करोना संकटाच्या काळात जी मुलं टीनएजर झाली किंवा वयात आली त्या मुलांमध्ये जे अगणित बदल त्या दोन वर्षांनी केले आणि त्याचे परिणाम जे आता दिसू लागले आहेत, त्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे पॉर्न अ‍ॅडिक्शनचा. करोना काळात शाळा ऑनलाईन गेल्यावर ज्या मुलांकडे फोन नव्हते त्यांच्याकडेही फोन आले. देऊ केलेल्या फोनबद्दल पालक आणि मुलं यांच्या विशेष संवाद होऊ शकला नाही. आपण मुलांना ऑनलाईन शाळेसाठी गॅजेट देऊ करतो आहे एवढाच विचार पालकांनी केला पण हातातल्या गॅझेटमध्ये इंटरनेट आहे आणि मुलांपर्यंत पोहोचणारी माहिती अमर्याद आहे, त्यामुळे त्याविषयी मुलांना जागतं करायला हवं हे पालकांच्या लक्षात आलं नाही म्हणा किंवा त्यांना त्याची गरज तितकीशी तीव्रपणे वाटली नाही म्हणा. जे असेल ते. पण आज वयवर्षे १० पुढे मुलामुलींमध्ये पॉर्न बघण्याचं प्रमाण प्रचंड आहे.

आणखी वाचा: Mental Health Special: शाळकरी मुलांहाती मोबाईल …

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Nagpur Prostitution , college girls Prostitution Nagpur,
नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच

दरवेळी मुलं पॉर्न साईट्सवर जाऊन पॉर्न बघतात असं नाहीये. युट्युबवर विविध प्रकारचे व्हिडीओज जसे आहेत तसेच पॉर्न आणि सॉफ्ट पॉर्न कॅटेगरीमधले व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे फेसबुक, इंस्टाग्राम या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हार्ड आणि सॉफ्ट पॉर्न कन्टेन्ट सहज उपलब्ध आहे. व्हाट्सअँप वरुन मोठ्या प्रमाणावर पॉर्न क्लिप्स व्हायरल/फॉरवर्ड होतात. अनेकदा आईबाबांच्या मोबाईलच्या गॅलरीत हे सगळं तसंच पडलेलं असतं. जे मुलं तिथे जाऊन बघतात. खरं सांगायचं तर पॉर्न मुलांपर्यंत चोहोबाजूंनी पोहोचत आहे. ते सोशल मीडियावर आहे, गेमिंगमध्ये आहे. इंटरनेटवर तर सहज उपलब्ध आहे. गुगल इमेजेसमध्ये आहे. युट्युबवर आहे. पॉर्न कंटेण्टचा ग्राहकही आता टिनेजर्सच आहेत. इंटरनेटवर सगळ्यात जास्त काय चालतं तर सेक्स आणि हिंसा. या दोन्ही गोष्टींना प्रचंड मोठा ग्राहकवर्ग आहे आणि त्यात टीन्सचा समावेश प्रचंड आहे.

आणखी वाचा: सर्फिग : हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा

आता मुद्दा असा येतो की पूर्वीच्या पिढ्या पिवळी पुस्तकं आणि रात्री उशिरा लागणारे A सिनेमे चोरून बघत नव्हते का? तर बघतच होते. पण २४/७ त्यांच्या खिशात पॉर्न उपलब्ध नव्हतं. त्यामुळे त्यांच्या इतर रोजच्या जगण्यात अडथळे येत नव्हते. आता काय होतंय की मुलांकडे स्वतःचे फोन आहेत आणि त्यात पॉर्न सहज उपलब्ध आहे. त्यामुळे लक्ष विचलित करणारे अनेक घटक त्यांच्या रोजच्या जगण्यात शिरले आहेत. आमच्याकडे येणारी अनेक मुलं तासनतास टॉयलेटमध्ये जाऊन बसतात असं अनेक पालक सांगतात. ती तिथे अर्थातच पॉर्न बघण्यासाठी जातात हे मुलांशी खोलात जाऊन बोलल्यावर लक्षात येतं. बरं पालकांचा ‘टॉयलेट टाइम’ इतका प्रचंड असतो की त्यांना मुलांना विशेष काही म्हणता येत नाही. लैंगिकतेबद्दलच्या चुकीच्या कल्पना तयार होण्यापासून हिंसक पॉर्न बघण्यापर्यंत अनेक गोष्टी मुलं करत असतात. MILF आणि DILF (मदर /डॅड आय लाईक टू फक) सारखे व्हिडीओ बघितले जातायेत. मुलं हे सगळं कुतूहलापोटी, पीअर प्रेशर आणि स्वीकाराच्या गरजेतून करताहेत. आणि त्यांच्याशी या विषयावर कुणीही बोलत नाहीये.

पालकही तेव्हाच अलर्ट होतात जेव्हा मुलांना शाळा कॉलेजमध्ये कमी मार्क मिळायला लागतात, ते नापास होतात किंवा त्यांच्या वर्तनात काहीतरी मूलभूत मोठे बदल होतात. तोवर मुलं त्यांच्या फोनच्या जगात शिरुन काय करत आहेत, त्याचे त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतात, त्यांच्या जाणिवा विकसित होण्याच्या प्रक्रियेत अडथळे तर येत नाहीयेत ना, लैंगिकतेकडे ते कसं बघतायेत, त्याविषयी त्यांना काही प्रश्न आहेत का, स्वतःच्या लैंगिकतेचा विचार टीन्स कसा करु बघतायेत, पॉर्न बघून बघून सेक्स विषयीचे त्यांचे विचार कशा पद्धतीने तयार होतायेत, लैंगिक जीवनातला ‘परवानगी’ हा विचार रुजतोय की नाही, ते डेटिंग करत असतील तर त्यांच्या पार्टनरशी त्यांचं वर्तन कसं आहे, पॉर्नच्या जगात दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात करुन बघण्याची ओढ कितपत आहे या कशाकडेही बऱ्याचवेळा पालकांचं लक्ष नसतं. या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने मुलांना आपोआप समजतील किंवा ते समजून घेतील असा समज अनेकदा पालकांमध्ये असतो. त्यामागे त्यांचं अज्ञान हा मुद्दा जसा असतो तसंच मुलांशी बोलण्याबाबतचा त्यांच्या स्वतःचा अवघडलेपणाही असतो.

पण पालक अवघडले म्हणून मुलांचे प्रश्न सुटत नाहीत. उलट ते अधिक जटील आणि गुंतागुंतीचे होतात. आणि मुलं हळूहळू पॉर्नच्या व्यसनात अडकतात. पॉर्न ऍडिक्शनकडे आपल्या मुलामुलींचा प्रवास होऊ नये असं वाटत असेल तर त्यांच्याशी बोलायला हवं. तेवढा एकच मार्ग आपल्या हातात आहे.

Story img Loader