आजच्या काळात शहरीकरणाचा वेग सातत्याने वाढत आहे. परिणामी, प्रदूषणही वाढत आहे. प्रदूषण हा आपल्या रोजच्या आयुष्यातील अविभाज्य भाग झाला आहे. कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी प्रदूषणाच्या संपर्कात आपण येतोच. प्रदूषणामुळे अनेक श्वसनासंबंधित विकार होत असतात, त्याचबरोबर हृदयावरही त्याचा परिणाम होत असतो. वायू प्रदूषणामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. पण हा धोका समजून घेतला, योग्य काळजी घेतली आणि हृदयाच्या आरोग्यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन केले, तर एखाद्या व्यक्तीला असलेला प्रदूषणसंबंधित हृदयाच्या समस्यांचा धोका लक्षणीयरित्या कमी करू शकतो.

सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या काळात ह्रदयाच्या आरोग्यासाठी निरोगी जीवनशैली आत्मसात करणे का गरजेचे आहे, याबाबत दिल्लीच्या फोर्टीस एक्स्कॉर्ट हार्ट हेल्थ इन्स्टिट्यूटच्या इंटनव्हेशनल कार्डिओलॉजी विभागाचे प्रिन्सिपल डायरेक्टर डॉ. नितीन चंद्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Air quality in Borivali and Malad is dangerous
बोरिवली, मालाडची हवा धोकादायक, महिन्यातील जवळपास वीस दिवस बहुतेक भागांत वाईट हवेची नोंद
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश

वायू प्रदूषण आणि ह्रदयासंबंधित विकार

संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, वायू प्रदूषणाच्या थेट संपर्कात आल्यास ह्रदयासंबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. पार्टिक्युलेट मॅटर (पीएम२.४ आणि पीएम१०), नायट्रोजन डाय ऑक्साइड (एनओ२) आणि कार्बन मोनॉक्साईड (सीओ) यांसारखे वायू प्रदूषक रक्तप्रवाहात शिरू शकतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होतो. त्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस (Atherosclerosis) स्थिती निर्माण होते, ज्यामध्ये रक्तवाहिन्या जाड होतात किंवा कडक होतात. एथेरोस्क्लेरोसिसची स्थिती हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याचे एक प्रमुख कारण आहे.

प्रदूषणासंबंधित ह्रदयाच्या समस्या कशा टाळता येतील?

१) वायू प्रदूषणाच्या संपर्कात येणे टाळा.
मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असलेल्या ठिकाणी राहताना निरोगी जीवनशैलीचे पालन करण्यासाठी घराबाहेर पडून व्यायाम करणे टाळा. विशेषत: तेव्हा, जेव्हा प्रदूषणाची पातळी जास्त असते. त्याचबरोबर घरामध्ये एअर प्युरिफायर बसवून घ्या, जेणेकरून घरातील हवेतील गुणवत्ता सुधारेल. याव्यतिरिक्त, वाहने आणि औद्योगिक स्त्रोत या दोन्हींमधून होणारे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने आखलेल्या धोरणांचे आणि उपक्रमांचे समर्थन करणे आणि त्यात सक्रियपणे सहभागी होणे महत्वाचे आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील हवेची गुणवत्ता सुधारा. घरात आणि कामाच्या ठिकाणी हवा खेळती राहील याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे; जेणेकरून घरातील किंवा ऑफिसमधील हवेची गुणवत्ता सुधारेल. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुम्ही घरात अथवा ऑफिसमध्ये काही रोपे लावू शकता अथवा धूम्रपान टाळू शकता. त्यामुळे घरात किंवा ऑफिसमध्ये होणारे वायू प्रदूषण लक्षणीयरित्या कमी होईल.

२) प्रदूषणयुक्त जगात हृदयाच्या आरोग्यासाठी निरोगी जीवनशैली निवड करा

१) आहार आणि पोषकतत्व : हृदयाच्या आरोग्यासाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करताना आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्स, लीन प्रोटीन्सचा समावेश करा. जास्त प्रदूषणाची पातळी असल्यास तुमच्या शरीरात फ्री रॅडिकल्स सोडले जातात, ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण किंवा सेल्युलर नुकसान होऊ शकते आणि अकाली वृद्धत्वाच्या समस्या निर्माणा होऊ शकतात. या रॅडिकल्सपासून शरीराला सुरक्षित ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि इ हे शक्तिशाली ऑक्सिडंट म्हणून काम करतात. त्यामुळे प्रदूषणामुळे निर्माण होणारा ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी आणि इ सारख्या अँटीऑक्सिडंटचा समावेश करणे शहाणपणाचे ठरेल. उदाहरणार्थ, बदाम हा ‘व्हिटॅमिन इ’ने समृद्ध असलेला चांगला स्त्रोत आहे, तर ॲवकाडोमध्ये व्हिटॅमिन सी आणि इ दोन्ही पोषकतत्त्व मिळतात.

२) नियमित व्यायाम करा : व्यायाम करण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते आणि प्रदूषणामुळे होणारे नकारात्मक प्रभाव दूर करते. जर शक्य असेल तर प्रदूषण कमी असलेल्या, हिरवळ असलेल्या ठिकाणी व्यायाम करा.

३) ताणतणाव कमी करणे : दीर्घकाळ तणावाखाली असल्यास प्रदूषणामुळे हृदयावर होणारे हानिकारक परिणाम वाढू शकतात. त्यामुळे तणाव कमी करणाऱ्या गोष्टी जसे की, ध्यान, योगा यांचे पालन करा.

४) औषोधोपचार आणि वैद्यकीय तपासण्या : जर तुम्हाला आधीपासून हृदयासंबंधित समस्या असतील, तर हृदयाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी योग्य औषध आणि नियमित तपासणीसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Story img Loader