बॅक्टेरिया आणि माणसाचे मित्र, हे आपल्याला पटूच शकत नाही. बॅक्टेरिया हे खरं म्हणजे खलनायक म्हणूनच आपण जास्त ओळखतो. न्यूमोनिया, टीबी, मेंदूज्वर फूड पॉयझनिंग, टायफॉइड, कॉलरा टीबी, लेप्रसी, धनुर्वात, प्लेग या आणि यासारख्या अनेक संसर्गाकरता बॅक्टेरिया कारणीभूत असतात आणि म्हणूनच सर्वसामान्य माणसाला ते वाईट म्हणूनच माहिती आहेत. या बॅड बॅक्टेरियाचा त्रास होऊ नये म्हणूनच आपण वारंवार आपले हात, आपले किचन कट्टे वारंवार स्वच्छ करतो, बाथरूमचे सिंक स्वच्छ करतो कारण ज्या ज्या ठिकाणी हे जीवाणू एकगठ्ठा येऊ शकतात ते ठिकाण आपण वारंवार स्वच्छ करत असतो. एवढेच नाही तर यांचा बंदोबस्त करता यावा म्हणून अँटिबायोटिक्स या नावाने प्रसिद्ध असणारी औषधेही आपण वापरत असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पण सगळेच बॅक्टेरिया वाईट नसतात. खरे तर आपल्याला मदत करणा-या गुड बॅक्टेरियांची संख्या त्यांच्या वाईट भावंडांपेक्षा किती तरी पट अधिक आहे. एक ट्रिलियन म्हणजे एक हजार अब्ज आणि असे सुमारे शंभर ट्रिलियन गुड बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये राहत असतात आणि त्यातले बरेच जण मुख्यत्वे आपल्या आतड्यात राहत असतात. त्यांच्याशी आपण एकोप्याने आणि प्रेमाने राहतो असं नव्हे तर आपले अवघ जगणं आपलं अस्तित्व त्यांच्यावर आहे हे आपण समजून घ्यायची गरज आहे. आपल्या एकूण मानवी पेशींच्या तुलनेत वीस पट अधिक बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये असतात. आपल्या शरीरातील पाणी वजा केले तर आपले दहा टक्के वस्तुमान हे बॅक्टेरियांचेच असते. म्हणजे हे शरीर आपले की बॅक्टेरियांचे, असा प्रश्न पडावा असे आहे सारे.
हेही वाचा : जोडीदाराबरोबर दीर्घकाळ टिकणारे नाते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी कसे ठरते फायदेशीर? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
१९०८ साली नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणजे इनेट इम्युनिटी संदर्भातील संशोधनासाठी नोबेल मिळवणा-या इली मेचिनीकॉप या रशियन प्राणीशास्त्रज्ञाने विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला अशी मांडणी केली की आपल्या आतड्यातील मायक्रोबायोम (जीवाणू बेट) मैत्रीपूर्ण बॅक्टेरियांनी भरून आपण आपल्या आरोग्यामध्ये वृद्धी करू शकतो आणि आपले येणार म्हातारपण लांबवू होऊ शकतो. त्या काळात त्याच्या या कल्पनेची खूप काळ चर्चा झाली पण नंतर ती कल्पना थोडी बाजूला पडली पण आज कालच्या काळात ज्यांची चलती आहे ते प्रोबायोटिक्स म्हणजे एली मेचीनीकॉप यानेच मांडलेली संकल्पना आहे.
हे आपले मित्र असणारे बॅक्टेरिया आपल्याला नेमकी कशी मदत करत असतात ?
१) आपलं अन्नपचन करण्याकरता मदत करतात.
२)आतड्यामध्ये फॉलिक ऍसिड, नियासीन विटामिन बी ६ बी १२ तयार करतात.
३) महत्त्वाचं म्हणजे ते त्यांची जी वाईट भावंडं आहेत म्हणजे बॅड बॅक्टेरिया त्यांच्यापासून देखील आपलं रक्षण करतात. गुड बॅक्टेरिया गर्दी करून या बॅड बॅक्टेरियांना जागा मिळू देत नाहीत, कधी अॅसिड तयार करून त्यांची वाढ रोखतात आणि आपल्या प्रतिकारशक्तीला प्रेरित करून या बॅड बॅक्टेरिया विरुद्ध लढण्याची ताकद देतात.
४) हे गुड बॅक्टेरिया आपली त्वचा मृदू मुलायम ठेवतात. तिच्यावरचे तेल शोषून घेतात.
५) दात किडू नयेत याची काळजी घेतात.
