Health Special: स्मृतिभ्रंशाची कारणे, प्रकार, लक्षणे या सगळ्याची चर्चा गेल्या काही लेखांमध्ये आपण केली. स्मृतिभ्रंश म्हटले की मेंदूचे कार्य मंदावणे, बुद्धीचा ऱ्हास आणि तो ही बरा न होणारा हे आपण पाहिले. या साऱ्यावर काही उपाय करता येतात का? त्या उपायांचा काय आणि किती उपयोग होतो? उपाय कधी सुरू केले पाहिजेत? असे अनेक प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या मनात असतात. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न.

लवकर निदान- लवकर उपचार

बहुतेकदा आपल्या घरातील वृद्ध व्यक्तीला स्मृतिभ्रंश झाला आहे, हे समजायलाच वेळ लागतो. विसरणे, स्वभावामध्ये काही प्रमाणात बदल होणे, नेहमीची कामे न करता येणे आणि मग ती न करणे हे सगळे वृद्धत्वाचा नैसर्गिक भाग आहे असे घरच्यांना वाटते, त्यामुळे सुरुवातीचे अनेक महिने किंवा वर्षे योग्य उपाय केले जात नाहीत. लक्षणे दिसायला लागली की लवकरात लवकर डॉक्टरांकडे गेले की, आवश्यक त्या चाचण्या आणि उपचार सुरू होऊ शकतात. मनोविकारतज्ज्ञ (Psychiatrist) किंवा Neurologist हे विशेषज्ज्ञ डिमेन्शियाचे योग्य निदान करू शकतात. डिमेन्शियाच्या उपचारांचा उद्देश बौद्धिक क्षमता आणि मेंदूतील बदल होण्याचा वेग कमी करणे, जितकी शक्य आहे तितकी रुग्णाची कार्यक्षमता कायम राखणे, लक्षणांची तीव्रता कमी करणे असा असतो. दैनंदिन कामे करता येणे, स्वतःची काळजी स्वतःला घेता येणे, संभाषण करता येणे, आपल्या गरजा घरच्यांना सांगता येणे, लघवीवरील आणि शौचावरील नियंत्रण कायम राहणे अशा अनेक क्षमता जास्तीत जास्त काळपर्यंत कायम राखता आल्या तर नातेवाईक किंवा मदतनीस अशा काळजीवाहकांवरील भार वाढत नाही आणि रुग्णाची काळजी घेणे सोपे होते.

Guillain Barre Syndrome , Sinhagad Road Area,
संशयित रुग्णांचे तातडीने फेरसर्वेक्षणाचे केंद्रीय उच्चस्तरीय पथकाचे निर्देश! जाणून घ्या नेमकं काय घडलं…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
One GBS patient detected in Sangli city and five to six in rural areas all receiving treatment in private hospitals
सांगलीत ‘जीबीएस’चे सहा रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क, उपचार सुरू
Chest Pain & Heart Attack
Chest Pain & Heart Attack : छातीत दुखणे हे नेहमी हार्ट अटॅक येण्याचे लक्षण असते का? तज्ज्ञ काय सांगतात…
As Pune reports over 50 suspected cases of Guillain-Barré syndrome, doctors explain why cerebrospinal fluid examination is done
हाता-पायाला मुंग्या, अशक्तपणा… पुण्यात नव्या व्हायरसची एन्ट्री! काय आहे हा दुर्मीळ आजार? डॉक्टरांनी दिली माहिती…
Guillain Barre syndrome outbreak in Pune
Guillain Barre Syndrome :‘जीबीएस’ची रुग्णसंख्या ७३ वर; ३० जण आयसीयूमध्ये तर १४ जण व्हेंटिलेटरवर
Guillain Barre Syndrome cases in Pimpri Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे रुग्ण किती? वैद्यकीय विभागाने काय केले आवाहन?
foamy urine kidney problem
लघवीमधून प्रचंड फेस येतोय? हे कोणत्या आजाराचे लक्षण तर नाही ना? वाचा डॉक्टर काय सांगतात

हेही वाचा…सफरचंदाचा रस दारू इतकाच घातक असतो? काय सांगतात तज्ज्ञ एकदा घ्या समजून….

रुग्ण व नातेवाईकांना आधार महत्त्वाचा

डिमेन्शियाचे निदान झाल्यावर रुग्णाचे नातेवाईक आणि रुग्ण दोघांनाही ते निदान सांगणे आवश्यक ठरते. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात रुग्ण असेल तर आपल्याला येत असलेल्या अडचणींची त्यांना जाणीव असते, आपल्या क्षमता कमी होत चालल्याचे जाणवते आणि त्यामुळे एक प्रकारची भीतीही वाटते, कधी निराश वाटते. आपले निदान काय आहे हे कळल्यावर भावना उचंबळून येतात. मनात अनेक शंका निर्माण होतात. आपले कसे होणार याची काळजी वाटते. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना या टप्प्यावर आधार देणे हे डॉक्टरांचे महत्त्वाचे काम असते. रुग्णाचे आणि काळजीवाहकांचे सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने ते उपयोगी ठरते. त्याच बरोबर त्यांच्या अवास्तव अपेक्षा आणि गैरसमज दूर करता येतात.

औषधोपचार

Donepezil, Rivastigmine, Galantamine, Memantine अशी काही औषधे मुख्यत्वेकरून दिली जातात. कमी डोसमध्ये सुरू करून, रुग्णाला औषध सोसते आहे की नाही ते पाहून त्याचा डोस वाढवला जातो. या औषधांनी नाट्यमय बदल होत नाहीत, पण वागणे, स्मरणशक्ती यातील दोषांची तीव्रता कमी होते, लवकर बिघडत नाही. भूक न लागणे, वजन कमी होणे, पोटात मळमळणे, झोप कमी होणे, कधी कधी हृदयाची गती कमी होणे असे दुष्परिणाम दिसू शकतात. आपल्या रुग्णाला या पैकी काही त्रास होत नाही ना, याकडे लक्ष द्यावे लागते.

हेही वाचा…Heatwave alert : शरीराला थंडावा देण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पती आहेत सर्वोत्तम, रोजच्या आहारात करा समावेश

अनिर्बंध वागणे ते अलिप्तपणा

डिमेन्शियाच्या रुग्णांमध्ये इतरही अनेक लक्षणे दिसतात. राग येणे, उत्तेजित होणे, बेचैन होणे, समाजात वावरताना किंवा घरात वागताना अनिर्बंध वागणे (कपड्यांचे भान नसणे, लैंगिकभावना वाढीस लागणे इ.), इतरांच्या भावनांची कदर नसणे, अलिप्तपणा असे अनेक बदल वर्तणूकीत आढळून येतात. त्याच बरोबर संशयीपणा, भास होणे, न झोपणे, उदासपणा, निराश होणे अशीही लक्षणे आढळतात. या सगळ्यासाठी आवश्यक ती औषधे देणे गरजेचे असते. त्याने वागणे नियंत्रणात राहणे शक्य होते, काळजीवाहकांवरचा भार हलका होतो.

मनोसामाजिक उपचार

स्मृतिभ्रंशावर उपाय करताना केवळ औषधे देऊन पुरत नाही. रुग्णाची स्मरणशक्ती, दैनंदिन कामे, वर्तणुकीच्या समस्या या सगळ्यांकरिता रुग्णाशी संवाद साधणे, वर्तणुकीचे उपाय (behavioural interventions) करणे उपयोगी असते. प्रशिक्षित मानसोपचार तज्ज्ञ आणि मनोविकारतज्ज्ञ रुग्णावर वैयक्तिक किंवा गटांमध्ये हे उपचार करतात. आता अनेक ठिकाणी मेमरी कॅफे, मेमरी क्लब निघाले आहेत. स्मरणशक्तीचे खेळ, व्यायाम या ठिकाणी उपलब्ध असतात, त्यांचा बुद्धीला, स्मरणशक्तीला चालना द्यायला चांगला उपयोग होतो. काही वेळेस, गटामध्ये उपचार करताना रुग्णांना जुने फोटो दाखवून, जुन्या स्मृती जागवून आपल्या भूतकाळातील आठवणी, अनुभव इतरांसमोर मांडायला प्रोत्साहन दिले जाते. स्मृतीवर झालेल्या परिणामावर लक्ष केंद्रित न करता जी स्मरणशक्ती अजून शाबूत आहे, त्याचा वापर केला जातो आणि ती त्या रुग्णाची ताकद ठरते. यातून भावनिक आधार मिळतो, आत्मविश्वास वाढतो, त्या सत्रात सगळ्यांबरोबर आपले अनुभव वाटून घेतल्याचा आनंद मिळतो. रुग्ण स्वतःला अधिक चांगले स्वीकारू लागतात.

