जिरे किंवा जिरे पूड रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे ते भाजून, किंवा त्याची पूर्ण पावडर बनवून तुम्ही खाऊ शकता. जिरे विविध प्रकारच्या अन्नाची चव वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. या वाळलेल्या बिया क्यूमिनम सायमिनम या औषधी वनस्पतीच्या आहेत, जे अजमोदा (ओवा) कुटुंबातील सदस्य आहेत. जिऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आणि सामान्यतः ते पोटाच्या समस्यांवरील उपायासाठी पचनसंस्थेला शांत करण्यासाठी, मळमळ आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी वापरले जाते. तसेच, ते नियमितपणे पचनक्षमतेसाठी वापरले जातात, परंतु टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांना औषधांसह जिरे देखील सहायक उपचार म्हणून वापरले जातात. डॉ एलीन कॅंडे, एचओडी, पोषण आणि आहारशास्त्र, सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, मुंबई यांनी जिरे खाल्याने शरीराला होणारे फायदे आणि मधुमेहाच्या रुग्णांमधील साखरेच्या प्रमाण कसे नियंत्रित केले जाते याबाबतची माहिती दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा