Home Remedies for Yellow Teeth: आपण सर्वजण सकाळी झोपून उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासत असतो. लहानपणी ही सवय सर्वांना लावली जाते. नियमितपणे दात घासूनही काही लोकांच्या दातांवर पिवळेपणा पाहायला मिळतो. बऱ्याच लोकांचे हसताना दात दिसत असतात. अशाच जर एखाद्या व्यक्तीच्या दातांवर पिवळेपणाचा थर असेल, तर त्या बिचाऱ्याला लोकांसमोर ना धड हसता येईल, ना त्यांच्याशी बोलता येईल. दातांच्या पिवळेपणामुळे चारचौघांमध्ये हसं होऊ नये यासाठी हा दातांवरचा पिवळेपणा घालवणे आवश्यक असते. ही समस्या उद्भवू नये यासाठी काही सोप्या ट्रिक्सची मदत घेता येते.
चला तर मग जाणून घेऊयात दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी उपयुक्त असलेल्या घरगुती उपायाविषयी…
मीठ आणि स्ट्रॉबेरी
प्रथम मीठ आणि स्ट्रॉबेरी यांचे एकत्रित मिश्रण तयार करावे. हे मिश्रण टूथ पेस्टप्रमाणे ब्रशवर लावून दात घासावेत. असे केल्याने दातांवरील पिवळेपणा लगेच नाहीसा होईल.
व्हाईट व्हिनेगर
व्हाईट व्हिनेगरच्या मदतीनेही दातांवरील पिवळा थर काढता येतो. यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे व्हिनेगर मिसळावे. तयार झालेल्या मिश्रणाने गुळण्या कराव्यात. असे केल्याने दातांवरचा पिवळेपणा जाऊन तोंडाला येणारा दुर्गंध देखील नाहीसा होईल.
आले
आल्याचे छोटे तुकडे मिक्सरमध्ये टाकून बारीक करावेत. त्यानंतर त्यात पाव चमचा मीठ आणि लिंबाचा रस मिसळावा. तयार झालेले मिश्रण टूथब्रशने दातांवर घासावे. याने दात पांढरे-शुभ्र होण्यास मदत होईल.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्यामुळेही दातांवरचा पिवळेपणा नाहीसा होऊ शकतो. यासाठी चिमूटभर मीठात बेकिंग सोडा मिसळावा. हे मिश्रण ब्रशवर लावून दात स्वच्छ करावेत.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)