दक्षिण भारतीय पाककृतींचा मोठा चाहतावर्ग आहे. कारण- त्यांची चव अद्वितीय आहे आणि ते सहजपणे पचू शकतात. दक्षिण भारतीय पाककृतींपैकी सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे डोसा. डोसा तयार करण्याचेदेखील दोन प्रकार आहेत. सेट डोसा म्हणजे स्पंज डोसा आणि बेन्ने डोसा म्हणेजच कुरकुरीत डोसा. हे दोन्ही प्रकार देशभरात लोकप्रिय आहेत. पण, डोसाचे हे दोन्ही प्रकार एकमेकांपेक्षा वेगळे आहेत; पण कसे ते जाणून घेऊ… याबाबत सेलिब्रेटी शेफ अनन्या बॅनर्जीने मुख्य फरक स्पष्ट करून, तुमच्यासाठी त्यांची रेसिपी शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोणी स्पंज डोसा/सेट डोसा : हे सामान्यत: मऊ, छोटे व जाड डोसे असतात, जे तीनच्या सेटमध्ये दिले जातात आणि म्हणूनच त्याचे हे नाव आहे. सेट डोसा अधिक जाळीदार, फुगीर असतो आणि पुष्कळदा त्याच्या पिठात पोहे (चपटे तांदूळ) समाविष्ट केले जातात, ज्यामुळे ते मऊ आणि स्पंजी होतात. ते सहसा सांबार आणि नारळाच्या चटणीबरोबर दिले जातात.

कुरकुरीत डोसा/ बेन्ने डोसा : कन्नडमध्ये बेन्ने म्हणजे लोणी आणि बेन्ने डोसा त्याच्या खुसखुशीत, सोनेरी पोतासाठी ओळखला जातो. हा डोसा साधारणपणे पातळ आणि काठावर कुरकुरीत असतो. अधिक चांगल्या चवीसाठी तो तेलाऐवजी लोणी वापरून तयार केला जातो.. कर्नाटकातील प्रसिद्ध दावणगेरे (Davangere) यांनी तयार केलेला हा डोसा त्याच्या एका वेगळ्या सुगंधासाठी नावाजला जातो आणि बऱ्याचदा तो मसालेदार बटाट्याची भाजी आणि नारळाच्या चटणीबरोबर दिला जातो.

तुम्ही सेट डोसा आणि बेन्ने डोसा कसे बनवू शकता?

लोणी स्पंज डोस/ सेट डोसा कसा बनवाल? :

साहित्य : तांदूळ, उडीद डाळ, पोहे (चपटे तांदूळ), मेथी दाणे, मीठ.

तयारी :

  • तांदूळ, उडीद डाळ व पोहे एकत्र काही तास भिजत ठेवा.
  • मिश्रण एका गुळगुळीत पिठात बारीक करा आणि रात्रभर ते आंबू द्या.
  • मीठ घाला आणि पिठात चांगले मिसळा.
  • तवा गरम करा. त्यावर थोडे पीठ घाला आणि थोडेसे पसरवा (नेहमीच्या डोसापेक्षा जाड).
  • तेल न लावता मध्यम आचेवर डोसा शिजवा.

हेही वाचा –Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा

बेन्ने डोसा :

साहित्य : तांदूळ, उडीद डाळ, फुगलेला तांदूळ (कधी कधी कुरकुरीत होण्यासाठी), लोणी, मीठ.

तयारी :

  • तांदूळ आणि उडीद डाळ भिजवून, बारीक वाटून घ्या आणि काही तास आंबू द्या.
  • तवा गरम करा, पिठाचा पातळ थर पसरवा आणि कडांभोवती थोडे लोणी घाला.
  • सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसवर ठेवा.

हेही वाचा –दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून…

आरोग्यदायी पर्याय कोणता?

बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, स्पंज डोसा/ सेट डोसा अनेकदा आरोग्यदायी मानला जातो. कारण- तो मऊ असतो. त्यासाठी कमी लोणी किंवा तेल वापरावे लागते आणि त्यात पोहे असतात, जे त्याच्या मऊ पोतामध्ये योगदान देतात. या डोसाचे पीठ जाडसर आणि घट्ट असते, स्वयंपाक करताना कमी फॅट्स वापरले जातात. हे बेन्ने डोसाच्या तुलनेत कॅलरी आणि फॅट्स कमी सेवन करते. लोण्याव्यतिरिक्त कुरकुरीत/ बेन्ने डोसा फॅट्स आणि कॅलरीजने समृद्ध आहे. जरी तो चवदार असला तरी त्याच्या समृद्धतेमुळे तो सेट डोसाच्या तुलनेत अधिक चांगला पर्याय बनते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How does set dosa differ from benne dosa we found which one is healthier snk