डॉ. अश्विन सावंत

दिवाळी हा सण आपल्या देशात प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे, जो प्रामुख्याने दिव्यांचा, रोषणाईचा सण आहे. विविध प्रकारचे दिवे पेटवून आकर्षक रोषणाई करण्याची परंपरा देशात अनेक शतकांपासून अनुसरली जात आहे.या दिपोत्सवी परंपरेमध्ये फटाके कसे काय शिरले कळत नाही. साठेक वर्षांपूर्वी लोक दिवाळीला फटाके वाजवत नव्हते,आज जसे फटाके वाजवले जातात तसे तर नाहीच नाही.

Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Vinod Kambli Admitted To Hospital After Suddenly Health Deteriorated in Thane
Vinod Kambli: विनोद कांबळीची तब्येत बिघडली, तात्काळ रूग्णालयात केलं दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
treatment personality disorders
स्वभाव-विभाव : विकारांतून मुक्ती
Savlyachi Janu Savli
“महालक्ष्मीचं व्रत केलं ना…”, मेहेंदळे कुटुंबावरील संकट दूर करण्यासाठी सावली काय करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’चा प्रोमो
Loksatta editorial pay tribute to tabla legend ustad Zakir Hussain
अग्रलेख: आला नाही तोवर तुम्ही…

१९६०-७० च्या आसपास काही व्यापारी लोकांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके वाजवायला सुरुवात केली. लक्ष्मीपूजन झाले की फटाके वाजवले जायचे. ते पाहून इतर सामान्य लोकसुद्धा फटाके वाजवू लागले. एकमेकांचे बघून-बघून आणि एकमेकांना आंधळेपणे अनुसरून हळुहळू लोकांना वाटू लागले की, दिवाळीला फटाके वाजवायलाच हवेत. दशकागणिक असे एक अवास्तव समीकरण तयार झाले की ‘फटाके नाहीत तर दिवाळी कसली?’ पण वास्तवात फटाके हा दीपावली या सणाचा भाग आहे का? दिवाळी हा दिव्यांचा सण की फटाक्यांचा? आज प्रदूषणाने वेढलेल्या जगात फटाके वाजवणे कितपत योग्य आहे? फटाक्यांमुळे होणार्‍या अपघातांचे काय?

हेही वाचा >>>Papaya: पपईचा आहारात समावेश केल्यानं झपाट्याने वजन कमी अन् कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं? तज्ज्ञांनी दिलं उत्तर…

दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघाताच्या घटना आपण ऐकत असतो. आम्हां डॉक्टरांना तर दिवाळीच्या दरम्यान व नंतरही फटाक्यांमुळे झालेल्या अपघातांचे अनेक दुःखद किस्से अनुभवायला लागतात वा इतर डॉक्टरांकडून ऐकायला मिळतात. अशीच काही उदाहरणे वाचकांसाठी देत आहे. ही उदाहरणे वाचून तरी कदाचित डोळे उघडतील!

लवंगी फटाका उडून केसांमध्ये पडल्यामुळे एका लहान मुलाचे डोक्यावरचे तेवढ्या जागेतले केस जळून गेले. मोठा फटाका हातात पेटवताना एका तरुणाच्या तळहाताची कातडी जळून- भाजून- सोलून निघाली. साधे भुईचक्र पेटवताना ते बॉम्बसारखे फुटल्यामुळे लहान मुलीचे कंबरेखालचे शरीर भाजले. जळत्या फटाक्यावर पाय पडल्यामुळे तळपायाची नाजूक त्वचा भाजण्याची उदाहरणे तर नित्याचीच. पाऊस पेटवताना तो अनपेक्षितपणे फुटल्यामुळे डोळ्यांसमोर अंधार आला व नंतर निर्माण झाला दृष्टीदोष. वास्तवात फटाके पेटवताना होणार्‍या बहुतांश अपघातामध्ये डोळ्यांनाच इजा होते. ज्यामुळे कधी दृष्टीदोष होतो, तर क्वचित अंधत्वसुद्धा येते. आतमध्ये बॉम्ब ठेवून फोडल्यामुळे त्यावरचा डबा, मडके वा करवंटी दूरवर उडून एखाद्याच्या शरीराला दुखापत होते. असाच प्रकार झाडाच्या कुंडीजवळ करताना त्या कुंडीचा उडालेला तुकडा जवळ उभ्या असलेल्या मुलाच्या डोळ्याला लागून चांगलीच गंभीर इजा झाल्याचा प्रसंगही घडला होता. आकाशात उडवायचे रॉकेट वरच्या मजल्यावरच्या लोकांच्या घरात शिरून होणारे अपघात तर तुम्ही पाहिले असतीलच. रॉकेट आडवे करुन सोडण्याची पद्धत तर इतकी घातक आहे की त्यामुळे शहरांमध्ये भयंकर अपघात
होत असतात. जळते रॉकेट उलटे-सुलटे जाऊन कुठेही शिरल्याने आग लागण्याच्या घटना तर देशभर होत असतात. ज्यांच्या जागेमध्ये आग लागून मालमत्तेचे वा जीवनाचे नुकसान होते, त्यांची खरं तर काहीही चूक नसते. सुतळी बॉम्बसारखा प्रचंड आवाज करणारा फटाका खूप जवळ फुटल्यामुळे श्रवणदोष निर्माण होणेसुद्धा नित्याचे. अशा प्रचंड आवाज करणार्‍या फटाक्यांमुळे दोन-चार वर्षांच्या लहानग्यांचा जीव घाबरा होतो, मग तान्ह्या बाळांच्या
जीवाचा काय थरकाप होत असेल?

