वनस्पतीजन्य पदार्थांसह अनेक आहारातील योग्य बदल मधुमेह असलेल्या लोकांसाठी अनेक सुधारात्मक पावलांपैकी एक ठरु शकतात. परंतु याचा अर्थ असा नाही की, वजन कमी करण्यासाठीचा तुमचा व्यायाम, औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल या तुमच्या ठरलेल्या रुटीनमध्ये शॉर्टकट घेऊ शकता. अनेक वनस्पतींपासून बनवलेल्या खाद्यपदार्थांमध्ये नैसर्गिक संयुगे आणि पोषक घटक असतात जे रक्तातील साखर नियंत्रणास मदत करतात. त्यापैकी, शेवग्याची पाने, ज्याला ड्रमस्टिक पाने म्हणून ओळखली जातात. प्राण्यांवर केलेल्या एका प्रयोगांमध्ये प्रीडायबेटिस आणि टाइप २ मधुमेहामध्ये रक्तातील साखर कमी करण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. परंतु मानवी चाचणीदेखील आवश्यक आहे. मधुमेह आणि इतर आरोग्य परिस्थितीसाठी शेवग्याची पाने काय कार्य करतात हे डॉ. व्ही. मोहन, अध्यक्ष, डॉ मोहन डायबिटीज स्पेशॅलिटी सेंटर, चेन्नई यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे ते जाणून घेऊया.
शेवगा आणि रक्तातील साखर –
शेवगा हा इन्सुलिनचा एक चांगला उत्पादक आहे, तो संवेदनशीलता आणि स्नायू आणि यकृताद्वारे ग्लुकोजचे शोषण करतो आणि लहान आतड्यांद्वारे शोषलेल्या ग्लुकोजचे प्रमाण कमी करतो असे मानले जाते. इन्सुलिन वनस्पतींद्वारे तयार केले जाऊ शकत नाही, ते केवळ प्राणी आणि मानवांमध्ये तयार केले जाऊ शकते. आजपर्यंत, प्लांट डेरिव्हेटिव्हमध्ये इन्सुलिनच्या जनुक क्रमाची डुप्लिकेशन दाखवणारा कोणताही अभ्यास झालेला नाही. तर शेवगा रक्तातील साखर नियंत्रित करण्यास कशी मदत करतो? याचे कारण म्हणजे, शेवग्यामध्ये आयसोथियोसायनेट्स असतात, ज्यामुळे मधुमेहाची समस्या उशिरा उद्भवते हे उंदरांवर केलेल्या प्रयोगांमध्ये सिद्ध झालं आहे.
हेही वाचा- Heart Attack : महिलांमध्ये वाढत आहे हार्ट अटॅकचा धोका; ‘या’ गोष्टी आहेत कारणीभूत
PubMed मधील २०१९ च्या प्रयोगात असे आढळून आले की, शेवग्याच्या पानांपासून तयार केलेले आणि २०० आणि ५०० mg/kg या प्रमाणात दिलेली प्रथिने मधुमेहाच्या उंदरांमध्ये लक्षणीय हायपोग्लाइसेमिक प्रतिसाद निर्माण करण्यास सक्षम होते. परंतु प्रथिने ९८ अंशापर्यंत गरम केल्यानंतर त्याचा प्रभाव कमी झाला. हेच कारण आहे की शेवग्याची पाने जास्त शिजवण्यासाठी सांगितलेलं नाही. ही पाने जास्त शिजवल्यास त्यातील फायबर सामग्री कमी होऊ शकते, जी तुमचे पोट जास्त काळ भरल्यासारखे ठेवते, पचनास विलंब करते आणि जेवणानंतर लगेचच रक्तातील साखरेची वाढ नियंत्रित करते. शिवाय ड्रमस्टिकमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे पाने आणि देठ एकत्र ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
सुदैवाने, भारतामध्ये शेवग्याच्या झाडाचा सर्व भाग, देठ, पाने आणि शेंगा, त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी वापरला जातो. एक कप पानामध्ये सुमारे २० ग्रॅम प्रथिने, जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि ई, फोलेट, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमसह खनिजे असतात. शेंगा आणि हिरव्या पालेभाज्या यांसारख्या फोलेट-समृद्ध अन्नांपेक्षा मानवी शरीर शेवग्याच्या पानांमधून फोलेट अधिक सहजपणे शोषून घेते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यात आणि अॅनिमियापासून बचाव करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे. शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, जे मुक्त रॅडिकल्स नष्ट करतात, ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करतात, जे मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग होण्यास कारणीभूत ठरतात.
शेवग्याची पाने हे आहारातील फायबर, ओमेगा – ३ आणि ओमेगा -६ फॅट्स, बीटा-कॅरोटीन आणि फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक ऍसिडस्, ग्लुकोसिनोलेट्स आणि कॅरोटीनोइड्ससह इतर अनेक अँटिऑक्सिडंट यांचा देखील चांगला स्रोत आहेत. डॉक्टर मोहन पुढे सांगतात की, शेवग्याचे वरील फायदे लक्षात घेता, शेवग्याची पाने हिरव्या पालेभाज्या म्हणून घ्या. तसेच या पानांना मधुमेहावरील उपचार म्हणून नव्हे तर रोगाच्या प्रगतीस प्रतिबंध करणारे अन्न म्हणून पहा असंही त्यांनी सांगितलं.
२०१४ मधील एका अभ्यासात ४५ ते ६० वयोगटातील महिलांमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीवर ७ ग्रॅम शेवग्याच्या पानाच्या पावडरचा परिणाम तपासण्यात आला. ज्यांच्या उपवास रक्तातील ग्लुकोजची पातळी १०६.७ mg/dL ने सुरू केली आणि त्यानंतर ३ महिने दररोज सेवन केल्यानंतर ते ९१.५mg/dL पर्यंत कमी झाल्याचं आढळलं.
अल्जेरियातील शास्त्रज्ञांच्या पथकाने उकडलेले तांदूळ आणि उंटाच्या मांसाच्या पारंपारिक जेवणात २० ग्रॅम शेवग्याच्या पानाची पावडर टाकून रक्तातील साखरेवर टाईप २ मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या परिणामांचा अभ्याल केला. अभ्यासात फक्त २७ लोक सहभागी होते. इतर जेवणाच्या तुलनेत शेवगा असलेल्या जेवणामुळे रक्तातील ग्लुकोजची सरासरी वाढ लक्षणीयरीत्या कमी झाल्याचं दिसून आलं.