६) स्त्रियांमध्ये योनीमार्गाचा कर्करोग हा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. त्यामध्ये देखील स्त्रीच्या जनन मार्गामध्ये असणारे जे गुड बॅक्टेरिया आहेत त्यांचं संतुलन बिघडलं तरच तिथं ह्यूमन पापिलोमा व्हायरससारखा विषाणू वाढून कर्करोगाची शक्यता वाढते.
७) फार काय आत्ता कोविड संकटकाळात काही लोकांना अत्यंत गंभीर आजार झाला तर काही जणांना अगदी सामान्य सर्दी खोकला व्हावा इतक्या सहजतेने त्यांनी कोविडचा सामना केला. याच्यामध्ये देखील आपल्या श्वसन मार्गांमध्ये असणारे जे गुड बॅक्टेरिया आहेत त्यांची भूमिका काय याचा अभ्यास तज्ज्ञ करत आहेत. ज्या व्यक्तींच्या मध्ये श्वसनमर्गात गुड बॅक्टेरिया हे संतुलित आणि योग्य प्रमाणात होते त्यांनी निश्चितपणे या लोकांना कोविडचा प्रतिकार करण्याकरता मदत केलेली आहे असं तज्ञांचं सध्याच्या प्राथमिक संशोधनावरून झालेले मत आहे.
गट ब्रेन एक्सप्रेस हायवे
आपल्या शरीरात आतडी आणि मेंदू यांना जोडणारा एक एक्सप्रेस हायवे असतो. तज्ज्ञ याला गट ब्रेन ॲक्सिस म्हणतात. आपली आतडी आपल्या मेंदूशी चेतापेशी, काही रसायने आणि प्रतिकार शक्ती या तीन मार्गाने जोडलेली असतात. या मार्गावरील वाहतूकीत देखील या मैत्रीपूर्ण बॅक्टेरियांची भूमिका अत्यंत महत्वाची असते.
वेगस नावाची नर्व्ह ( चेता ) आतडी आणि मेंदू यांना जोडते. तुम्हाला जेव्हा ताण येतो तेव्हा वेगस नर्व्ह मेंदूकडे आतड्यापासून जे सिग्नल पाठवते. त्यांचं ट्रॅफिक जाम होतं आणि त्याच्यामुळे अनेकदा आपल्याला अपचन, ॲसिडीटी असा त्रास होतो. या चेतेशिवाय मेंदू आणि आतडी ही न्यूरोट्रान्समीटर प्रकारातील रसायनांनी देखील जोडलेली असतात. आपल्या भावना नियंत्रणात ठेवण्यासाठी मेंदू ही रसायने तयार करतो. उदाहरणार्थ सिरोटोनिन हे रसायन आपल्या आनंदासाठी महत्त्वाचे आहे आणि ते तुमचं बॉडी क्लॉक देखील सांभाळते.
पण हे न्यूरोट्रान्समीटर केवळ मेंदू तयार करत नाही तर त्यातील खूपसे आपल्या आतड्यांच्या पेशी आणि आतड्यामध्ये राहणारे अब्जावधी जीवाणू निर्माण करत असतात. खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या आतड्यांमध्ये निर्माण होत आपल्या आतड्यामधील जीवाणू आणखी एक रसायन तयार करतात ज्याला आपण गाबा (गॅमा अमायनो ब्युटीरिक ऍसिड) म्हणू शकतो. हे रसायन भीती आणि ॲक्झायटी यावर नियंत्रणासाठी मदत करते. प्रयोगशाळेमध्ये उंदरावर केलेल्या प्रयोगांमध्ये असं दिसून आलेलं आहे की प्रोबायोटिक्स आपण जेव्हा वापरतो तेव्हा ते गाबाचं उत्पादन वाढवतात. त्यामुळे आपली ॲक्झायटी / डिप्रेशनमध्ये सुधारणा होते.
हेही वाचा : Health Special : कॅलरीजचं गणित कसं सांभाळावं?
आपण चोथायुक्त म्हणजे फायबर असलेले अन्न घेतो ते पचवून जीवाणू त्यापासून शॉर्ट चेन फॅटी ऍसिड निर्माण करतात. याच्याशिवाय हे जीवाणू बाईल आणि अमिनो ऍसिड यांचे पचन करून इतर रसायने तयार करतात. त्यांचाही मेंदूच्या कार्यावर सकारात्मक परिणाम होत असतो. काही प्रयोगामध्ये ताण किंवा सामाजिक अडचणींमध्ये आतड्यामधील जीवाणू कडून बाईल ऍसिडची निर्मिती कमी होते असे दिसून आले आहे.