रुग्ण आपल्या मनातील गोष्टी जमतील तशा व्यक्त करत असतात. मानसोपचारतज्ज्ञ त्या सगळ्यांतील भावना समजून घेतात, रुग्णाशी संवाद साधतात. अर्धवट व्यक्त झालेले, भाषेवर परिणाम झालेला असताना जमेल तसे मोडके तोडके सांगितलेलेसुद्धा ते ऐकून घेतात आणि त्या मागच्या भावना जाणून घेतात. यामुळे रुग्णाला बरे वाटते आणि त्यालाही एक व्यक्ती म्हणून सन्मान मिळतो. वर्तणुकीत झालेल्या बदलांसाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. रोजचा दिनक्रम नक्की करणे, वर्तणुकीच्या समस्या काही विशिष्ट कारणाने निर्माण होतात का ते कारण शोधणे, उदा. घरातून बाहेर जायला मिळाले नाही की, भूक लागली की, नातेवाईकाने सतत प्रश्न विचारले की; अशी कारणे लक्षात आली तर त्यावर उपाय करता येतात.

हेही वाचा…अभिनेत्री सोहा अली खान फिटनेससाठी उपाशीपोटी ‘अशाप्रकारे’ खाते खजूर; पण हे खरचं फायदेशीर ठरते का? डॉक्टर म्हणाले…

कॉग्निटिव्ह ट्रेनिंग

घरातून बाहेर जाणे, राग येणे, उत्तेजित होणे यामध्ये रुग्णाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी लागते. बौद्धिक क्षमतेवर सुद्धा काम करता येते. प्रॅक्टिस करून, काही ठराविक क्रम ठरवून काही कृती करण्याची सवय करता येते, त्या विसरणार नाहीत असा प्रयत्न करता येतो. बौद्धिक व्यायामांचाही उपयोग होतो. Cognitive training, cognitive rehabilitation असे हे काही उपाय केले जातात. Cognitive stimulation therapy ही सुद्धा काही ठिकाणी वापरली जाते. यात अस्तित्वात असलेली स्मरणशक्ती, इतर बौद्धिक क्षमता यांच्यावर काम केले जाते. यामध्ये चालू घडामोडींची चर्चा, रुग्णाची मते जाणून घेणे, त्यांना ती व्यक्त करायला सांगणे, एखादी थोडी क्लिष्ट कृती उदा. चहा करणे, रुग्णाकडून करून घेणे यातून बुद्धीला चालना मिळते. रुग्णाच्या कलात्मकतेला प्रोत्साहन देऊन चित्र काढणे, रांगोळी काढणे अशा क्रियांचाही उपयोग होतो. गटामध्ये खेळ खेळण्याने एकत्रितपणाची भावना निर्माण होते. जुन्या काळातील गाणी गाणे, ऐकणे, जुन्या चित्रपट नाटकांविषयी गप्पा मारणे याने आनंद मिळतो आणि स्मृतीला चालना मिळते. अशी विविध तंत्रे वापरून रुग्णाच्या आयुष्याची गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न केला जातो.

हेही वाचा…तापमानाचा वाढला पारा, लाडक्या पाळीव प्राण्यांचे आरोग्य सांभाळा! उष्णतेच्या लाटेमुळे कुत्रा-मांजरही त्रासले, अशी घ्या त्यांची काळजी?

डिमेन्शियाच्या उपचारांसाठी प्राण्यांचा वापर

आता परदेशांमध्ये प्राण्यांचा(विशेषतः कुत्रे) सुद्धा वापर डिमेन्शियाच्या रुग्णाला आधार मिळावा, सोबत मिळावीआणि संरक्षण मिळावे यासाठी केला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाचा डिमेन्शियाच्या उपचारांमध्ये आता वापर सुरू झाला आहे. औषधे घेण्याची आठवण करणे, घरातील कॅमेऱ्याच्या सहाय्याने एकट्या राहणाऱ्या रुग्णाच्या सुरक्षेची काळजी घेणे, वृद्ध व्यक्ती हरवू नये यासाठी ट्रॅकर वापरणे, तसेच स्मरणशक्तीचे व्यायाम, खेळ ही या तंत्रज्ञानाच्या उपयोगाची काही उदाहरणे! जसे या आजारचे प्रमाण वाढते आहे, तसे त्यावरील उपचारांवर अधिकाधिक लक्ष दिले जाते आहे. डिमेन्शियाच्या रुग्णाच्या काळजीवाहकांच्या समस्या हा ही महत्त्वाचा विषय आहे. त्या संबंधी पुढील लेखात.

Story img Loader