Breastfeeding Advantages : नवजात बाळाच्या झोपेच्या समस्यांमुळे अनेकदा पालकांना खूप त्रास सहन करावा लागतो. तुम्ही अनेकदा ऐकले किंवा वाचले असेल की बाळ रात्री अवेळी उठल्यामुळे पालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
अनेकदा बाळ केव्हाही जागे होते आणि रडायला लागते, तेव्हा आई बाळाला स्तनपान करते. यामुळे बाळ शांत होतं आणि रडणं थांबवतं. कधी कधी स्तनपानामुळे बाळ लवकर झोपी जातं. बाळाच्या शांत झोपेसाठी स्तनपान कसं फायदेशीर आहे, याविषयी बालरोगतज्ज्ञ हिमानी दालमिया यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली.

बाळाच्या जन्मानंतर पहिले चार महिने हा त्रास होणे स्वाभाविक आहे, पण स्तनपान करणाऱ्या आईला यामुळे अनेकदा थकवा जाणवू शकतो. यामुळे नवजात बाळाचे झोपेचे वेळापत्रक समजून घेणे हे गरजेचे आहे. त्यामुळे आईला मदत होऊ शकते.

sexual health to sleep
लैंगिक संबंधांमुळे खरंच चांगली झोप लागते का? यावर डॉक्टरांचे काय मत आहे? जाणून घेऊ…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
What to do after waking up in the morning for health
निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर काय करावं? आरोग्यतज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स
sleeping with elevated head
झोपताना डोक्याखाली उशी घेतल्याने काय परिणाम होतो? तज्ज्ञ काय सांगतात…
Does Sleeping in the Afternoon Really Lead to Weight Gain
Sleeping In Afternoon: दुपारी झोपल्यानंतर खरंच वजन वाढतं का? पाहा Viral Video
Masaba Gupta's Winter Breakfast
मसाबा गुप्ता हिवाळ्यात नाश्त्यामध्ये खाते बाजरीचे धिरडे; जाणून घ्या तज्ज्ञांकडून याचे फायदे
Are you skipping bhindi in winter
हिवाळ्यात आपण खरंच भेंडी खाणं टाळलं पाहिजे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात..
Shalini Passi share good sleep remedy
Shalini Passi : शालिनी पासीने सांगितला झोपेसाठी रामबाण उपाय; फक्त कोमट पाण्यात ‘हा’ पदार्थ मिक्स करून प्या; वाचा डॉक्टरांचे मत

हेही वाचा : व्यक्तीच्या वयापेक्षा त्याच्या हृदयाचे वय जास्त असेल तर येऊ शकतो हार्ट अटॅक? कसे जाणून घ्यायचे हृदयाचे वय? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात …

नवजात बाळांची (० ते ४ महिन्यांचे बाळ) झोप इतर मुलांपेक्षा थोडी वेगळी असते. यांना दिवसभर झोप लागते आणि भूक लागते. आहार आणि झोप यांच्या शरीराची गरज असते. पण, बाळांचे झोपण्याचे आणि आहाराच्या वेळापत्रकाचे कारण दिवसेंदिवस यांच्या गरजा बदलू शकतात.

पहिल्या दोन महिन्यांमध्ये बाळांना दिवस -रात्र कळत नाही. त्यांना झोपेचे हार्मोन मेलाटोनिन, गर्भाशयातून आणि आईच्या दुधातून मिळतात; त्यामुळे नवजात बाळ रात्री २ ते ४ दरम्यान झोपतात, तर सकाळी ११ ते १ च्या दरम्यान उठतात. सुरुवातीला झोपेचे वेळापत्रक असे असणे अत्यंत स्वाभाविक आहे. पालकांनी बाळाची झोपण्याची दिनचर्या सुरळीत होण्यासाठी थोडी वाट पाहावी.

जेव्हा आई बाळाला खाली ठेवते किंवा तिच्यापासून दूर करते, तेव्हा गाढ झोपेत असतानाही बाळ जागे होते, ही एक सामान्य गोष्ट आहे. त्यांच्याकडे एक भानविक सेन्स असतो, ज्यामुळे जवळच्या लोकांपासून वेगळे झाल्यानंतर त्यांना धक्का बसू शकतो.
यासाठी दिवसभर झोपताना बाळाजवळ राहा. ही कोणतीही वाईट सवय नाही, तर एक बायोलॉजिकल गरज आहे. जर तुम्हाला निरोगी बाळ हवे असेल तर अशा छोट्या गोष्टी टाळू नका. बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी शांत झोप अत्यंत महत्त्वाची आहे.

हेही वाचा : अ‍ॅनिमियासाठी ‘हा’ आहे बेस्ट डाएट प्लॅन, जेवण करताना चहा आणि कॉफी पिऊ नका, जाणून घ्या यामागची कारणे

बाळांना रात्री झोपताना बेडवर ठेवू शकता. नियमांचे पालन करून तुम्ही बाळाबरोबर बेड शेअर करू शकता. बाळाला झोपेच्या आधी किंवा झोपताना किंवा रात्री झोपण्यासाठी स्तनपान करावे. नवजात बाळाच्या शांत झोपेसाठी स्तनपान हे अत्यंत सोयीस्कर आणि फायदेशीर आहे. कारण आईच्या दुधात स्लीप हार्मोन्स असतात, ज्यामुळे स्तनपान केल्यानंतर बाळाला अनेकदा शांत झोप लागते.

नवजात बाळांसाठी संध्याकाळची वेळ ही अत्यंत गोंधळलेली असू शकते. बाळ सहसा दिवसाच्या वेळी रडतात आणि जास्तीत जास्त स्तनपान करतात. पण, संध्याकाळच्या वेळी आई बाळाला वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करते. पण, अनेकदा संध्याकाळी बाळ थकलेले असते, त्यामुळे झोपण्यास नकार देते आणि रडते. बाळ दिवसातून तीन तास, आठवड्यातून तीन वेळा आणि तीन आठवड्यांपेक्षा जास्त रडू शकते.

बाळ दिवसातून अनेकदा स्तनपान करतात. सायंकाळी त्यांना स्तनपान करण्याची आवश्यकता यासाठी भासते, कारणे ते रात्रीसाठी त्यांचे पोट भरतात. बाळ आईला स्तनपानासाठी दिवसभर मागणी करतात, पण सायंकाळीसुद्धा आईने बाळाला स्तनपान केले पाहिजे. बाळासाठी बालगीते म्हणावी किंवा बाळाला फ्रेश वातावरणात घेऊन जावे. नवजात बाळाची झोप ही अत्यंत गाढ असते. पालकांनी बाळाचा थकवा कसा टाळावा हे समजून घ्यावे, यामुळे मोठा फरक दिसून येईल.

Story img Loader