Home remedies for gallbladder stone : पित्ताशयात खडे होण्याचा त्रास हल्ली अनेकांमध्ये वाढताना दिसतोय, हा अतिशय वेदनादायी आजार असल्याने बहुतेकांना त्रास सुरू झाल्यानंतर जागेवरून उठतादेखील येत नाही. हल्ली सर्व वयोगटातील लोकांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढतेय. आहार, स्थूल शरीर, जाडेपणा, अतिस्थूलपणा, अति तूपकट, तेलकट खाणं, आहारात तंतूमय पदार्थ न घेणं, बैठी कामं करणं, व्यायामाचा अभाव, वरचेवर फास्ट फूड किंवा जंक फूड खाणे या सर्व गोष्टींमुळे पित्ताशयात खडे तयार होण्याचे प्रमाण वाढतेय. काही लोकांना तर याचा इतका त्रास होतो की, अशावेळी त्यांना शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवला जातो. पण, काही आरोग्यतज्ज्ञ आणि आयुर्वेदातील तज्ज्ञांच्या मते पित्ताशयातील खडे पौष्टिक आहाराच्या मदतीने काढले जाऊ शकतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पण, खरंच हे शक्य आहे का किंवा याला काही वैज्ञानिक आधार आहे का हे जाणून घेण्यासाठी इंडियन एक्स्प्रेसने काही आहार विषयातील क्लिनिकल डाएटीशियनशी चर्चा केली.
यावर क्लिनिकल डाएटीशियन डॉ. रिधिमा गुप्ता यांनी सांगितले की, जर केस गंभीर आणि गुंतागुंतीची नसेल आणि रुग्णाला चयापचयासंबंधित कोणतेही विकार नसतील तर आहार आणि योग्य पोषणाद्वारे नैसर्गिकरित्या पित्ताशयाचे खडे काढता येऊ शकतात. आहार आणि जीवनशैलीत सातत्यपूर्ण बदल करून शस्त्रक्रियेची गरज बऱ्याच अंशी पुढे ढकलली जाऊ शकते.
आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे? (Natural Ways To Dissolve Gallbladder Stones At Home)
डॉ. रिधिमा गुप्ता यांच्या मते, “आहारातील बदल, शारीरिक हालचाली, झोप आणि तणाव व्यवस्थापन यासह सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवत तुम्ही रिलॅक्स राहू शकता. अशावेळी पित्ताशयाच्या आजारात तुम्ही आहारातही काही पदार्थांचा समावेश करू शकता.
१) ॲपल सायडर व्हिनेगर (ACV) तुम्ही शरीर शुद्धीकरणासाठी आहाराचा एक महत्त्वाचा भाग बनवू शकता. हायपोक्लोरहायड्रिया हे पित्ताशयात खडे होण्याचे एक प्रमुख कारण आहे, पण ॲपल सायडर व्हिनेगर आम्ल पातळी व्यवस्थापित करण्यात मदत करते; त्यामुळे या आजारावर ॲपल सायडर व्हिनेगर फायदेशीर ठरू शकते.
२) असे मानले जाते की, ॲपल ज्यूसच्या सेवनाने पित्ताशयातील खडे मऊ होतात आणि त्यामुळे ते शरीरातून सहज बाहेर पडू शकतात. अशावेळी अनेकांना चार ते पाच दिवस रोज एक ग्लास ॲपल ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो.
३) आर्टिचोक हे आणखी एक सुपरफूड आहे, जे शरीरातील लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल म्हणजे खराब कोलेस्ट्रोलची पातळी कमी करण्यास मदत करते. अशावेळी आर्टिचोकच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलमुळे तयार होणारे पित्ताचे खडे विरघळण्यास मदत होते. यामुळे साधारण १२ आठवड्यांसाठी तुम्हाला आर्टिचोक भाजीचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
डॉ. गुप्ता यांच्या मते, Gall Bladder Cleanse किंवा Gall Bladder Flush हे आणखी पर्याय आहेत, ज्याने चांगले परिणाम दिसू शकता.
Gall Bladder Cleanse मध्ये रुग्णाला आहारात प्रामुख्याने सफरचंदाचा रस, दिवसभर भाजीचा रस आणि संध्याकाळी लिंबाच्या रसासह ऑलिव्ह ऑईल घेण्यास सांगितले जाते. हा एक प्रतिबंधात्मक आणि चांगला उपाय आहे, पण मधुमेह आणि इतर आजार असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपाय करणे गरजेचे आहे.
गुप्ता यांच्या मते, एरंडेल तेलापासून बनवलेला पॅक हाही आणखी एक चांगला उपाय आहे. यात उबदार कपडा एरंडेल तेलात भिजवायचा, यानंतर तो तुमच्या पोटावर ठेवायचा. यामुळे वेदना कमी होतात आणि तुमच्या पित्ताशयावर उपचार करण्यास मदत होते.
पित्ताशयातील खडे काढण्यासाठी अननस फायदेशीर?
बायोॲक्टिव्ह कंपाऊंड ब्रोमेलेन आणि हाय एस्कॉर्बिक ॲसिड पातळीमुळे अवयवांमध्ये सूज येते. अशावेळी अननसाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. यामुळे जळजळ, सूज आणि वेदना कमी होतात. जळजळ, सूज कमी झाल्यास एखाद्या व्यक्तीला शस्त्रक्रिया पुढे ढकलता येऊ शकते. पण, मधुमेह आणि किडनी, पचनासंबंधित आजार असलेल्या रुग्णांनी कोणताही उपाय करण्यापूर्वी सावधगिरी बाळगा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या, असेही डॉ. गुप्ता म्हणाल्या.
गुप्ता यांनी पुढे म्हटले की, पित्ताशयाचा आजार असलेल्या लोकांनी प्रक्रिया केलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत आणि त्यांनी रोज शारीरिक हालचाली आणि काही योगासने केली पाहिजेत.
शस्त्रक्रियेची गरज कोणाला?
डॉ. गुप्ता यांनी शस्त्रक्रियेचा विचार करण्यापूर्वी रुग्णांनी आधी नैसर्गिक उपाय आणि आहारात काही बदल करून या समस्येवर उपचार करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला दिला.
पोटाच्या उजव्या बाजूला वरती किंवा मध्यभागी दुखणे, मल-मुत्राचा रंग बदलणे, त्वचा आणि डोळ्यांमधील पांढरा भाग पिवळा पडणे, पित्ताशयात जळजळ या लक्षणांसह पित्ताशयात अनेक किंवा मोठे दगड असल्याचे निदान झाल्यास वेळेवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. ७-१० मिमी पेक्षा जास्त मोठा दगड पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतड्यात नेणारा मार्ग अरुंद होतो व पित्तरस यकृता (लिव्हर) मध्ये साचू लागतो. अशावेळी वरील लक्षणे दिसू लागतात.
डॉ. गुप्ता यांच्या मते, वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेचा विचार करत असलेल्या व्यक्तीने पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेचा विचार केला पाहिजे.