महिलांसाठी त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे खूपच महत्त्वाचं असतं. त्यामुळे ते कोणते कपडे परिधान करतात यावर त्यांचं आरोग्य अवलंबून असतं. आजकाल साध्या ब्रा खरेदी करण्याबरोबरच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करणं महत्त्वाचं मानलं जातं. जिमला जाताना योगा करण्यासाठी किंवा खेळण्यासाठी मुली वेगवेगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्स ब्रा वापरतात. मुलींना व्यायामाची गरज लक्षात घेऊन, वेगळी ब्रा खरेदी करावी लागते. एकाच प्रकारची ब्रा प्रत्येक व्यायामाकरिता वापरणं कठीण आहे. चुकीची सपोर्ट ब्रा घातली जाते, तेव्हा मोठी समस्या निर्माण होते. चुकीची ब्रा घातल्यानं तुम्ही अस्वस्थ तर व्हालच; शिवाय कोणत्याही प्रशिक्षणावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकणार नाही. त्यामुळे योग्य स्पोर्ट्स ब्रा निवडणं गरजेचं आहे.

वर्कआऊट आणि स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीजचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपण फिट आणि एनर्जेटिक बनतो. परंतु, वर्कआऊट करतेवेळी आपल्या कपड्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं असते. घट्ट कपड्यांमध्ये वर्कआऊट करणं अवघड होते. स्त्रियांना सैल कपड्यांमध्ये स्पोर्ट्स ब्रा घालण्याची आवश्यकता असते. स्पोर्ट्स ब्रा वापरण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे तुमच्या ब्रेस्टचा आकार व्यवस्थित राहतो. तसेच ब्रेस्टच्या लिगामेंट्सवर ताण पडत नाही.

Tips To Measure Your Blood Pressure
Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार
vidya balan reveals her weight loss struggle in one interview
विद्या बालनने कसं घटवलं वजन? अनुभव सांगत म्हणाली, “मी जितका व्यायाम केला तितकी जास्त जाड…”

स्पोर्ट्स ब्राशिवाय व्यायाम त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे महिलांना व्यायाम करतेवेळी स्पोर्ट्स ब्रा आवश्यक आहे. स्तन नाजूक असतात; ज्यांना संरक्षित करणं आवश्यक आहे. व्यायाम करताना सततच्या हालचालींमुळे नुकसान होऊ शकतं; शिवाय सामान्यत: काहीसे मोठे स्तन असलेल्या स्त्रियांना डोके, मान, पाठ व खांदे यांच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. डोके, मान, पाठ व खांद्यावर ताण आल्यामुळेही हे त्रास होऊ शकतात. स्पोर्ट्स ब्रा घातल्यानं या सर्व गोष्टी टाळता येतात.

श्वास घेण्याची क्षमता तपासा

वर्कआउटदरम्यान घाम येणं नैसर्गिक आहे; परंतु घाम येणं आणि अस्वस्थ वाटणं यात फरक आहे. उडी मारणे, धावणे अशा प्रकारच्या व्यायामासाठी उच्च प्रभाव असलेल्या स्पोर्ट्स ब्रा घ्या. कारण- यात तुमची बॉडी जास्त बाऊन्स होते. हाय स्पोर्ट्स ब्रा हालचाली कमी करतात. ज्या मुलींची ब्रेस्ट साईज मोठी आहे, त्यांनी मीडियम आणि हाय इम्पेक्ट ब्रा घालावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण- त्या तुमची छाती पूर्ण कव्हर तर करतातच; शिवाय तुम्हाला आरामदायी वाटते.

स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या

तुम्ही ब्राच्या पट्ट्या आणि खांदे यांच्यामध्ये दोन बोटं बसवू शकत आहात याची खात्री करा. असं झालं नाही, तर स्पोर्ट्स ब्राचे पट्टे तुमच्या खांद्याखाली यायला लागतील. जेव्हा तुम्ही हात उंचावाल किंवा खाली वाकाल तेव्हा ब्राचा पट्टा वर यायला नको. योग्य स्पोर्ट्स ब्राचा पट्टा पाठीवर योग्य बसायला हवा.

हेही वाचा गुडघ्यांना दुखापत न होऊ देता एखादी व्यक्ती आठवड्यातून किती अंतर धावू शकते? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर….

स्पोर्ट्स ब्राचे फायदे

स्पोर्ट्स ब्राचे फायदे असे की, ते स्त्रीच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करतात. योग्य प्रकारे बसणारी स्पोर्ट्स ब्रा परिधान केल्याने कम्फर्टेबल फिल मिळतो. वर्कआउटदरम्यान आत्मविश्वास वाढवते. हा आत्मविश्वास स्त्रियांना स्वतःला पुढे ढकलण्यास, उच्च ध्येयं ठेवण्यास आणि चांगले परिणाम प्राप्त करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे प्रेरणा आणि व्यायामाचा आनंद वाढतो. वर्कआऊट करतेवेळी तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घातल्यास तुम्हाला कूल आणि कम्फर्टेबल फिल मिळेल. रिमूव्हेबल पॅड्स असणारी ब्रा तुम्ही वापरू शकता.

हेही वाचा Health Special: पावसाळ्यात रक्तदाब वाढू शकतो!

चुकीची ब्रा घातल्यानंतर मुलींना अस्वस्थ तर वाटतंच; शिवाय त्या प्रशिक्षणावरही लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे चांगली आणि योग्य ब्राची खरेदी करणं आवश्यक आहे.