Health Special : आहारातील प्रथिने, त्यांची शरीरासाठी असणारी आवश्यकता आणि बाजारात उपलब्ध असणाऱ्या प्रथिनांच्या पावडर म्हणजेच प्रोटीन पावडर या ग्राहकांच्या आणि विक्रेत्यांच्या आवडत्या उत्पादनापैकी एक. चॉकलेट, विविध फळं, कॅरॅमल कॉफी, व्हॅनिला यासारख्या विविध चवींमध्ये उपलब्ध असणाऱ्या या प्रोटीन पावडर खरंच आपल्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे का? मुळात या प्रोटीन पावडर तयार कशा केल्या जातात याबद्दल आजच्या लेखात.

चवीसाठी फ्लेवर

आहारात प्रथिनांचा समावेश किती असावा, कोणत्या प्रमाणात असावा याबद्दल आपण गेल्या काही लेखामध्ये वाचलं. व्हे प्रोटीन तयार करताना गाईच्या दुधातील केसिन आणि व्हे ही दोन प्रकारची प्रथिने वेगवेगळी केली जातात. साधारण ३० ग्रॅम व्हे प्रोटीन मध्ये २५ ग्रॅम इतकं प्रथिन असतं. म्हणजे वजनी ०.८ ते १ ग्रॅम प्रति किलो अशा प्रमाणात प्रथिने सहजी उपलब्ध होण्यासाठी प्रथिनांच्या पावडरचा उपयोग होऊ शकतो. व्हे प्रोटीन बऱ्यापैकी कोरडं आणि कडवट थोडक्यात सांगायचं झालं तर बेचव असतं. ग्राहकांची आवड लक्षात घेता खाण्यायोग्य चव करण्यासाठी व्हे प्रोटीन मध्ये वेगवेगळे पदार्थ एकत्र केले जातात. याच प्रक्रियेमध्ये अनेकदा कर्बोदकांचे प्रमाण अवाजवी वाढण्याचा धोका संभवतो.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Moringa or drumstick
Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…

आणखी वाचा-Health Special: ग्रीष्मातल्या उन्हाचा केसांवर काय परिणाम होतो?

प्रथिनांच्या पचनावर परिणाम

व्हे प्रोटीन घेणारे बरेच जण फळांच्या रसासोबत किंवा केक सोबत व्हे प्रोटीन घेतात. पण खरं तर त्वरित पचणारं प्रोटीन म्हणून प्रसिद्ध असणारं व्हे प्रोटीन या आहारप्रयोगांमुळे पर्यायाने हळूहळू पचतं. अनेकांना ही अतिरिक्त प्रथिने पचत नाहीत. अशा वेळी अनेकदा प्रथिने घेण्याची वेळ, सोबत घेतले जाणारे अन्नपदार्थ किंवा प्रथिनांतील काही पदार्थाची अॅलर्जी हा मुद्दा महत्वाचा ठरतो. व्हे प्रोटीन आहारात समाविष्ट करताना आपल्याला अॅलर्जी असलेल्या पदार्थांचा त्यात समावेश नाही ना हे पाहणं तितकच महत्वाचं आहे.

मांसाहारींनी आहारालाच प्राधान्य द्यावे

आहारात प्रथिनांचे कमी प्रमाण असणाऱ्या लोकांनी अचानक ते प्रमाण न वाढवता हळूहळू प्रथिनांचे प्रमाण वाढवावे. म्हणजे प्रथिने पचायला जड जात नाहीत. सोबत कर्बोदके, तंतुमय पदार्थ याचा आवश्यक तितकाच समावेश करावा. वनस्पतीजन्य किंवा हर्बल किंवा नॅचरल या नावानिशी शेंगदाणे, सोयाबीन, डाळी यापासून प्रथिन मिळवली जातात. अशा पावडरमध्ये अनेकदा चव वाढविण्यासाठी गूळ, खजूर, सुक्रोज, फ्रुकटोज अशा स्वरूपात कर्बोदके एकत्र करून त्याची चव गोड केली जाते. अशा प्रथिनांच्या पावडरमधून मिळणारी प्रथिनं आणि कडधान्ये किंवा पनीर खाऊन मिळणारी प्रथिने यांचं स्वरूप एकसारखंच असतं. किंबहुना मांसाहार करणाऱ्यांनी या पावडरपेक्षा अंड, मासे, चिकन हे पदार्थ आवर्जून खावेत आणि आहारात प्रथिनांचा समावेश करावा.

आणखी वाचा-Health Special: स्मृतिभ्रंश (Dementia) कसा ओळखावा?

अतिसेवनाने पचनाचे विकार

हर्बल आणि नॅचरल असे म्हणत जे पदार्थ प्रोटीन सोबत पावडरमध्ये एकत्र केले जातात, त्याने अनेकदा जठराग्नी मंदावतो आणि प्रथिनाचे पचन होण्यास त्रास होऊ शकतो . वेगवेगळ्या प्रकारची औषधी रसायने प्रथिनांचे पचन संथ करतानाच स्वादुपिंड , यकृत या दोन्हीवर ताण वाढवू शकतात. अनेकदा मलावरोध, पोटात जळजळ होऊ लागते आणि प्रोटीन पावडर नॅचरल आहे म्हणून असं होतंय असा गैरसमज बाळगून लोक अशी पावडर खात राहतात. अशा पावडरच्या अतिसेवनाने पचनाचे विकार सुरु होतात आणि नंतर प्रथिनांमुळे आरोग्य बिघडलं असा समज तयार होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची प्रथिनं आहारात समाविष्ट करताना त्यापूर्वी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक ठरते .

आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या

ज्याप्रमाणे कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मेडिकलमधून घ्यावे त्याचप्रमाणे कोणतीही प्रथिनांची पावडर आहारतज्ञांच्या/ पोषणतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आहारात समाविष्ट करावी. प्रथिने खरेदी करताना रंगीत वेष्टनावर न भाळता त्यात असणारे अन्नघटक, त्यापासून मिळणाऱ्या प्रथिनांचा दर्जा आणि आरोग्याला होणारे फायदे या तिन्हींचा विचार व्हायला हवा.