “सरासरी ४० टक्क्यांनी ‘ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर’च्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. ‘ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर” हा ब्रेस्ट कॅन्सरचा एक प्रकार आहे ज्यावर उपचार करणे कठीण आहे. इतर कॅन्सरच्या प्रकारामध्ये आढळणारे ( इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि HER2) तीन रिसेप्टर्स ‘ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर’च्या प्रकरणांमध्ये आढळत नाहीत.
सामान्यतः कॅन्सरच्या उपचारादरम्यान या विशिष्ट रिसेप्टर्सना लक्ष्य करून ट्यूमरचा आकार कमी करण्यात मदत होते, कॅन्सरची वाढ कमी होते आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांसाठी परिणाम सुधारतात .पण ‘ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरमध्ये हे रिसेप्टर्स आढळत नसल्यामुळे डॉक्टरांकडे उपचाराचे पर्याय कमी आहेत. या कॅन्सरचा तरुण स्त्रियांवर जास्त परिणाम करतो आणि अधिक आक्रमक असतो,” असे दिल्लीचे इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेले डॉ रमेश सरीन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

तरुण महिलांना ब्रेस्ट कॅन्सर का होतो?

ज्या तरुण स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होतो कारण त्यांच्यामध्ये अनुवांशिकरित्या धोका निर्माण करणारे घटक असण्याची शक्यता असते. जसे की काही स्त्रियांमध्ये पालकांकडून मिळालेले BRCA1 किंवा BRCA2 सारखे दोष असलेले जनुक (gene) जन्मत: असतात, ज्यामुळे त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. जीवनशैली, अयोग्य आहार, लठ्ठपणा, व्यायम न करणे, धूम्रपान, गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर किंवा हार्मोन्स थेरपी यासारख्या इतर कारणांमुळे हा धोका वाढतो.

प्लास्टिक, कीटकनाशके आणि इतर प्रदूषकांमधील काही रसायनांच्या संपर्कात आल्यास शरीरातील हार्मोन्समध्ये समस्या निर्माण करते. या रसायनांच्या संपर्कात येणे हे ब्रेस्ट कॅन्सरसह विविध आरोग्य समस्यांशी निगडीत आहे. प्रदूषकांमधील काही रसायन आरोग्यावर कसा परिणाम करतात हे समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क कमी करण्याचे मार्ग शोधण्यासाठी संशोधन केले जात आहे.

पाश्चिमात्य देशांतील सात टक्के महिलांच्या तुलनेत, ३५ ते ४६ वयोगटातील अकरा टक्के भारतीय महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. तसेच रुग्णांना स्टेज १ आणि २ मध्ये कोणतीही लक्षणे दिसू शकत नाहीत. नंतरच्या टप्प्यात कर्करोगाचे निदान होऊ शकते. म्हणूनच तुम्हाला लक्षणे दिसत असोत किंवा नसोत नियमित तपासणी, अनिवार्य आहे. लवकरात लवकर कॅन्सरचे निदान करणे तुम्हाला पूर्ण बरे होण्यास मदत करते.

हेही वाचा – Hina Khan Cancer: अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान, पोस्ट शेअर करत म्हणाली…

ब्रेस कॅन्सर तपासणी किती लवकर केली जावे? जनुक चाचणी अनिवार्य आहे का?
वयाच्या चाळिशीदरम्यान आणि नंतर दरवर्षी प्रथम मेमोग्राम करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना (जसे की आई, काकू किंवा आजी) ब्रेस्ट कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर झाला असेल आणि काहींना विशिष्ट जनुक( gene) समस्या (BRCA mutations) असेल, तर तुम्ही तुमची जनुक चाचणी तपासणी करणे आवश्यक आहे. कर्करोग होण्याचा धोका वाढवणारी जनुक समस्या आहे का हे या चाचणीमधून समजू शकते. हे जाणून घेतल्याने तुम्हाला सुरक्षित आणि निरोगी राहण्यासाठी योग्य पावले उचलण्यात मदत होऊ शकते.

काही कर्करोग स्टेज ३ मध्ये का आढळतात?

नियमितपणे तपासणी न करणे , स्तनांमध्ये ग्रंथी आणि संयोजी ऊतींचे प्रमाण जास्त असते, कर्करोग वेगाने वाढतो किंवा काहीवेळा तो हळू हळू वाढतो, चाचणी दरम्यान डॉक्टरांकडून चुकीचे निदान झाल्यास, रुग्णांना डॉक्टरांकडे जाण्यास उशीर झाल्यास यासारख्या कारणांमुळे ब्रेस्ट कॅन्सरचे निदान उशीरा होऊ शकते.

अशा प्रकरणांमध्ये एक मोठी गाठ शोधणे सोपे आहे, परंतु लहान किंवा हळू हळू वाढणारी गाठ शोधणे आणि इतर लक्षणे लक्षात येणे कठीण असू शकते. मॅमोग्राम लहान कर्करोग किंवा स्तनांमध्ये ग्रंथी आणि संयोजी ऊतींचे प्रमाण जास्त असल्यास कर्करोगाच्या गाठी लपवू शकतात. स्तनाचा कर्करोग ओळखणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि सर्वोत्तम प्रयत्न करूनही उशिरा निदान होऊ शकते. म्हणूनच वयाच्या चाळिशीत किंवा चाळिसाव्या वर्षी लवकर तपासणीसह काही अतिरिक्त चाचण्यांचा समाविष्ट करणे आवश्यक आहे.

हेही वाचा – Hina Khan : अभिनेत्री हिना खानला स्टेज-३ स्तनाचा कर्करोग; स्टेज-३ कर्करोग नेमका काय असतो? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

मॅमोग्राम व्यतिरिक्त अतिरिक्त चाचण्या करणे का आवश्यक आहेत?

“मॅमोग्राम प्रत्येकासाठी पुरेसे नाहीत. कुटुंबातील कोणालाही पूर्वी ब्रेस्ट कॅन्सर झाला नसेल तरीही काही लोकांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, याचे कारण असे की, काही रुग्ण त्यांच्या कुटुंबातील पहिलेच असू शकतात ज्यांच्या शरीरातील सामान्य पेशी आणि जनुकांमध्ये समस्या निर्माण होते. वैयक्तिक धोका वाढवणारे घटक आणि वैद्यकीय इतिहासाच्या आधारावर तुमचे डॉक्टरच तुम्हाला अतिरिक्त तपासणी प्रक्रिया सुचवू शकतात.

अतिरिक्त चाचण्या कोणत्या आहेत.

  • अल्ट्रासाऊंड: स्तनाच्या ऊतींचा फोटो काढण्यासाठी ध्वनी लहरींचा वापर केला जातो
  • एम.आर.आय : स्तनाच्या ऊतींचे तपशीलवार फोटो घेण्यासाठी मजबूत चुंबक आणि रेडिओ लहरी वापरतात (जास्त धोका असलेल्या किंवा स्तनांमध्ये ग्रंथी आणि संयोजी ऊतींचे प्रमाण जास्त असलेल्या स्त्रियांना या चाचणीची शिफारस केली जाते.)
  • थ्रीडी मॅमोग्राफी (डिजिटल ब्रेस्ट टोमोसिंथेसिस (DBT): स्तनाच्या ऊतींचे तपशीलवार थ्रीडी फोटो घेतात
  • कॉन्ट्रास्ट-एन्हान्स्ड मॅमोग्राफी (CEM): स्तनाच्या ऊतींमधील कर्करोगग्रस्त भाग हायलाइट करण्यासाठी रंग वापरते