कुष्ठरोगाबद्दल समाजात अजूनही खूप गैरसमज व अंधश्रद्धा आहेत. कित्येकांना हा एक भयंकर आजार वाटतो. या आजारात हातापायाची बोटे झडतात व व्यंग येते असेही वाटते. हा आजार म्हणजे एक शाप किंवा कलंक आहे असेही वाटते. पण या सगळ्यात काहीही तथ्य नाही. या लेखात आपण कुष्ठरोगाबद्दल माहिती घेऊ या.

कुष्ठ या शब्दाचा उगम संस्कृत शब्दावरून झाला आहे. कुष्णतीचा अर्थ गळून जाणे. इंग्रजी मधे याला Leprosy असे म्हणतात. Leper  हा ग्रीक शब्द आहे. Leper म्हणजे पापुद्रे (Scales). या आजारात त्वचेवर पापुद्रे येतात त्यामुळे हे नाव पडले आहे.

Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
swapan sashtra dream interpretation about money gold silver
स्वप्नात भरपूर पैसा, सोन्या-चांदीचे दागिने दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगतं स्वप्नशास्त्र
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
Kartik Aaryan’s Surprise Visit to Bhool Bhulaiyaa 3 Theatre Goes Viral – A Girl was Too Busy with Popcorn
कार्तिक आर्यन समोर अन् पोरगी पॉपकॉर्न खाण्यात बिझी, VIDEO पाहून म्हणाल असा अ‍ॅटिट्यूड हवा!

आणखी वाचा: Health Special: यकृतातील चरबी म्हणजे काय?

महात्मा गांधींनी कुष्ठरोग्यांसाठीदेखील विशेष काम केले होते. त्यांच्या आश्रमातील पंडीत परचुरे शास्त्री यांना कुष्ठरोग झाला होता. त्यांच्या जखमा ते स्वतः धुवायचे. त्यांना एकदा एका कुष्ठरोग्यांच्या वसाहतीचे उदघाटन करायला बोलावले होते. तेव्हा भाषणात ते म्हणाले “ मला खर तर अशा वसाहतींना टाळे लावायला बोलावले तर जास्त आनंद होईल. कुष्ठरोग्यांची शुश्रूषा ही त्यांच्या घरातच घरच्यांनीच केली पाहिजे ”. भारतामध्ये कुष्ठरोग दिन हा महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी ( ३० जानेवारी रोजी ) पाळला जातो.

कुष्ठरोग हा आजार जंतूमुळे होतो. या जंतूंचा शोध सन १८७३ मधे Gerhard Henrik Armauer Hansen (२९ July १८४१ – १२ February १९१२) या नॉर्वेच्या डॉक्टरांनी लावला. त्यामुळे लेप्रसीला वैद्यकीय भाषेत “ HANSEN DISEASE “ असेही म्हणतात. हे जंतू क्षयरोग या जंतूंच्या वर्गात मोडतात.

जंतूमुळे होणाऱ्या प्रत्येक आजाराला अधिविशिष्ट काळ ( INCUBATION PERIOD ) असतो . अधिविशिष्ट काळ म्हणजे जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यापासून रोगाचे पहिले लक्षण दिसण्यामधील कालावधी. कुष्ठरोगाचा अधिविशिष्ट काळ हा २ ते १० वर्षे एवढा आहे . याचे कारण म्हणजे या आजाराचे जंतू हे फार संथ गतीने वाढतात.

आणखी वाचा: Health Special: एरिस, कोरोनाचा नवा अवतार

हा आजार कसा पसरतो – ज्या व्यक्तीला हा आजार जास्त प्रमाणात असतो त्याच्या नाकातील श्लेषमल त्वचेमध्ये ( MUCOUS MEMBRANE ) हे जंतू असतात . हा माणूस जेव्हा शिंकतो तेव्हा हे जंतू हवेत पसरतात व त्याचा संसर्ग दुसऱ्यांना होऊ शकतो ( DROPLET INFECTION ) . क्वचित प्रसंगी हा आजार सततच्या स्पर्शाने देखील होऊ शकतो . पण प्रासंगिक स्पर्शाने ( CASUAL CONTACT ) हा आजार पसरत नाही . तसेच ज्यांना हा आजार कमी प्रमाणात आहे त्यांचाकडून हा दुसऱ्यांना पसरत नाही. शरीरात शिरकाव केल्यावर हे जंतू व्यक्तीची त्वचा तसेच  नसांना संसर्ग करतात. त्यामुळे या आजाराची लक्षणे ही या दोन ठिकाणी प्रामुख्याने दिसून येतात.

या आजाराची लक्षणे काय आहेत – या आजाराच्या एकूण ६ अवस्था ( टप्पे ) आहेत. ज्या व्यक्तीची या आजाराच्या जंतूविरुध्द रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे अशा व्यक्तीला हा आजार कमी प्रमाणात होतो. तर ज्याची या जंतूविरुध्द प्रतिकारशक्ती फार कमी आहे ( किंवा नाहीच ) त्यांना हा आजार जास्त प्रमाणात होतो . पण हा आजार कुठल्याही टप्प्यात सुरु होऊ शकतो .