आपला गट ब्रेन ॲक्सिस हा आपल्या प्रतिकारशक्तीशी देखील जोडलेला असतो. आपल्या प्रतिकार संस्थेमध्येदेखील आपली आतडी आणि आतड्यातील जीवाणू महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. आपल्या शरीरामध्ये काय प्रवेश करते आणि काय बाहेर टाकलं जातं यावर देखील आपली प्रतिकारशक्ती आणि होणारा संसर्ग अवलंबून असतो. त्याचाही परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो. एकूण आपल्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे बॅक्टेरिया महत्वाचे ठरतात.
डॉक्टर्स अनेकदा उपचारात प्रोबायोटिक्स नावाची औषधे वापरतात. प्रोबायोटिक्स म्हणजे जिवंत बॅक्टेरिया. प्रत्येक प्रोबायोटिकमध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया असतात. काही प्रोबायोटिक्स ताण आणि उदासी कमी करतात, असे देखील आढळलेले आहे. अनेकदा म्हणूनच त्यांना सायकोबायोटिक्स असेही म्हटलं जातं. प्रोबायोटिक्स डायरिया, इरिटेबल बॉवेल, अल्सरेटिव कोलाइटिस, दात किडणे, हिरडयांचा संसर्ग, एक्झिमा अशा अनेक आजारांमध्ये उपयुक्त ठरतात. दही, ताक, चीज, बियर, चॉकलेट यामध्ये आपल्या आरोग्याशी मैत्रीपूर्ण असे बॅक्टेरिया असतात. याशिवाय विशिष्ट पद्धतीच्या फायबर्सनी तयार केलेली प्री-बायोटिक्स सुद्धा उपचारासाठी वापरली जातात.
हेही वाचा : २० किलो वजन कमी करून सोनम कपूर झाली ‘फिट आई’! प्रसूतीनंतर वजन कमी करण्याचा काय आहे मंत्र?
मैत्रीपूर्ण बॅक्टेरिया वाढविणारा आहार
आपल्या शरीरातील या मैत्रीपूर्ण बॅक्टेरियांचे प्रमाण वाढावे यासाठी प्रोबायोटिक्स औषध म्हणून घेण्याची गरज प्रत्येकवेळी नसते. आपल्या आहारात योग्य पदार्थांचा समावेश करुन आपण ते साध्य करु शकतो.
१) ओमेगा ३ फॅट्स हे माशांमध्ये आणि मानवी मेंदूमध्ये देखील भरपूर प्रमाणात आढळतात. ओमेगा ३ फॅटसमुळे आपल्या आतड्यातील गुड बॅक्टेरियांच्या संख्येमध्ये वाढ होते आणि त्यातून मेंदूचे विकार कमी होतात.
२) दही, ताक, चीज यासारखे आंबवलेले पदार्थ देखील गट ब्रेन ॲक्सेस करता उपयुक्त ठरतात. या आंबवलेल्या पदार्थांमुळे मेंदूचे कार्य कार्यक्षमता सुधारते. याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया असतात.
३) अधिक चोथा असणारे अन्नपदार्थ – पालेभाज्या, फळे, मोड आलेली धान्ये यातून मोठ्या प्रमाणावर फायबर्स मिळतात. ज्यांना आपण प्री-बायोटिक असेही म्हणतो. यामुळे देखील स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण कमी होण्यामध्ये मदत होते
४) पॉलीफिनॉल असलेले अन्नपदार्थ4 ग्रीन टी कॉफी ऑलिव्ह ऑइल यामध्ये वनस्पतीमध्ये आढळणारा एक घटक पॉलिफिनॉल आढळतो. यामुळे आरोग्यदायी बॅक्टेरियांमध्ये वाढ होते. त्यातून आपली बोधनक्षमता सुधारते.
५)ट्रिप्टोफान हे अमिनो ऍसिड चीज, अंडी आणि चिकन यासारख्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते, त्याचेच रूपांतर सिरोटोनीन या आनंददायी रसायनामध्ये होत असते.
अनेकदा ॲन्टीबायोटिक्सच्या अतिरेकी, अविवेकी , अनावश्यक वापरांमुळे आपण आपल्या शरीरातील वाईट बॅक्टेरियासोबत हे मित्र बॅक्टेरियाही मारत असतो. त्यामुळे ॲन्टीबायोटिक्सचा मर्यादित, गरज असेल तेव्हाच वापर आणि योग्य आहार यामुळे आपण आपल्या शरीरातील मैत्रीपूर्ण बॅक्टेरियांचे इवलेसे पण आपल्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक असे जग शाबूत ठेवून आपले आरोग्य जपू शकतो.
डॉ. प्रदीप आवटे
(वरिष्ठ आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र राज्य)