Eye Flu : आय फ्लू हा डोळ्यांचा आजार पावसाळ्यात तेजीने वाढतो. सध्या देशभरात आय फ्लूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. पण, आय फ्लू नेमका कसा होतो? त्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि या आजाराच्या स्टेजेसनुसार कोणते औषध घ्यावे, याविषयी पुण्यातील नामवंत नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश पवार यांनी लोकसत्ताशी बोलताना सविस्तर माहिती सांगितली.

आय फ्लू म्हणजे काय?

डॉ. राजेश पवार सांगतात की, आय फ्लू हा एक प्रकारचा डोळ्याचा संसर्ग असतो. यामध्ये डोळ्याला खाज येणे, डोळे सुजणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, पापण्यांवर सूज येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. यालाच कंजक्टीविटिस (Conjunctivitis) सुद्धा म्हणतात.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
Maharashtra News Updates
Maharashtra Assembly Special Session : पराभूत उमेदवारांची शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक सुरू
land records department will provide online property title change notices to postal department
मालमत्तेसबंधीत टपाल विभागाला ऑनलाईन नोटीस… काय होणार परिणाम ?
Sharad Pawar Speaking At Markadwadi.
Sharad Pawar : मी काय चुकीचं केलं? मारकडवाडीतील ग्रामस्थांसमोरच शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
Iltija Mufti news
Iltija Mufti : “हिंदुत्व हा एक आजार, कारण..”; रतलामचा व्हिडीओ पोस्ट करत इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त वक्तव्य

हेही वाचा : Tea At Evening : चहाप्रेमींनो, संध्याकाळी चुकूनही घेऊ नका चहा; नाही तर भोगावे लागू शकतात हे गंभीर परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात ….

आय फ्लूसाठी कोणते औषध घ्यावे?

डॉ. पवार सांगतात की, आय फ्लू कोणत्या स्टेजवर आहे, त्यानुसार औषध घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी आय फ्लूचे तीन स्टेजमध्ये विभाजन केले. ते सांगतात, “पहिल्या स्टेजमध्ये व्यक्तीला सौम्य डोळ्यांचे दुखणे जाणवत असतील तेव्हा अॅंटीबायोटिक घ्यावे, पण जेव्हा डोळ्यांचा त्रास तीव्र स्वरुपाचा असेल तेव्हा ही दुसरी स्टेज समजावी. यावेळी अँटीबायोटिक स्टेरॉइड (Antibiotics with Steroid) घ्यावे. तिसऱ्या स्टेजमध्ये डोळ्यांची तीव्र वेदना, डोळे सुजणे, पापण्या सुजणे ही लक्षणे दिसली तर अँटीबायोटिक स्टेरॉइडसह (Antibiotics with Steroid) पोटातील औषधे (Oral Medicine) घ्यावी.”

आय फ्लूची सुरुवातीला लक्षणे दिसताच एक घरगुती उपाय करण्याचाही सल्ला डॉ. पवार यांनी दिला आहे. डॉ. पवार सांगतात की, कोमट पाण्यात स्वच्छ कापूस ओला करून त्याने डोळे पुसावे. यामुळे डोळ्यातील इन्फेक्शन बऱ्यापैकी कमी होऊ शकतं.

हेही वाचा : Antibiotics : तुम्ही सर्दी-तापासाठी अँटीबायोटिक्स घेता का? आताच थांबवा, नाहीतर भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम; वाचा तज्ज्ञ काय सांगतात… 

आय फ्लू पसरू नये यासाठी काय करावे?

डॉ. राजेश पवार सांगतात, “पावसाळ्यात आय फ्लू पसरण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशावेळी पावसाळ्यात पाण्याच्या ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. सॅनिटायझरचा वापर करा. कोरोना काळात ज्याप्रमाणे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आपण सॅनिटायझरचा वापर करायचो, त्याप्रमाणे तुम्ही आताही सॅनिटायझरचा वापर करू शकता. याशिवाय सार्वजानिक ठिकाणी वावरताना गॉगल वापरा. आय फ्लूपासून वाचण्यासाठी स्वच्छता ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे. “
डॉ. राजेश पवार पुढे सांगतात, “आय फ्लूची लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टरांनी तपासल्यानंतर तुमचा आजार किती गंभीर आहे, यावरून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावी.”

Story img Loader