मागील लेखात आपण बीसीजी लसीच्या प्रौढांमधील वापराविषयी वाचलं. टीबीच्या उपचारामधले ढोबळ टप्पे पाहिल्यास त्याची लक्षणे ओळखून योग्य तपासणी करणे, टीबीचे निदान झाल्यास त्याचे उपचार लवकरात लवकर सुरु करणे, ते उपचार कोणताही खंड न पडता योग्य औषध घेऊन पूर्ण होतात याची खातरजमा करणे आणि शेवटी पुढे किमान सहा महिने त्याचा पाठपुरावा करणे हे आहेत. टीबीची लस घेतल्यास कदाचित या सगळ्या प्रक्रियेतून व्यक्तीला जावेच लागणार नाही असे आपले गृहीतक आहे. पण लस समाजात मूळ धरेपर्यंत या प्रक्रियेतून सुटणारी मंडळी नेहमीच असणार. ती महिन्यादोन महिन्याचा खोकला अंगावर काढणार, निदानास उशीर करणार, कदाचित निदान झाल्यावर औषधोपचारासाठी टाळाटाळ करणार, एक महिना गोळ्या घेऊन मधेच सोडून देणार, शहर सोडून दुसरेकडे जाणार, तिथे जाऊन टीबीचा प्रसार करणार. या प्रत्येक टप्प्यावर बारकाईने नजर ठेवणे हे भारतासारख्या टीबीची खूप रुग्णसंख्या असणाऱ्या आणि मर्यादित फौजफाटा असणाऱ्या देशात कठीण काम आहे. मागील अनेक दशके आपले डॉक्टर, नर्स, आशाच हे सगळं करत आहेत. पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयानंतर टीबीच्या या उपचार प्रक्रियेकडे वेगळ्या नजरेने बघता येईल याचा विचार सुरु झाला. AI आणि टीबीमध्ये देश हळूहळू प्रगती करताना दिसत आहे.
हेही वाचा : Health Special: कुंकू किंवा बिंदीची ॲलर्जी आल्यास काय कराल?
उपचार मध्यभागी सोडणाऱ्या रुग्णांचा आधीच अंदाज बांधण्यासाठी AI
टीबीचे अखंड उपचार पूर्ण करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण औषधं अर्धवट खाल्याने प्रतिकार निर्माण होतो आणि रोग गंभीर स्वरूप धारण करतो. तसेच तो आजूबाजूच्या लोकांना होण्याचा संभव असतोच. अशा रुग्णांचा अंदाज आपल्याला आधीच बांधता येऊ शकतो का? ते शक्य झाल्यास त्यांच्यावर उपचार सुरु होण्याच्या आधीपासूनच अधिक लक्ष दिले जाऊ शकते. AI च्या सहाय्याने असे prediction tool तयार केले जात आहे. निक्शय या सरकारी डेटाबेस मधून जवळपास ५ ते ८ लाख रुग्णांची आकडेवारी वापरून अल्गोरिदम तयार केला गेला आहे. व्यक्तीचे वय, लिंग, त्याची वैवाहिक आणि सांपत्तिक स्थिती, निदान ते उपचार सुरु करण्यामधील कालावधी, औषधोपचारातील सातत्य या सर्व वैशिष्ट्यांचा अभ्यास करून भविष्यात कोणत्या व्यक्ती उपचार अर्धवट टाकू शकतात यांचा अंदाज बांधला जाऊ शकतो. यामुळे रुग्णभेटी वाढवणे, त्यांना फोन किंवा automatic SMS द्वारे उपचाराविषयी सतर्क करणे असे उपाय करून या गळणाऱ्या मंडळींचा संख्या कमी केली जाऊ शकते
हेही वाचा : ‘या’ बियांच्या सेवनाने झपाट्याने वजन होईल कमी? कधी व किती सेवन करावे समजून घ्या तज्ज्ञांकडून…
निव्वळ खोकल्याचा आवाज ऐकून टीबीची छाननी
खोकला हे टीबीचे व्यवच्छेदक लक्षण. दोन आठवड्यापेक्षा अधिक खोकला असल्यास टीबीची चाचणी करा हे वाक्य आपण ऐकले आहे. अनेक संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे, की टीबीच्या रुग्णाचा खोकला हा इतर अनेक खोकल्यांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण असतो. पण त्यावरून टीबीचे निदान करण्यामध्ये व्यक्तीसापेक्षता येते. यावर उपाय म्हणून टीबी झालेल्या आणि न झालेल्या लक्षावधी लोकांच्या खोकल्याच्या नोंदी साठवून एक ॲप तयार करण्यात आले आहे. गावपातळीवर आरोग्यसेवकाने ॲप उघडायचे, संभाव्य रुग्णाने खोकायचे आणि ॲप तुम्हाला या टीबीचा रुग्ण असू शकतो का याची माहिती देते. आणि त्यानुसार रुग्णाच्या पुढील चाचण्या केल्या जातात.
