Heart Health : एखाद्याच्या प्रेमात पडणे ही खूप सुंदर भावना आहे. प्रेमात पडल्यानंतर काही लोकांमध्ये बरेच बदल दिसून येतात. ते खूप आनंदी दिसतात. उत्कट प्रेमाच्या भावनांमुळे त्यांचे हृदयसुद्धा प्रफुल्लित राहते.
विज्ञानसुद्धा या गोष्टीला मान्यता देते की प्रेमात पडणे हे आपल्या शरीर आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. याविषयी तज्ज्ञांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सविस्तर माहिती सांगितली आहे.

कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटल येथील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. विवेक महाजन आणि वाशीच्या हिरानंदानी हॉस्पिटल व मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. केदार तिळवे सांगतात, “जर एखादी व्यक्ती चांगल्या नातेसंबंधात असेल, तर त्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा चांगला प्रभाव जाणवतो.”

Alcohol Addiction and Treatment in marathi
अभिनेत्री पूजा भट्टप्रमाणे तुम्हालाही दारूचं व्यसन सोडवायचंय? डॉक्टरांचे ‘हे’ उपाय करून पाहा, पुन्हा दारूकडे ढुंकूनही बघणार नाही
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
How Cold Weather Impacts Men's Sexual Health
हिवाळ्यात पुरुषाच्या लैंगिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितले, कशी घ्यावी काळजी?
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
Ajit Pawar visits accident site decides to provide Rs 5 lakh assistance to families of deceased
अपघातस्थळी अजित पवार यांची भेट, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय
Premachi Goshta Fame Rajas Sule Got to married photos viral
शुभमंगल सावधान! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्याचा मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नसोहळा, गेल्या नऊ वर्षांपासून होता रिलेशनशिपमध्ये
sexual health to sleep
लैंगिक संबंधांमुळे खरंच चांगली झोप लागते का? यावर डॉक्टरांचे काय मत आहे? जाणून घेऊ…
India 2025 astrology predictions in Marathi
India 2025 Astrology Predictions: सोन्या-चांदीचा वाढत राहणार भाव; भारतासाठी २०२५ हे वर्ष कसे असणार? वाचा ज्योतिषाचार्य उल्हास गुप्तेंचा अंदाज

प्रेम आणि आकर्षण दोन स्वरूपांत विभागले गेले आहे

आकर्षण : जेव्हा आपण लगेच प्रतिक्रिया देतो तेव्हा शरीरातून नोरपीनेफ्राइन आणि अड्रेनलिन (Norepinephrine and Adrenaline ) हार्मोन्स सोडले जातात; ज्यामुळे आपण अधिक उत्साही होतो. तुम्ही ज्या व्यक्तीकडे आकर्षित होता, त्या व्यक्तीकडे पाहून तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो.

प्रेम : एखाद्या व्यक्तीला चांगल्या रीतीने ओळखू लागल्यानंतर जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या त्या व्यक्तीशी जोडले जाता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडता. अशा वेळी मेंदू एन्डोफिन्स, वासोप्रेसिन व ऑक्सिटोसिन (endorphins, vasopressin and oxytocin ) हार्मोन्स सोडतो. हे हार्मोन्स आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.

हेही वाचा : तरुणांमध्ये स्ट्रोकचा धोका का वाढतोय? याला तणाव अन् प्रदूषण जबाबदार आहे का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

डॉक्टर सांगतात, “एन्डोफिन्समुळे आपण आनंदी राहतो आणि आपला मूडही सुधारतो. तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर राहताना सुरक्षित आणि आनंदी वाटते. ऑक्सिटोसिन व वासोप्रेसिन हे हार्मोन्स दोन व्यक्तींमधील नाते घट्ट करण्यास मदत करतात. या हार्मोन्समुळे पालकांच्या नात्यातील गोडवा वाढवण्यास मदत होते. खरे तर हे हार्मोन्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

विज्ञानसुद्धा दावा करते की, जेव्हा लोक त्यांच्या जोडीदाराबरोबर वेळ घालवतात, तेव्हा त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची गती सुरक्षिततेच्या भावनांमुळे कमी होते आणि त्यांना खूप मनमोकळे व आरामदायी वाटते.

शारीरिक स्पर्शाचेसुद्धा खूप फायदे आहेत. जेव्हा तुम्ही जोडीदाराला मिठी मारता, तेव्हा ऑक्सिटोसिन हार्मोन बाहेर पडतो; ज्यामुळे रक्तदाब कमी होतो. स्थिर आणि दीर्घकाळ नाते जोडीदाराबरोबरचे संबंध अधिक घट्ट करते आणि जोडीदाराविषयी विश्वास व सहानभूती वाढण्यास मदत होते.
पण, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. तसेच नातेसंबंधाची एक काळी बाजूसुद्धा आहे. जेव्हा नात्यात जोडीदाराकडून तुमची फसवणूक होते किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीला तुम्ही गमावता किंवा प्रिय व्यक्तीपासून तुम्ही विभक्त होता, तेव्हा तुम्हाला खूप मोठ्या तणावाचा सामना करावा लागू शकतो आणि तुम्ही नैराश्यातसुद्धा जाऊ शकता. त्यातून बाहेर पडायला तुम्हाला एक महिना किंवा एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. त्यालाच इंग्रजीत “ब्रोकन हार्ट सिंड्रोम” म्हणतात.

हेही वाचा : कढीपत्त्याचे सेवन तुम्ही कसे करता? कसा वापरावा कढीपत्ता; तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स…

याशिवाय तज्ज्ञ पुढे सांगतात, “जे लोक खराब नातेसंबंधात राहतात, त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. ते स्वत:ला निरुपयोगी आणि असहाय समजतात; ज्यामुळे ते इतरांची मदत घेत नाहीत. अनेकदा ते स्वत:ला दोष देतात; ज्यामुळे त्यांना तणाव जाणवतो. त्यांची जीवनशैली कोलमडते. चुकीच्या जीवनशैलीमुळे त्यांना हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका आणखी वाढतो.

Story img Loader