हेही वाचा >>>Mental Health Special: तुम्ही डीपफेक व्हिडीओ तर पाहात नाही ना?

असे युद्धसदृश बॉम्बगोळ्यासारखे आवाज करणारे फटाके दवाखाने, नर्सिंग होम्स, हॉस्पिटल्स यांच्या दारात सुद्धा पेटवणार्‍यांच्या अकलेची कीव
करावीशी वाटते. तुमचं बाळ त्या नर्सिंग होममध्ये असेल किंवा तुमचे बाबा त्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतील तर त्याबाहेर असेच फटाके फोडून तुम्ही त्रास द्याल का?

ध्वनीप्रदूषण कमी ….वायुप्रदूषण वाढले!

मागील काही वर्षांपासून वेगवेगळ्या पातळ्यांवर आमच्यासारख्या अनेकांनी केलेल्या प्रचारामुळे लोकांनी दिवाळीमध्ये मोठ्ठ्याने आवाज करुन कानठळ्या बसवणारे फटाके वाजवणे थोडे कमी केले आहे. ज्यामुळे दिवाळीदरम्यान विविध शहरांमधील ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण मागील वर्षांच्या तुलनेमध्ये हल्ली कमी झाल्याचे दिसले. मात्र त्याचवेळी त्या आवाज करणार्‍या फटाक्यांऐवजी लोकांनी आवाज न करणारे जे फटाके पेटवले, त्यामधून निघणार्‍या धुरामुळे वायुप्रदूषण मात्र मोठ्या प्रमाणात वाढले असे दिसते.

फटाक्यांमुळे होणार्‍या वायुप्रदूषणाबद्द्ल काय बोलावे? दिवाळीच्या दरम्यान व नंतर घराघरातून श्वसनविकारांमुळे कोणीना कोणी व्यक्ती आजारी असतेच. श्वसनाचे आजार या दिवसांत समाजामध्ये खूप बळावतात, त्याचे मुख्य कारण म्हणजे फटाक्यांमुळे प्रदूषित होणारी हवा. दिवाळीमध्ये पेटवल्या- वाजवल्या जाणार्‍या फटाक्यांमुळे शहरांमधील प्रदूषण एवढ्याभयानक प्रमाणात वाढते की दिवाळीच्या दरम्यान आणि लगेच तुम्ही बघाल तर, सर्वत्र श्वसनविकाराची प्रचंड लाट आलेली दिसते. हा प्रकार मी तरी मागचे काही वर्षे मुलुंडमध्ये दर वर्षी अनुभवतो आहे आणि मला खात्री आहे की इतर शहरांमधील डॉक्टरांचाही असाच अनुभव असेल. दिवाळीच्या दरम्यान जवळजवळ प्रत्येक घरामध्ये श्वसनविकाराने त्रस्त एक तरी रुग्ण असतो. विशेष म्हणजे या श्वसनविकारामध्ये रोजच्याप्रमाणे नाक वाहाणे,शिंका, ताप याहीपेक्षा घसादुखी, कोरडा खोकला व दम्याचा त्रास लोकांना त्रस्त करत असतो. ही लक्षणे विषाणूजन्य आहेत व हा श्वसनविकार विषाणूजन्य आजाराची लाट होती, असे एखादा तज्ज्ञ म्हणेल, जे अयोग्य नाही. मात्र त्या विषाणुंच्या फैलावाला मूळ कारण तुमचा श्वसनमार्ग दुर्बल होणे आणि श्वसनमार्ग दुर्बल होण्याचे कारण होते, दिवाळीच्या दरम्यान फटाक्यांच्या धुरामधून वातावरणामध्ये अतिप्रमाणात वाढलेले विषारी वायू. ज्या विविध ज्ञात व अज्ञात अशा घटकांचा वापर फटाके तयार करताना केला जातो, त्यांमधून हवेमध्ये उत्सर्जित नेमके कोणते विषारी घटक बाहेर फेकले जातात, त्याची संपूर्ण माहिती सुद्धा कदाचित आपल्याला नसेल. कारण सर्वसाधारण उपचार घेऊनसुद्धा त्या श्वसनविकारावर फारसा फायदा होताना दिसत नाही, हा अनुभव तुम्हांला सगळ्यांनाच आला
असेल.

दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे विषारी वायू दिवाळीनंतर पुढचे निदान सात-आठ दिवस वातावरणामध्ये साचून राहात असावेत. त्या दरम्यान जे शहराबाहेर-नैसर्गिक वातावरणामध्ये राहायला गेले होते, त्यांना मात्र या श्वसनविकारांचा त्रास झालेला दिसत नाही. यावरुन त्या फटाक्यांमधून उत्सर्जित होणार्‍या विषारी वायुंचाच संबंध श्वसनविकाराच्या लाटेशी लावायला हरकत नसावी.

हेही वाचा >>>Benefits of 100 Gram Ajwain: डायबिटीस असल्यास ओवा खाणे योग्य आहे का? वजन कमी करण्यासाठी ओवा ठरतो जादुई?

तुमच्या शहराची हवा श्वास घेण्यायोग्य आहे का?

मुळातच आपल्या शहरांमधील हवा प्रदूषित आहे. यंदा २०२३ साली तर मुंबईमधील हवा ही दिल्लीपेक्षाही अधिक प्रदूषित झाल्याचे दिसून आले. याचा अर्थ देशातील (कदाचित जगातील) ते सर्वाधिक प्रदूषित शहर झाले आहे.आपल्या शहराची ही ओळख निश्चीतच भूषणावह नाही. बरं, हे मुंबईबरोबरच मुंबईच्या आसपासच्या विविध शहरांनाही लागू होते,ज्या सर्व शहरांमध्ये मिळून काही कोटी लोक राहतात.या इतक्या कोटी लोकांनी या प्रदूषित हवेचा सामना कसा काय करायचा. ही हवा फटाके वाजवून अधिक प्रदूषित करण्यात काय हशील? काय म्हणायचे याला? कोट्यवधी लोकांचे आरोग्य प्रदूषित हवेमुळे आधीच भयंकर धोक्यात आलेले असतानाही लोक फटाके वाजवतात त्याचे आश्चर्य वाटते.

धूम्रपानाला बंदी, मग फटाक्यांवर का नाही?

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फटाक्यांच्या प्रदूषणामुळे समाजाला होणार्‍या आजारांची इतकी तीव्रता असतानाही याविरुद्ध प्रत्यक्षात विशेष कारवाई होताना दिसत नाही. जे धूम्रपान सभोवतालच्या आठ-दहा माणसांना आजार देऊ शकते त्या धूम्रपानावर बंदी, मग जे फटाके संपूर्ण शहराचे- अखिल समाजाचे आरोग्य धोक्यात टाकतात, त्यांच्यावर का नाही? फटाक्यांचा वापर करायचा की नाही, करायचा तर कोणत्या प्रकारच्या फटाक्यांचा? फटाके किती प्रमाणात व कसे वाजवायचे? त्यांच्या वापराबाबत कोणते नियम असावे? निदानपक्षी फटाके वाजवण्याची वेळ, जागा, फटाक्यांचा प्रकार आदींबाबत कडक नियम करण्याची आणि जे नियम आहेत त्यांची अंमलबजावणी होत आहे का हे तपासण्याची वेळ आली आहे.

सण-उत्सव हे समाजाच्या भल्यासाठी असतात. लोकांचे सामाजिक, आध्यात्मिक, नैतिक, शारिरीक व मानसिक स्वास्थ्य जतन व्हावे, वृद्धींगत व्हावे अशा व्यापक हेतूंनी पूर्वजांनी सणांची योजना केली. दिवाळीमध्ये फटाके वाजवताना आजच्या घडीला नेमकं कोणाचं भलं होत आहे. आपल्या घरातल्या लहानग्यांना,वृद्धांना दिवाळीत होणार्‍या त्रासाचा तरी विचार करा. आपल्याला हा विषय गंभीरतेने घेऊन त्यावर ठोस उपाय वा पर्याय शोधायला हवा.

Story img Loader