Birth Control Pill and Sex Drive : तीस वर्षीय राधिका गुप्ताच्या लग्नाला पाच वर्षे झाली आणि ती महिन्याच्या प्रत्येक २१ दिवसांनी गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करीत होती. कारण- तिला मूल लवकर नको होते. पण, आता तिची लैंगिक इच्छा खूप कमी झाली आहे आणि तिच्या मानसिक आरोग्यावरही गोळ्यांचा परिणाम दिसून येत आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांची भेट घेतल्यानंतर तिला कळले की, हे सर्व गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केल्यामुळे झाले आहे.
वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना धवन-बजाज सांगतात, “अनेक महिलांवर गर्भनिरोधक गोळ्यांचा काहीही परिणाम होत नाही; पण एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, १५ टक्के महिलांच्या लैंगिक इच्छाशक्तीवर याचा परिणाम होऊ शकतो.”
गर्भनिरोधक गोळ्यांचा स्त्रियांच्या लैंगिक इच्छेवर कसा परिणाम होतो?
गर्भनिरोधक गोळ्यांमुळे योनिमार्गात कोरडेपणा येतो; ज्यामुळे लैंगिक इच्छा कमी होते. अनेक महिला दीर्घ कालावधीसाठी गर्भनिरोधक गोळ्या घेतात आणि जेव्हा या गोळ्या घ्यायचे त्या बंद करतात तेव्हा त्यांना मासिक पाळी नीट येत नाही.
गर्भनिरोधक गोळ्यांचा व्यक्तीच्या शरीर आणि हार्मोन्सवर कसा परिणाम होतो?
गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन असतात आणि ते ओव्ह्युलेशनला झाकण्याचा प्रयत्न करतात. ओव्ह्युलेशन हा स्त्रियांच्या मासिक पाळीचाच एक भाग आहे. अंडाशयातून अंडी बाहेर येण्याच्या या प्रक्रियेला ओव्ह्युलेशन कालावधी, असे म्हणतात.
ओव्ह्युलेशनच्या काळात महिला सहजपणे गर्भधारणा करू शकतात. कारण- तेव्हा त्यांच्यामध्ये भरपूर प्रजनन शक्ती असते. गर्भनिरोधक गोळ्यांमधील इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे शरीरातील प्रकियेत हुबेहूब अनुकरण करू शकत नाहीत; ज्यामुळे मूड बदलणे, वजन वाढणे, योनीमार्गात कोरडेपणा जाणवणे इत्यादी दुष्परिणाम दिसून येतात.
त्याशिवाय शरीरात रक्ताच्या गाठी तयार होणे किंवा काही प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. काही तज्ज्ञांच्या मते- ज्या गोळ्यांमध्ये इस्ट्रोजन असते, त्या गोळ्या यकृतातील प्रोटिन्सची मात्रा वाढवतात. हे प्रोटीन्स टेस्टोस्टेरॉन हार्मोनला धरून ठेवतात. या कारणाने रक्तप्रवाहात कमी टेस्टोस्टेरॉन दिसतात. त्यामुळे लैंगिक इच्छा कमी होते.
हेही वाचा : Soaked Raisins : रात्रभर भिजवलेले मनुके खाणे का चांगले आहेत? जाणून घ्या मनुके खाण्याचे फायदे, तज्ज्ञ सांगतात…
काही प्रकरणांमध्ये गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानंतर महिलांचा मूड सतत बदलताना दिसून आला; ज्यामुळे त्या त्यांच्या जोडीदाराबरोबर नीट वागत नसल्याचे दिसून आले. अशा वेळी त्या व्यक्तीची मानसिक स्थिती पूर्ववत करण्यासाठी गोळी बंद करणे आवश्यक ठरते. अशी उदाहरणे खूप दुर्मीळ आहेत. तरीसुद्धा योग्य समुपदेशन आणि जीवनशैलीत केलेल्या बदलांमुळे तुम्हाला फरक दिसू शकतो.
गर्भनिरोधक गोळ्यांचा व्यक्तीच्या मूडवर कसा परिणाम होतो?
गर्भनिरोधक गोळ्यांमधील हार्मोन्स मेंदूमध्ये असलेल्या न्यूरोट्रान्समीटरवर परिणाम करतात. सेरोटोनिन आणि डोपामाइन हे हार्मोन्स मूड नियंत्रित ठेवण्याच महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
सुधारित गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची मात्रा खूप कमी आहे. त्यामुळे त्यांचेत जास्त प्रमाणा दुष्परिणाम जाणवत नाहीत. डॉक्टरांचा सल्ल्यानंतरच गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करा. त्याचबरोबर तीव्र डोकेदुखीचा त्रास, यकृताशी संबंधित आजार आणि ज्यांच्या कुटुंबात कोणाला कर्करोग झाला आहे, त्या महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या घेऊ नयेत.
गर्भनिरोधकासाठी सर्वांत सुरक्षित पर्याय कोणता?
जरी आता सध्या उपलब्ध असलेल्या अल्ट्रा-लो-डोज (ultra-low-dose ) गोळ्या अत्यंत सुरक्षित असल्या तरी स्त्रिया कंडोम आणि कॉपर आययूडी (copper IUDs)सारखे इतर प्रकार वापरू शकतात.