Health Special: इन्सुलिनच्या शोधाबद्दल आपण पहिल्या भागात वाचलं. टाईप १ मधुमेह असणाऱ्यांना पूर्णपणे इन्सुलिनवर अवलंबून राहावे लागते. मात्र टाईप २ मधुमेह असणारे आहारातील बदल, जीवनशैली आणि गोळ्या यांनीदेखील मधुमेह नियंत्रणात आणता येऊ शकतो. या इन्सुलिनचं कार्य नेमकं कसं चालतं? त्याचा परिणाम इतका दूरगामी का असतो? इन्सुलिनचा उपाय म्हणून वापर करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात त्यासाठी आजचा लेख.

इन्सुलिनचं कार्य नेमकं कसं चालतं?

आपण अन्न खाल्ल्यानंतर आतड्यामार्गे पोटात जाऊन कर्बोदके ग्लुकोज नावाच्या शर्करेत रूपांतरित होतात. आपल्या पोटाच्या मागच्या बाजूला स्वादुपिंड आहे. या स्वादुपिंडाद्वारे कर्बोदकांचे शर्करेत रूपांतर होण्यासाठी इन्सुलिन स्रवले जाते . थोडक्यात सांगायचं तर रक्तातील शर्करेची मात्रा नियंत्रणात आणण्याचे काम इन्सुलिन करते. ग्लुकोजचे प्रमाण वाढले तर इन्सुलिन देखील जास्त प्रमाणात स्रवले जाते. थोडक्यात सांगायचं तर ग्लुकोज जितके अधिक, तितके इन्सुलिन अधिक. खूप कमी ग्लुकोज असेल तर ग्लुकागॉन नावाचे संप्रेरक स्रवले जाते -जे ऊर्जेचे रूपांतर यकृतात ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवून ठेवते. 

what happens to blood sugar levels when you walk after a meal
जेवल्यानंतर चालल्यास खरोखर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा….
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Why Diljit Dosanjh spend 10 minutes with yourself every morning
दिलजीत दोसांझ दररोज सकाळी १० मिनिटे स्वत:ला का वेळ देतो? दिलजीतच्या या सवयीविषयी तज्ज्ञ काय सांगतात?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
gold reserves, Dhanteras gold, gold storage, RBI, england
विश्लेषण : १०२ टन सोने इंग्लंडकडून भारताकडे… रिझर्व्ह बँकेच्या ‘सोने वापसी’ निर्णयामागे काय कारण?

हेही वाचा >>>दिलजीत दोसांझ दररोज सकाळी १० मिनिटे स्वत:ला का वेळ देतो? दिलजीतच्या या सवयीविषयी तज्ज्ञ काय सांगतात?

इन्सुलिनची कार्यसाखळी

स्वादुपिंडात तयार होणाऱ्या इन्सुलिनचा प्रभावी वापर शरीराकडून केला जात नसेल तर हळूहळू स्थूलत्व येऊ लागते.

इन्सुलिन प्रभावीपणे वापरले जात नसेल तर यकृत आणि स्नायूंमधील अतिरिक्त साखर स्निग्ध पेशी (फॅट सेल्स ) कडे पाठवले जाते. अन्नातील ग्लुकोज  – स्वादुपिंडातर्फे इन्सुलिनचे स्रवन -इन्सुलिनमार्फत ग्लुकोजवर अंकुश – सुक्रोजपासून ऊर्जा निर्माण होणे – शरीराला ऊर्जेचा पुरवठा होणे – ऊर्जा यकृतात, स्नायूंमध्ये साठवली जाणे अशी ही साखळी आहे.

हायपरग्लायसेमिया

काही लोकांमध्ये मात्र  साखरेचं ऊर्जेमध्ये रूपांतर होण्याइतकं इन्सुलिनच स्वादुपिंडातर्फे तयार होत नाही आणि काहींमध्ये तयार होणाऱ्या इन्सुलिनचा वापर योग्य प्रकारे केला जात नाही.  ज्यात अतिरिक्त साखरेमुळे ग्लुकोजची पातळी वाढते ज्याला  हायपरग्लायसेमिया म्हणतात. यामुळे एखाद्या व्यक्तीला मधुमेह आहे असा निष्कर्ष काढला जातो. इन्सुलिनची पातळी प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळी असते त्यामुळे अमुक प्रमाणातच इन्सुलिन असावं असा निकष सरसकट लागू होत नाही.

