Khichdi At Makar Sankranti : नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. त्याशिवाय या दिवशी तिळगुळाचे लाडू आणि चिक्की बनवली जाते. भारतातील काही राज्यांमध्ये या दिवशी खिचडी बनवण्याचीही परंपरा आहे. विशेष बाब म्हणजे या सणाला बनवले जाणारे तिळगुळाचे लाडू, चिक्की व खिचडीचे अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत. आज आपण आरोग्यासाठी खिचडी कशी फायदेशीर आहे, ते जाणून घेणार आहोत.

खिचडी हे परिपूर्ण जेवण आहे; ज्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. द इंडियन एक्स्प्रेसने आहारतज्ज्ञ गरीमा गोयल यांच्या हवाल्याने या संदर्भात माहिती सांगितली आहे. गरीमा गोयल सांगतात, “खिचडी हे पौष्टिक जेवण आहे; जी कोणत्याही ऋतूमध्ये खाल्ली जाते. खिचडीमध्ये भाज्यांचा समावेश केल्याने आपल्या शरीराला जीवनसत्त्वे, फायबर व खनिजे भरपूर प्रमाणात मिळू शकतात.”

Makar Sankranti Special: Easy Khichdi Recipe
Makar Sankranti Special Khichdi : मकर संक्रांतीला अशी बनवा चविष्ठ खिचडी, एका क्लिकवर जाणून घ्या ही सोपी रेसिपी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Makar sankranti 2025 special bhogi bhaji recipe in marathi and health benefits everyone should know
“भोगीची भाजी” एकदम चमचमीत आणि पारंपारिक रेसिपी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Amla kadha benefits
घनदाट केसांसाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत
Ram Kapoor recently shared his personal struggles with weight loss,
“दोनदा ३० किलो वजन कमी केले पण पुन्हा ‘जैसे थे’! नेमके चुकले कुठे? राम कपूरने केला खुलासा, तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
What are nutritional powerhouses for liver
Nutritional Powerhouses For Liver : क्रूसीफेरस भाज्या म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? यकृतासाठी होतो मोठा फायदा; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात…
Makar sankranti Til ladoo recipe how to make tilgul at home makar sankranti 2025 recipe in marathi
मकर संक्रांत स्पेशल: संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे १ किलो मऊसूत तिळाचे लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Sprouted coconuts What they are and if its advisable to have them
अंकुरलेले नारळ म्हणजे काय? ते खाणे योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…

आहारतज्ज्ञ गरीमा गोयल यांनी सांगितलेले खिचडीचे आरोग्यदायी फायदे

पचनास हलकी : जेव्हा तुम्ही आजारी असता किंवा जेव्हा तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या जाणवतात, तेव्हा तुम्ही अनेकदा खिचडी खाण्याचा सल्ला ऐकला असेल. कारण- खिचडी तुमच्या पोटासाठी हलकी असल्याने ती पचायला सुलभ असते. जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा खिचडी खाल्ल्यामुळे तुम्हाला ऊर्जा, प्रोटीन्स व फायबर्स मिळतात. परिणामी शरीराला मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला पचण्यास जड असा आहार घ्यावा लागत नाही.

वजन कमी करण्यास मदत : खिचडी बनवताना त्यात जर तुम्ही भाज्यांचा समावेश केला, तर त्यातून तुम्हाला अनेक पोषक घटक मिळतात. खिचडीमध्ये भाज्या घातल्याने त्यातील फायबर्सचे प्रमाण वाढते; ज्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते.

हेही वाचा : झोपेत घोरणे मधुमेहासाठी कसे धोकादायक ठरू शकते? घोरणाऱ्या व्यक्तीला मधुमेह होण्याचा धोका असतो का?

संवेदनशील आतडे असलेल्यांना उत्तम पर्याय : खिचडी तांदळापासून बनवली जाते. हे ग्लुटेन-फ्री धान्य आहे. ज्या व्यक्तींचे आतडे संवेदनशील आहे किंवा ज्यांना सिलिअ‍ॅक आजार आहे, त्यांना अन्न पचण्यास त्रास होतो. त्यांच्यासाठी खिचडी हा उत्तम पर्याय आहे. सिलिअ‍ॅक आजार हा पचनसंस्थेचा एक आजार आहे. गहू, राय आणि बार्ली अशा तृणधान्यात ग्लुटेन असते. सिलिअ‍ॅक आजार असलेल्या व्यक्तींना ग्लुटेन पचवणे अवघड जाते.

दोन पदार्थांच्या एकत्रीकरणातून दुहेरी फायदा : दोन पदार्थ नीट एकत्र केल्यामुळे आरोग्यास होणारे फायदे आणखी वाढू शकतात. खिचडीच्या बाबतीत हे तुम्हाला प्रकर्षणाने जाणवेल. जर तुम्ही तांदळामध्ये मसूर डाळ एकत्रित केली आणि त्याची खिचडी बनवली, तर शरीराला चांगले फॅट्स मिळू शकतात; जे शरीराला प्रोटीन्स पुरवण्यास मदत करतात. खिचडीबरोबर दही खाल्ल्याने प्रोटीन्सची मात्रा आणखी वाढते.

खिचडी बनवा खालीलप्रमाणे :

  • मिश्र भाज्यांपासून बनवलेली खिचडी : या खिचडी प्रकारात तुम्ही गाजर, कोबी, शिमला मिरची, कांदा, मटार इत्यादी तुमच्या आवडत्या भाज्या घालू शकता. त्यामुळे तुम्हाला पौष्टिक आहार घेता येईल.
  • पालक आणि मूगडाळीची खिचडी : पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. लोहयुक्त पदार्थांमुळे आहारातील पौष्टिकता वाढते. अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि वाढत्या वयात मुलांच्या आरोग्यासाठी पालक आणि मूगडाळीची खिचडी करणे हा एक चांगला पर्याय आहे.

Story img Loader