छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानने अभिनयाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. “ये रिश्ता क्या कहलाता है” मालिकेत ‘अक्षरा”ची भुमिका आणि “कसौटी जिंदगी की” या मालिकेत “कोमलिका”ची भुमिका साकारून हिना घराघरात पोहचली. “खतरो के खिलाडी”, बिग बॉस अशा रिअॅलटी शोमुळे हिनाची लोकप्रियता आणखी वाढली. हिनाचे आज लाखो चाहते आहेत जे तिला सोशल मीडियावर फॉलो करतात. हिना सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असते. नुकताच हिनाने धक्कादायक खुलासा केल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कॅन्सरचं निदान झाल्याचं तिने चाहत्यांना सांगितलं. या आधीही काही अभिनेत्रींनी ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे सांगितले आहे. दरम्यान जगभर अधिकाधिक तरुण स्त्रियांनी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी लवकर का करावी? ब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी जनुक चाचणी (gene testing)का करावी? स्त्रियांनी त्यांच्या जीवनशैलीकडे थोडे अधिक का लक्ष द्यावे? याबाबत सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा