How Jasmine Bhasin’s Corneal Damage Incidence Happens : सोशल मीडियावरील यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुकवर अनेक रील्स, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये अनेक कलाकार त्यांना झालेल्या आरोग्य समस्यांबद्दल उघडपणे चर्चा करतात. तर जुलै २०२४ मध्ये जस्मिन भसीनला झालेल्या कॉर्नियल इजेबद्दल अलीकडेच तिने खुलासा केला. तसेच या दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरलेल्या गोष्टीसुद्धा सांगितल्या आणि नशीब सर्व काही ठीक आहे (शुक्र करो सब ठीक आहे) असेसुद्धा ती आवर्जून म्हणाली.
तर झाले असे की, जस्मिन एका कार्यक्रमासाठी दिल्लीला गेली होती. मेकअप करण्यापूर्वी तिने स्वतःच लेन्स घातल्या. पण, दुर्दैवाने एक तर लेन्सची मुदत संपली होती किंवा तिच्या नवीन घरकाम करणाऱ्या व्यक्तीने लेन्स सोल्युशनऐवजी तिथे टोनर ठेवला होता. पण, जेव्हा लेन्स लावल्या तेव्हा तिला थोडी जळजळ जाणवली. तेव्हा तिला ही गोष्ट सामान्य वाटली; पण तीन मिनिटांनंतर जेव्हा तिचे डोळे लाल होऊ लागले तेव्हा ताबडतोब तिने लेन्स काढल्या.
त्यानंतर ती कार्यक्रमासाठी मेकअप करण्यासाठी बसली. पण, तोपर्यंत लेन्स बॉक्समधील द्रावण (solution) आम्लात बदलले होते. पण, तिला कार्यक्रमाला उपस्थित राहावे लागणार होते. कारण- ती एक व्यावसायिक बांधिलकी होती. असह्य वेदना होत असतानाही जस्मिनने गॉगल घातले आणि तिच्या मॅनेजरला १० मिनिटांत कार्यक्रम संपवण्यास सांगितले. जस्मिन त्यावेळी रॅम्पवर चालली; पण तिला काहीही दिसत नव्हते, असे तिने हिंदी रशला सांगितले.
पण, कार्यक्रम जसा पार पडला, तशी जस्मिन आणि तिची टीम हॉस्पिटल शोधण्यासाठी निघाली. सर्वप्रथम ते एका ऑप्टिकल दुकानात गेले. कॉर्निया (cornea) खराब झाल्यामुळे नेत्रतज्ज्ञांनी जस्मिनला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितले. मग जस्मिन आणि तिची टीम सरकारी हॉस्पिटलमध्ये गेली. घरी परत येताना ते विमानाने आले आणि तेथे तिने उपचार घेतले.
कॉर्निया कोणती भूमिका बजावतो?
याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर दिलीप गुडे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, कॉर्निया दृष्टी केंद्रित करण्यात आणि डोळ्याच्या आतील संरचनेचे संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. कॉर्नियाला कोणतेही नुकसान झाल्यास वेदना, अंधुक दृष्टी, संसर्ग किंवा कायमची दृष्टी गमावणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
कॉर्नियलचे नुकसान कसे होते?
सूक्ष्मजीव दूषितता (Microbial contamination)
कालबाह्य झालेल्या कॉन्टॅक्ट लेन्स सोल्यूशनची एक प्रमुख चिंता म्हणजे सूक्ष्मजीवांच्या वाढीची क्षमता. एकदा द्रावण कालबाह्य झाले की, त्याची संरक्षक कार्यक्षमता कमी होते, ज्यामुळे त्यात जीवाणू, बुरशी किंवा अमीबा वाढू शकतात. जेव्हा असे दूषित सोल्यूशन वापरले जाते, तेव्हा ते जीवाणू थेट लेन्सवर आणि परिणामी कॉर्नियावर प्रवेश करू शकतात. त्यामुळे केरायटिससारखे गंभीर संक्रमण होऊ शकते. कॉर्नियाची जळजळ होण्यामुळे अल्सर, डाग किंवा दृष्टी कमी होऊ शकते, असे डॉक्टर दिलीप गुडे यांनी सांगितले.
रासायनिक विघटन (Chemical breakdown)
कॉन्टॅक्ट लेन्स आणि सोल्यूशनची रासायनिक स्थिरता कालांतराने बिघडते. कालबाह्य झालेली उत्पादने योग्य पीएच किंवा ऑस्मोलॅरिटी राखू शकत नाहीत आणि त्यामुळे डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा किंवा ॲलर्जीक प्रतिक्रिया होतात. हे रासायनिक असंतुलन कॉर्नियल एपिथेलियमशी तडजोड करू शकते, ज्यामुळे ते ओरखडे आणि संसर्गास अधिक संवेदनशील बनते, असे डॉक्टर दिलीप गुडे म्हणाले आहेत.
लेन्सची अखंडता (Lens integrity)
कालबाह्य झालेल्या लेन्स मटेरियलच्या क्षमतेमुळे ठिसूळ किंवा विकृत होऊ शकतात. विशेषतः जर ते योग्यरीत्या ठेवण्यात आलेले नसतील तर. त्यामुळे अशा लेन्स घालल्याने कॉर्नियल पृष्ठभागावर यांत्रिक ओरखडे येऊ शकतात, ज्यामुळे अस्वस्थता, कॉर्निया फाटणे किंवा संसर्गाचा धोका वाढू शकतो, असे डॉक्टर दिलीप गुडे म्हणाले आहेत.
तर अशा प्रकारच्या अडचणी कशा टाळायच्या?
१. लेन्स पॅकेजिंग आणि सोल्यूशन बाटल्यांवर नेहमी एक्स्पायरी डेट तपासा.
२. उत्पादकांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लेन्स आणि सोल्यूशन साठवा.
३. कधीही घरगुती किंवा ‘टॉप अप’ सोल्यूशन वापरू नका.
४. जर लेन्सचे पॅकेजिंग खराब झाले असेल किंवा एक्स्पायरी डेट संपली असेल तर ते टाकून द्या.
५. जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल, तर नियमितपणे डोळ्यांची तपासणी करा.