Hormonal Imbalance: फिट राहण्यासाठी शरीराचा प्रत्येक भाग स्वस्थ असणे आवश्यक असते. सकस अन्नपदार्थांचे सेवन, नियमित व्यायाम अशा काही सवयींचे पालन करुन शारीरिक वृद्धी होत असते. मानवी शरीरामध्ये विविध प्रकारचे हार्मोन्स असतात. हे हार्मोन्स वेगवेगळ्या शारीरिक क्रियांमध्ये सहभाग होत विशिष्ट कार्य करत असतात. कधीकधी काही कारणांमुळे शरीरामधील हार्मोन्समध्ये गडबड होऊ शकते. यामुळे गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. हार्मोन्समध्ये असंतुलन होण्याला Hormonal imbalance असे म्हटले जाते. शरीरामध्ये हार्मोन्स असंतुलीत झाल्याने मूड स्विंग, निद्रानाश, स्मरणशक्ती कमकुवत होणे, थकवा जाणवणे, डोकेदुखी, पचनक्रियेशी संबंधित आजार यांचा सामना करावा लागू शकतो. याव्यतिरिक्त स्नायूंशी निगडीत समस्या उद्भवण्याची शक्यता असते. हार्मोनल असंतुलन होण्याची अनेक कारणे आहेत. काहीजणांना हा त्रास अनुवांशिकतेमुळे सहन करावा लागू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या समस्येवर मात करण्यासाठी उपचार उपलब्ध आहेत. यातील ठराविक उपचार घरच्या घरी करता येतात. घरामध्ये असलेले या पदार्थांचा समावेश आहारामध्ये करुन शरीरातील हार्मोन्स सामान्य स्थितीमध्ये राहण्यास मदत होते. चला तर मग हार्मोन्स संतुलीत राहावेत यासाठी कोणते पदार्थ खाल्ले जातात ते जाणून घेऊयात.

कोबी

हार्मोन्समध्ये असंतुलन झाल्यास कोबी खाणे फायदेशीर असते. यामध्ये हार्मोनल असंतुलन रोखण्यासाठी आवश्यक असलेले घटक उपलब्ध आहेत. आपल्याकडे कोबी भाजी किंवा सलाद म्हणून खाल्ली जाते.

ब्रोकोली

इस्ट्रोजन हे मानवी शरीरातील हार्मोन आहे. ज्यांच्या शरीरामध्ये या हार्मोनचे प्रमाण कमी आहे, त्यांना ब्रोकोली खाण्याचा सल्ला दिला जातो. हार्मोन्ससाठी उपयुक्त असलेला हा पदार्थ शरीरासाठी फार गुणकारी आहे.

आणखी वाचा – खूप प्रयत्न करुनही वजन कमी होत नाहीये? दररोज करा ‘या’ प्रमाणामध्ये Apple Cider Vinegar चे सेवन

टोमॅटो

आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले अनेक महत्त्वपूर्ण घटक टोमॅटोमध्ये असतात. म्हणून याचा वापर बऱ्याच पदार्थांमध्ये केला जातो. हार्मोन्स व्यवस्थितपणे काम करत नसल्यास टोमॅटो खाणे योग्य मानले जाते.

अ‍ॅव्होकॅडो

अ‍ॅव्होकॅडो खाल्याने हार्मोन्स अ‍ॅक्टिव्ह होतात असे म्हटले जाते. हार्मोन्सच्या उत्पादनासाठीही अ‍ॅव्होकॅडो खाण्याचा सल्ला दिला जातो.

आणखी वाचा – किडनी निकामी होण्याआधी त्वचेवर दिसतात ‘ही’ ५ लक्षणे; वेळीच ओळखा नाहीतर..

पालक

पालकचा समावेश हिरव्या पालेभाज्यांमध्ये होतो. पालक खाणे पचनक्रियेसाठी फायदेशीर असते. यामध्ये लोह (Iron) देखील आढळले जाते. परिणामी पालक आहारामध्ये समाविष्ट केल्याने रक्ताभिरणाची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडते. त्यासह हार्मोनल असंतुलीत होऊ नये यासाठीही पालकची मदत होते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hormonal imbalance foods items that helps in hormonal disbalance know more yps