तुम्हाला टॅटू काढण्याची इच्छा असेल तुम्हाला त्याबाबत सविस्तर माहित असणे आवश्यक आहे. या पूर्वीच्या लेखात आपण टॅटू काढणे सुरक्षित आहे का? टॅटू काढण्यामुळे होणारे आजार आणि आरोग्य धोक्यांबाबत जाणून घेतले. या लेखात आपण टॅटू काढताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. टॅटू कुठे काढावा, कुठे काढू नये? टॅटू काढताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि टॅटू काढल्यानंतर काळजी कशी घेतली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

टॅटू काढताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, याबाबत मुंबई आणि लंडन येथील ‘बॉडीकॅनव्हास टॅटू’चे सह-संस्थापक, टॅटू कलाकार विकास मलानी यांनी ‘लोकसत्ता’ला सविस्तर माहिती दिली.

रात्री गाडी चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ‘या’ टिप्स करतील मदत
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Making modak for beloved bappa
लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे
How do you manage salary expenditures
कर्मचाऱ्यांनो​, महिन्याचा पगार लगेच संपतो; पगाराचे कसे नियोजन करावे? जाणून घ्या, खास टिप्स
market outlook, industrial smart cities, government announcement, GDP growth, fiscal discipline, infrastructure investment, stock market,
बाजार रंग : चाचणी परीक्षा आणि कंपन्यांचा अभ्यास
How to unsend an email in Gmail
How to undo Gmail : एकदा पाठवलेला मेल आता ‘Undo’ करता येणार; फक्त ‘या’ चार स्टेप्स फॉलो करा
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज
Why every sister should also promise to protect her brother this Raksha Bandhan
प्रत्येक बहिणीने आपल्या भावाचे का केले पाहिजे रक्षण? लक्षात ठेवा या ६ महत्त्वाच्या गोष्टी

टॅटू काढण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? (What things should be taken care of before getting a tattoo?)

  • टॅटू स्टुडिओ स्वच्छ असल्याची खात्री करा आणि कलाकार योग्य स्वच्छता आणि सुरक्षितता प्रक्रियांचे पालन करत आहे याची खात्री करा.
  • टॅटू काढण्यासाठी वापरले जाणारे उत्पादन, आरोग्य आणि सुरक्षिततेबद्दल माहिती असली पाहिजे. स्टुडिओमध्ये निर्जंतुकीकरण उपकरणांसाठी एक ऑटोक्लेव्ह असावा आणि कलाकाराने प्रत्येक टॅटूसाठी नवीन सुया आणि हातमोजे वापरले आहेत याची खात्री करावी.
  • टॅटू उत्पादने कोठून मागवली आहेत, कोणत्या ब्रँडची आहेत हे जाणून घ्या.
  • टॅटू काढण्यापूर्वी तुमची त्यामागील संकल्पना किंवा डिझाइन समजून घेण्यासाठी कलाकाराने योग्य सल्ला आणि वेळ दिला आहे का याची खात्री करा.

हेही वाचा – टॅटू काढताना वापरलेली शाई आणि सुई सुरक्षित आहे का? टॅटूमुळे आरोग्याला धोका होऊ शकतो का?

टॅटू काढताना कोणत्या प्रकारची स्वच्छता तपासली पाहिजे? (What type of Hygiene, Cleanliness we should Check Before Getting ?)

  • टॅटू कलाकार यांची वैयक्तिक स्वच्छता.
  • टॅटू स्टुडिओ स्वच्छ आहे का ते पाहा.
  • ऑटोक्लेव्ह मशीन आहे का ते पाहा. (ऑटोक्लेव्ह हे एक मशीन आहे, जे उपकरणे आणि इतर वस्तू निर्जंतूक करण्यासाठी वाफेचा वापर करते.)
  • टॅटू कलाकार डिस्पोजेबल सुया वापरत आहे का? टॅटूसाठी कोणती शाई वापरत आहे आणि टॅटू काढताना हातमोजे वापरत आहे का?
  • टॅटू बनवण्याच्या प्रक्रियेत तो ज्याला स्पर्श करतो, त्या प्रत्येक गोष्टीला क्रॉस कंटामिनेशन (दूषित होणे) टाळण्यासाठी क्लिंग रॅपने गुंडाळले जाते आहे का हे तपासावे.
  • टॅटू काढताना कलाकार त्याच्या फोनला किंवा त्याच्या मशीनशिवाय कशालाही स्पर्श करत नाही ना याची खात्री करा. जर त्याने कशालाही स्पर्श केला असेल तर त्याने हातमोजे काढले आणि पुन्हा सुरू करण्यासाठी त्याने हातमोजे घातले आहेत याची खात्री करा.
  • टॅटू कलाकारला सर्दी-खोकला झाल्यास तो मास्क घालतो आहे ना, याची खात्री करा.
  • कोणताही संसर्ग टाळण्यासाठी टॅटू काढल्यानंतर सांगितलेल्या गोष्टींची योग्य काळजी घ्या..