रुग्ण टीबीच्या कोणत्या औषधांना दाद देत नाही हे ओळखण्यासाठी AI
टीबीचे निदान झाले की पुढचा टप्पा असतो, त्याला कोणत्या औषधांना resistance निर्माण झाला आहे ओळखणे आणि त्यानुसार उपचार सुरु करणे. यात जितकी अधिक अचूकता तितका रुग्ण आजारातून सुरळीत बाहेर पडण्याची शक्यता अधिक. यासाठी Line Probe Assay नावाची चाचणी केली जाते. ती जरा गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असते. यात टीबीच्या जीवाणूच्या गुणसूत्रांवरील प्रथिनांच्या रंगानुसार (यात अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात) रुग्ण कोणत्या औषधांना प्रतिसाद देईल हे कळते. हे प्रत्येक रंग वेगवेगळे करून त्याची संगती लावणे हे जिकीरीचे काम असते. AI चा वापर करून या चाचणीची विश्वासार्हता वाढवणे आणि वेळ कमी करणे याचे प्रयत्न चालू आहेत.
हेही वाचा : गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी आशेचा किरण! पूर्ण गुडघ्याऐवजी फक्त घर्षण झालेला भाग बदलून उपचार
छातीचा एक्स रे काही मिनिटांत वाचून टीबीचे निदान
२०२०-२०२१ मध्ये भारतातील एका सर्वेक्षणात असे लक्षात आले की, जर छातीचा एक्स रे काढला नसता तर ४०% हून अधिक रुग्णांचे टीबीचे निदान अंधारात राहिले असते आणि त्यांच्यातर्फे टीबीचा संसर्ग होतच राहिला असता. एक्स रेचा अभ्यास करून निदान करणारे तज्ज्ञ गावपातळीवर उपलब्ध होणे कठीण जाते. AI चा वापर करून एक अल्गोरिदम तयार केला गेला आहे ज्यामुळे छातीचा एक्स रे बघून एका मिनिटाच्या आत टीबीचे निदान होऊ शकते. मुंबईमध्ये प्रायोगिक तत्वावर हे सुरु झाले असून ३० ते ४०% ने टीबीचे निदान वाढले आहे. अनेक व्यक्ती आरोग्याच्या वेगळ्या तक्रारी घेऊन आले असताना त्यांचा एक्स रे काढला असता त्यातील २०% लोकांना टीबीचे निदान झाल्याचे आढळले. यावरून या चाचणीची अचूकता लक्षात येऊ शकते. मागील काही वर्षात टीबीचा चेहरा मोहरा खूप बदलला. लक्षणे बदलली, अनेक औषधांना दाद न देणारे प्रकार जन्माला आले. त्यामुळे आपल्या निदान आणि उपचारपद्धतीत बदल करणे भाग होते. यातील AI चा वापर टीबीविरुद्ध लढण्यासाठी नवे हत्यार देईल अशी आशा आहे.