उन्हाळा आता जवळ आला आहे. पाणी, ज्युस यांसारखे पेय पिण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत होते. अशी पेये तुमची तहान भागवतात, पण यापैकी काही पेय नियमित सेवन केल्याने तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. कंटेंट क्रिएटर आरती सहानी हिने इन्स्टाग्रामवर असेच एका उन्हाळ्यातील पेयाबाबत सांगितले, ते क्षणार्धात तयार केले जाऊ शकते.

व्हिडीओमध्ये सहानी यांनी कलिंगड, पुदिना आणि लिंबू भिजवलेल्या सब्जाच्या बिया आणि मध एकत्र करून एक पेय तयार केले आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना सहानी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे पेय स्वतःला थंड, हायड्रेटेड, निरोगी आणि त्वचेवर तेज ठेवण्यासाठी तुम्ही दुपारचे जेवण म्हणून घेऊ शकता.”

penaut oil for diabetis patients?
शेंगदाण्याचं तेल डायबेटिस असणाऱ्यांनी वापरावं का?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
drinking tea is beneficial to health?
चहाची तलफ आलेय, काय करावं?
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
is alcohol good for health
दारू प्यावी का? आयुर्वेद काय सांगतं?
Body parts to avoid while applying perfume
Perfume : फुस्स्स, फुस्स्स करून संपूर्ण शरीरावर लावताय परफ्यूम? मग कोणत्या अवयवांवर परफ्यूम लावणे योग्य? घ्या जाणून
cardamom water benefits
वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञांनी सांगितले जबरदस्त फायदे
Should you eat Bottle guard with peel or without the peel health benefits helps for weight management
वजन नियंत्रणात ठेवेल दुधीची साल! पण ती कशाप्रकारे खावी? तज्ज्ञांनी सांगितले…

काय आहे डिटॉक्स ड्रिंकची रेसिपी?


साहित्य

दीड कप – कलिंगड
१ टीस्पून – मध
२ टीस्पून – भिजवलेले सब्जा बियाणे
पाव कप – पुदिन्याची पाने
१ चमचा – लिंबाचा रस
चवीनुसार गुलाबी/काळे मीठ
१ कप – पाणी/नारळ पाणी
बर्फाचे तुकडे

कृती

  • चिरलेले कलिंगड, पुदिना आणि पाणी किंवा नारळाचे पाणी एकत्र करा.
  • गाळून घ्या
  • एका ग्लासमध्ये भिजवलेल्या सब्जाच्या बिया, बर्फ आणि तयार पेय ओता
  • त्यात ताजे लिंबू पिळून घ्या आणि हवे असल्यास मध घाला.

डिटॉक्स ड्रिंकची त्वचा उजळण्यास कसे मदत करते?

आता प्रश्न असा पडतो की खरचं हे पेय आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का? सहानी यांनी दावा केल्याप्रमाणे या पेयाच्या नियमित सेवनामुळे त्वचा उजळ होईल का? याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना चेंबूर येथील शरीफा स्किन केअर क्लिनिक आणि अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या डर्माटॉलॉजिस्ट आणि कॉस्मोटोलॉजिस्ट, डॉ. शरीफा चाऊस यांनी सांगितले की, “कलिंगड, पुदिना आणि नारळ पाणी एकत्रित करून तयार केलेले डिटॉक्स ड्रिंक आपल्या त्वचेला अनेक फायदे देते.”

हेही वाचा – घसा खवखवत असेल तर लिंबू आणि मधाचे सेवन करावे का? या घरगुती उपायाबाबत काय सांगतात डॉक्टर

डॉ. शरीफा चाऊस यांनी कलिंगड, लिंबू आणि पुदिनामुळे आपल्या त्वचेसाठी होणारे फायदे सांगितले आहेत.

कलिंगड
व्हिटॅमिन ए आणि सी समृद्ध कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, जे त्वचा मुलायम, हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते आणि आपल्या त्वचेच्या कोलेजन उत्पादनासदेखील प्रोत्साहन देते. कोलेजन हे शरीरात आढळणारे सर्वात मुबलक प्रथिने म्हणून ओळखले जाते. ते त्वचेची याग्य निगा राखण्यात महत्वाची भूमिका बजावते

लिंबू
लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे कोलेजन उत्पादनास चालना देण्यासह आपल्या त्वचेला उजळण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करते.

पुदिना
पुदिन्यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेला येणारी सूज कमी करतात आणि दाह शांत करण्यास मदत करतात. पुदिन्याचा सुगंध तणाव कमी करण्याशी संबंधित आहे, जो अप्रत्यक्षपणे आपल्या त्वचेला ताण-संबंधित समस्या दूर करून मदत करतो.

सब्जा
“जेव्हा तुम्ही सब्जा बियांचे पाणी पिता तेव्हा ते तुमच्या शरीराला थंड होण्यास मदत करते, तुम्हाला आम्लपित्त किंवा जास्त उष्णता असल्यास हा एक चांगला पर्याय आहे. हे दैनंदिन हायड्रेशनमध्येदेखील योगदान देते. “फायबर, लोह आणि प्रथिने यांसारख्या अत्यावश्यक पोषक तत्वांनी युक्त बिया सकाळी पाण्यासोत घेऊ शकता किंवा दलिया, शरबत, हर्बल टी, स्मूदी, दही किंवा तुमच्या सॅलेडमध्ये घालू शकता “, असे दिल्लीच्या ‘एनयुटीआर’ च्या क्लिनिकल आहारतज्ज्ञ आणि संस्थापक, लक्षिता जैन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

हेही वाचा – एअर फ्राईंग की तळणे? स्वयंपाकाची कोणती पद्धत आहे योग्य? डॉक्टर काय सांगतात…

“हे घटक एकत्र करून ते एक शक्तिशाली डिटॉक्स पेय बनवू शकता, जे उन्हाळ्यात त्वचेचे आरोग्य आणि हायड्रेशन वाढवण्यास मदत करते. त्वचेचा प्रकार आणि त्वचेच्या समस्यांवर अवलंबून वैयक्तिक परिणाम बदलू शकतात, असे डॉ. चाऊस यांनी स्पष्ट केले.

Story img Loader