टॅटू काढण्यापूर्वी टॅटू कलाकारासाठी असे कोणतेही प्रमाणपत्र आहे का, जे आपण विचारले पाहिजे? (Is there any certification for a tattoo artist that we should ask before getting a tattoo?)

भारतात टॅटूसंदर्भात कोणताही कायदा नाही त्यामुळे ठोस नियमावली अशी लागू होत नाही. परंतु तुम्ही त्यांना मूलभूत आरोग्य आणि सुरक्षा मानकं विचारू शकता आणि जर टॅटू कलाकार एखाद्या प्रतिष्ठित स्त्रोताकडून शिकले आहेत, हे विचारात घेऊ शकता.

ग्राहकाने प्रमाणित टॅटू कलाकार का निवडावे? (Why customer should choose Certified tattoo artist?)

ग्राहकाने प्रमाणित टॅटू कलाकार निवडला पाहिजे, पण भारतात कोणतीही प्रमाणपत्रे नसल्यामुळे तुम्ही चांगल्या ठिकाणी टॅटू काढण्यास प्राधान्य द्या. कमी पैशांमध्ये टॅटू काढण्याच्या लोभाला बळी पडू नका.

उत्पादनाचा वापर सुरक्षित आहे की नाही हे कसे ओळखावे? (How to identify product use are safe or not?)

  • तुम्ही अन्न आणि औषध प्रशासना (FDA) द्वारे प्रतिबंधित शाई आणि टॅटू उत्पादनांबाबत माहिती मिळवू शकता.
  • अनेक शाई दूषित असतात आणि टॅटू पुरवठादारांकडून जास्त नफ्यासाठी त्यामध्ये धातूच्या कणांचा वापर केला जातो.
  • वनस्पतीनिर्मिती ग्लिसरीनऐवजी गोमांस आणि डुकराचे मांस ग्लिसरीन (Beef & pork glycerine) शाईमध्ये वापरले जाते.
  • शाकाहारी शाई (vegan ink) वापरा, ते सुरक्षित आहे.

हेही वाचा – तुम्ही वारंवार फोन बघता का किंवा वारंवार हात धुता का? तुम्हाला OCD असू शकतो; OCD म्हणजे नेमकं काय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

शाई सुरक्षित आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपण कोणते प्रमाणपत्र मागावे? (What Certificate we should Ask to identify ink is safe or not? )

CTL प्रमाणित (CTL CERTIFIED)
गॅमा रेडिएशन (GAMMA RADIATION)
निर्जंतुकीकरण प्रमाणित (STERILE CERTIFIED)
शाकाहारी आणि सेंद्रिय (VEGAN & organic)
तसेच कोणत्या प्रयोगशाळेने शाईची तपासणी केली आहे.

हेही वाचा -नवरा सतत टोमणे मारतो, प्रेयसी सतत पैशावरून बोलते…तुमचा भावनिक छळ होतोय हे कसे ओळखाल? सुटकेसाठी काय करावे?

टॅटू काढल्यानंतर कशी घ्यावी काळजी ? (How to take care after removing the tattoo?)

दुसऱ्या संरक्षक आवरणानंतर (second protective wrap) या नियमांचे पालन करा.

  • १) टॅटू काढल्याच्या तीन दिवसांनंतर वाहत्या पाण्याखाली संरक्षक आवरण (second protective wrap) काढून टाका आणि हलक्या हाताने टॅटू स्वच्छ करा.
  • २) तुमच्या टॅटूभोवती जास्तीची शाई दिसल्यावर कृपया घाबरू नका. वर सांगितल्याप्रमाणे फक्त साफ करून घ्या.
  • ३) टॅटू स्वतःच कोरडे होऊ द्या.
  • ४) मॉइश्चरायझिंग क्रीमचा फक्त पातळ थर लावा, ते टॅटू चमकण्यासाठी पुरेसे आहे.
  • ५) जर टॅटूला खाज सुटली असेल तर तो स्क्रॅच करू नका, फक्त त्यावर हाताने दाबा.
  • ६) तीन आठवड्यांसाठी दर चार तासांनी मॉइश्चरायझिंग क्रीम लावा.
  • ७) १४ दिवस जिमिंग आणि महिनाभर पोहायला जाऊ नका.
  • ८) योग्य काळजी घेतल्यास आपण एका आठवड्यात टॅटू बरे होण्याची अपेक्षा करू शकता.

टॅटू काढताना या चुका टाळा

लक्षात ठेवा, टॅटू काढताना नेहमी सुरक्षित पर्याय निवडावा. रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून कधीही टॅटू काढू नका. कारण त्यांच्याकडे स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही, तसेच वापरत असलेली उत्पादने चांगल्या दर्जाची नसतात, ज्याची कोणतीही खात्री नसते. त्यामुळे त्याचा तुमच्या त्वचेवर विपरित परिणाम होऊ शकतो.

टॅटू काढल्याने काही आरोग्य धोके असू शकतात. तुम्हाला या जोखमींची जाणीव आहे याची खात्री करा आणि ते टाळण्यासाठी योग्य निर्णय घ्या.