इन्सुलिनचं प्रमाण साधारणपणे खालीलप्रमाणे असणे आवश्यक असते.

– १२ तास उपाशी राहिल्यावर <१७युनिट्स/ मिली

– खाल्ल्यानंतर ३०मिनिटांनी ७०-११२ युनिट/मिली

– खाल्ल्यानंतर २ तासांनी २२- ८० युनिट्स/मिली

– खाल्ल्यानंतर ३ तासांनी ४-६२ युनिट्स/मिली

पोटॅशिअम आणि इन्सुलिन

इन्सुलिनचा प्रभाव कमी होत असेल तर पेशींमधील पोटॅशिअमचे प्रमाण देखील कमी होत जाते. इन्सुलिन पेशींमधील साखरेचे प्रमाण नियंत्रित करताना रक्तातील पोटॅशिअम पुन्हा पेशींपर्यंत पोहोचविते. रक्तातील पोटॅशिअमची पातळी कमी करते.

हेही वाचा >>>जेवल्यानंतर चालल्यास खरोखर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा….

इन्सुलिन अधिक झाल्यास

काही मधुमेहींमध्ये इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे अपरिहार्य असते. याद्वारे इन्सुलिनचे प्रमाण अधिक घेतले गेल्यास साखरेची पातळी एकदम कमी होते त्यामुळे पुढील परिणाम संभवतात.

– खूप भूक लागते

– मानसिक ताण येणे

– चक्कर येणे

-खूप घाम येणे

इन्सुलिन ज्या वेळेत शरीरात परिणामकारक ठरते त्याप्रमाणे इन्सुलिनचे तीन प्रकार आहेत.

१)  शॉर्ट अॅक्टिंग – ३०मिनिटे -६०मिनिटे

२) इंटरमेडिएट अॅक्टिंग –  ३-४ तास

३) लॉन्ग अॅक्टिंग – ६ ते ८ तास

इन्सुलिनचे हे प्रमाण प्रभावीपणे होण्यासाठी लागणार वेळ प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असतो त्यामुळे इन्सुलिनचा वापर उपाय म्हणून करताना त्याचे प्रमाण, वेळ आणि खाण्याची वेळ याचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असते.

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात इन्सुलिनच्या कार्यक्षमतेचा वेग वेगेवेगळा असू शकतो. सामान्य माणसामध्ये इन्सुलिनचे प्रमाण साखरेप्रमाणे नियोजित होते, मात्र मधुमेही व्यक्तींच्या शरीरात इन्सुलिनचे प्रमाण असंतुलित असते .

इन्सुलिनचा वापर करताना…

दुसऱ्या प्रकारच्या मधुमेही रुग्णांमध्ये साखर अतिरिक्त प्रमाण नियंत्रणात आणणे हा इन्सुलिनच्या वापरामागील मुख्य मुद्दा असतो. मधुमेहावर उपाय म्हणून इन्सुलिनचा वापर करताना

टाईप १ मधुमेहींसाठी  ०.५ युनिट प्रति किलो वजन इतकं इन्सुलिन दिलं जाते तर

टाईप २ मधुमेहींसाठी (अत्यावश्यक असेल तरच ) ०.२ युनिट प्रति किलो वजनाइतके इन्सुलिन दिले जातं.

इन्सुलिनचा वापर उपाय म्हणून करताना तज्ज्ञांच्या निरिक्षणाखाली होणं अत्यावश्यक आहे. शरीरातील इन्सुलिनची पातळी खालील घटकांवर अवलंबून असते

अ) तुमच्या आहारातील कर्बोदकांचे (कार्ब्स , स्टार्च) प्रमाण

ब) तुमच्या आहाराची वेळ

क )शारीरिक ताण (थकवा , स्नायूंच दुखणं )

ड) मानसिक ताण

इ) जीवनशैली

फ) तुम्ही घेत असलेली औषधे विशेषत : कोरिकोस्टिरॉईड्स

अलीकडे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण नियोजित करण्यासाठी विविध उपकरणांचा शोध लागलेला आहे ,मात्र वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतिशील जगात देखील इन्सुलिन वापरताना आहारातील कर्बोदकांचे प्रमाण, त्याप्रमाणे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण, इन्सुलिन घेण्याची वेळ, बदलणारे वजन, वय  या बाबींचा विचार करणे  क्रमप्राप्त आहे.

Story img Loader