उष्णतेची लाट आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपल्या सर्वांनाच जाणवत आहे. दरवर्षी ५ ते ६ उष्णतेच्या लाट भारताच्या उत्तर भागात येतात. यामध्ये दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे सर्वात जास्त हानी मनुष्य, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींची होते. अशा वेळी तुम्हाला उष्णतेची लाट येते म्हणजे काय होते? हे जाणून घेतले पाहिजे. तसेच तुमच्या आसपास एखाद्या व्यक्तीला जर उष्णतेच्या लाटेमुळे त्रास होत असेल ते कसे ओळखावे आणि काय प्रथमोपचार करावे हे माहित असणे गरजेचे आहे. डॉ. प्रदीप आवटे यांनी लोकसत्तासोबत संवाद साधताना याबाबत माहिती दिली आहे. चला जाणून घेऊ या सविस्तर

का येते उष्णतेची लाट?
वातवरणात होणाऱ्या बदलांमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे, त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढत आह

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
public health department target tb screening of 1 crore people
३ कोटी लोकांची क्षयरोग तपासणी
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
What happens to the body when you take cold showers in winter? Cold Water Bath Benefits
हिवाळ्यात थंड पाण्यानं अंघोळ केल्यास शरीरावर काय परिणाम होतात? चांगलं की वाईट, जाणून घ्या

उष्णतेची लाट येते म्हणजे काय होते?
एखाद्या ठिकाणी कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान सलग ३ दिवस ३ डिग्री सेल्शिअसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट आली असे मानतात. तसेच सलग दोन दिवस एखाद्या ठिकाणी सलग दोन दिवस तापमान ४५ डिग्रीपेक्षा जास्त असेल तर त्यास देखील उष्णतेची लाट आली असे मानतात.

केव्हा येते उष्णतेची लाट
साधारणपणे मान्सून पूर्व काळात, म्हणजेच मार्च ते जून या महिन्यांमध्ये उष्णतेच्या लाटा येतात.

मानवी शरीर किती तापमान सहन करू शकते?
वातावरणाचे तापमान ३७ डिग्री सेल्सियस असते तो पर्यंत मानवी शरीराला त्याचा काही त्रास होत नाही मात्र त्या नंतर मात्र शरीर वातावरणातील उष्मा शोषून घेऊ लागते आणि त्याचे विपरित परिणाम मानवाच्या शरीरावर होऊ लागतात. तापमान आणि आर्द्रता यांचा एकत्र होणारा परिणाम अधिक असतो.

उष्णतेच्या लाटेचा त्रास कोणत्या व्यक्तींना होण्याची शक्यता अधिक असते ?
डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृध्द लोक आणि लहान मुले, स्थूल लोक, अयोग्य कपडे घातलेले लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले रुग्न, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले लोक, काही विशिष्ट औषधावर असलेले लोक, निराश्रित किंवा घरदार नसलेले गरीब लोकांना उष्णतेच्या लाटेचा त्रास होऊ शकतो.

हेही वाचा : आपणच होऊ आपली सावली! उन्हामुळे वाढलेल्या प्रत्येक त्रासावर डॉ. प्रदीप आवटे यांचे उत्तर जाणून घ्या

उष्णतेच्या लाटेमुळे होणारे त्रासामध्ये किरकोळ आणि गंभीर अशा दोन स्वरुपामध्ये विभागणी केली जाते.

उष्णतेच्या लाटेमुळे होणारे किरकोळ त्रास

सनबर्न
उष्णतेमुळे होणाऱ्या किरकोळ शारिरिक त्रासामध्ये सनबर्नची समस्या उद्भवू शकते. कातडी लालसर होणे, सूज येणे, वेदना, ताप आणि डोकेदुखी ही सनबर्न होण्याची लक्षणे आहेत. त्यावर प्रथमोपचार म्हणून घामास अडथळा करणारा कातडीवरील तेलकटपणा दूर करण्यासाठी साधा साबण वापरून आंघोळ करावी. कातडीवर फोड आले असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उष्णतेमुळे स्नायूंमध्ये गोळे येणे(हिट क्रॅम्पस)

उष्णतेमुळे होणाऱ्या किरकोळ शारिरिक त्रासामध्ये हातापायात गोळे येणे, पोटात मुरडा पडणे, खुप घाम येणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यावर प्रथमोपचार म्हणून रुग्णाला सावलीत आणि थंड जागी हलवा. दुखऱ्या स्नायूला हलका मसाज द्या. थोडे थोडे पाणी प्यायला द्या. उलटी झाली तर पाणी देऊ नका.

उष्णतेमुळे प्रचंड थकवा (हिट एक्झॉस्टेशन)

उष्णतेमुळे होणाऱ्या किरकोळ शारिरिक त्रासामध्ये एखाद्या व्यक्तीला प्रंचड थकवा जाणवू शकतो. अशावेळी खूप घाम येतो, थकवा जाणवतो, कातडी थंडगार पडते, नाडीचे ठोके मंदांवतात, डोकेदुखी होते, चक्कर येते किंवा उलटी होते अशी लक्षणे दिसतात. त्यावर प्रथमोपचार म्हणून रुग्णाला थंड जागी शक्यतो एसीमध्ये झोपवा. रुग्नाच्या अंगावरील कपडे सैल करून ओल्या कापडाने त्याचे अंग पुसून घ्या. थोडे थोडे पाणी पाजत रहा. उलटी होत असेल तर पाणी देऊ नका. रुग्नाला दवाखान्यात हलवा.

हेही वाचा : Heat Stroke : तुमच्या शरीराचे ‘या’ पेक्षा जास्त तापमानात होऊ शकते नुकसान? यात सुरक्षित कसे राहाल?

उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर त्रास

उष्माघात ( हिट स्ट्रोक)

उष्णतेमुळे होणाऱ्या गंभीर स्वरुपाचा शारिरिक त्रास म्हणजे उष्माघात. या मध्ये व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. उष्मा घात झाल्यास रुग्नाला ताप ( १०६ डिग्री फॅ) येतो , कातडी – गरम आणि कोरडी पडते, नाडीचे ठोके – वेगात आणि जोरात होत असल्याचे जाणवते, घाम येत नाही किंवा रुग्ण अर्धवट शुध्दीत असतो. त्यावर प्रथमोपचार म्हणऊन अशा रुग्णाला तात्काळ दवाखान्यात भरती करणे आवश्यक आहे. थंड जागी / एसीमध्ये न्या. कपडे काढा. थंड पाण्याने आंघोळ किंवा ओल्या कापडाने अंग पुसून घ्यावे. तोंडाने पाणी देऊ नका.

Story img Loader