त्या साधारण साठीच्या. नातवंडांकडून मोबाईल वापरायचा कसा, गुगलवर सर्च कसं करायचं, ऑनलाईन शॉपिंग कसं करायचं हे सगळं त्यांनी शिकून घेतलेलं होतं. आणि त्या व्यवस्थित वापरायला लागल्या होत्या. एक दिवस त्यांना कुठल्याशा कंपनीच्या काही वस्तू हव्या होत्या. हर्बल शाम्पू, साबण अशी चार पाच गोष्टींची त्यांची लिस्ट होती. बाजारात वस्तू कुठे मिळतात याची शोधाशोध करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंग केली की घरपोच येईल असा विचार करुन त्यांनी गुगलवर सर्च केलं. त्यांना ज्या कंपनीची उत्पादने हवी होती, त्या कंपनीचा एक नंबर त्यांना गुगलवर दिसला. त्यांनी तो लावला.

समोरुन कंपनीच्या विविध उत्पादनांची व्यवस्थित माहिती, वस्तूंच्या किमती वगैरे सांगण्यात आल्या. त्यानंतर त्या आजींनी त्यांना हव्या असणाऱ्या उत्पादनांची ऑर्डर दिली. पैसे भरल्यानंतरच उत्पादन मिळेल असे सांगण्यात आले व दिलेल्या नंबरवर ऑनलाईन पेमेंटची सोय आहे असे सांगण्यात आले. आजींनी दिलेल्या नंबरवर पैसे ट्रान्स्फर केले. पुढच्याच चार दिवासात कुरियरने सगळी उत्पादने त्यांना घरपोच मिळतील असे सांगण्यात आले. पण चार काय आठवडा उलटून गेला तरी उत्पादने त्यांना मिळाली नाहीत. त्यांनी केलेल्या नंबरवर परत फोन करण्याचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही. मग नातवाच्या साहाय्याने नेटवर शोधाशोध केली, त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन तिथे दिलेल्या नंबरवर कॉल केल्यावर त्यांची ऑर्डर कंपनीकडे गेलेलीच नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू

हेही वाचा : तरुणांमध्ये स्ट्रोकचा धोका का वाढतोय? याला तणाव अन् प्रदूषण जबाबदार आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

इथे घडलं काय?

तर कस्टमर केअर नंबर जो त्यांनी गुगल सर्च मध्ये शोधला तो खोटा होता. फेक होता. त्या नंबरवर त्यांना माहिती सगळी मिळाली, पण तो नंबर सायबर गुन्हेगारांचा असल्याने आजींनी पैसे ट्रांसफर केले पण उत्पादन त्यांना मिळाले नाही.

असे कुठे कुठे घडू शकते?

कस्टमर केअर नंबरच्या बाबतीत अनेक प्रकारे सायबर गुन्हे आज घडत आहेत. बँक, विविध उत्पादने विकणाऱ्या कंपन्या, विमानाची तिकिटे, खाद्यपदार्थ कंपन्या अशा अनेक ठिकाणी कस्टमर केअर नंबर फ्रॉड्स होतात.

ग्राहक का फसतात?

गुगल पेजवर ‘suggest an edit’ असा पर्याय असतो. म्हणजे दिलेल्या माहितीत योग्य बदल करा. अनेक सायबर गुन्हेगार याचा फायदा घेतात. कस्टमर केअर नंबर बदलतात. आणि स्वतःचे नंबर त्यात टाकतात. त्यामुळे ग्राहकांनी गुन्हेगारांच्या नंबरवर कॉल केला की ते सहज सायबर फसवणुकीच्या सापळ्यात अडकतात.

हेही वाचा : Health Special: उचकी का लागते आणि त्यावर उपाय काय?

काय करावे?

कुठल्याही कंपनीची कुठलीही सेवा हवी असेल तर त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे जो कस्टमर केअर नंबर दिलेला असतो त्यावर नेहमी कॉल करावा. गुगल सर्च मध्ये येणारे नंबर फेक असू शकतात हे ध्यानात ठेवले पाहिजे. बँकांचे टोल फ्री नंबर डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या मागे दिलेले असतात. किंवा कार्डबरोबर जे पत्र येतं त्यातही दिलेले असतात. ते लिहून ठेवावेत. तसेच बँकांच्या अधिकृत साईट्सवरही ते असतात. तेच वापरावेत.
गुगलवर माहिती सहज उपलब्ध असते, पण ती खरी असेलच असं नाही. त्या माहितीची पडताळणी झालेली असतेच असं नाही हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे.

सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असतात. आपण मोठ्या कष्टाने कमावलेले पैसे सहजपणे आपल्याकडून काढून घेण्यासाठी सतत नवीन नवीन फसवणुकीचे प्रकार पुढे येताना दिसतात. त्यामुळे सायबर जगात वावरताना आपण सजग राहिलेच पाहिजे.