१)      फक्त नसांचा आजार ( Pure Neuritic Hansen ) शरीरातील एखाद दुसऱ्या नसेला या आजाराचा संसर्ग पोहोचतो . त्यामुळे नसेला सूज येऊन ती जाड बनते. नसेला थोडासा जरी धक्का बसला तरी  मस्तकात कळ जावी असे दुखते व झिणझिण्या येतात. जिकडील नस जाड आहे त्या हाताला किंवा पायाला सुन्नपणा येणे , मुंग्या येणे ही लक्षणे दिसतात. पंजा किंवा पावलांचे स्नायू कमकुवत बनतात व त्यामुळे पाय उचलून टाकावा लागतो किंवा पायातून चप्पल सटकते किंवा हातामध्ये व्यंग येऊ शकते. ( claw hand ) . हाता पायांना सुन्नपणामुळे जखमा होऊ शकतात .
२)      Tuberculoid leprosy –  या अवस्थेत व्यक्तीची रोगजंतूविरुद्ध प्रतिकारशक्ती चांगली असते. या अवस्थेत अंगावर कुठेही पांढरट किंवा लालट रंगाचा चट्टा येतो . तो त्वचेला लागून असतो किंवा थोडा वर असतो. तो चट्टा सुन्न असतो . तसेच तो कोरडा असतो. त्याच्यावरील केस किंवा लव निघून जाते. ( पण डोक्यावर केस असल्यास तिथे  कुष्ठरोगाचा चट्टा येत नाही ). चट्टायाच्या जवळून जाणारी नस जाड बनते व दुखते.
३)      Borderline tuberculoid leprosy –  या अवस्थेत अंगावर लालट किंवा पांढुरके ४-५ किंवा जास्त चट्टे येतात . ते सुन्न असतात . कधी कधी मोठ्या चट्टयाच्या बाजूला छोटे छोटे चट्टे येतात . चट्टयांजवळील नसा जाड बनतात व दुखू लागतात.
४)      Mid-borderline lepropy – या अवस्थेत चट्टयांचे प्रमाण आणखी वाढते. ते जाड बनतात व हातापायांच्या नसाही जाड होतात .
 
५)      Borderline lepromatous – ज्यांची कुष्ठरोगाच्या जंतूविरुद्ध प्रतिकारशक्ती कमी असते. त्यांना हा प्रकार होतो . अंगावर बारीक बारीक पण पुष्कळ लालट चट्टे येतात. तसेच अंगावर पुष्कळ  लहान पण जाड गाठी व चट्टे येतात . हातापायांना मुंग्या येणे , हातापायांना कमकुवतपणा येणे , कानाची पाळी जाड होणे ही लक्षणे दिसतात .
 
६)      Lepromatous lepropy – ही कुष्ठरोगाची जास्त आजार असलेली अवस्था आहे. या अवस्थेत रुग्णामध्ये कुष्ठरोगाच्या जंतूना प्रतिकार करणारी शक्ती जवळ जवळ नसतेच. त्यामुळे ते जंतू त्वचेत व नसांमध्ये  फार प्रमाणात वाढतात. या आजारात रुग्णाच्या चेहऱ्याची त्वचा थोडी जाडसर व लालट बनते . चेहरा तसेच अंगावर जाड, लालसर ,बरेच बारीक बारीक ( symmetrical ) चट्टे येतात . कानाच्या पाळ्याही जाड बनतात . कानाला बारीक बारीक लालट पुळ्या येतात . भुवईच्या बाहेरच्या बाजूचे केस कमी होतात . चेहऱ्याच्या आठ्या स्पष्ट होतात व चेहरा सिंहासारखा दिसू लागतो. ( leonine face ) .

हाताची बोटे जाड बनतात. या अवस्थेत चट्टयांवर व गाठींवर  सुन्नपणा नसतो. पण हातापायांना सममितीय सुन्नपणा (glove & stocking anaesthesia) येतो. कारण आता शरीराच्या महत्वाच्या व त्वचेखाली असणाऱ्या सर्व नसा सममितीय जाड बनतात व त्यांना चुकून धक्का बसला तरी फार दुखायला लागते . हातापायांना सुन्नपणा असल्यामुळे कुठे लागले,कापले किंवा भाजले तरी लक्षात येत नाही व त्यामुळे तिथे जखम होते . कुष्ठरोगामधे रुग्णांची बोटे झडतात हा गैरसमज आहे . नीट काळजी घेतली व इजा होऊ नये म्हणून जपले तर जखमा होणार नाहीत व बोटेही आखूड होणार नाहीत . एखाद्या व्यक्तीला  हातापायांना मुंग्या येण्याची अनेक कारणे आहेत. (उदा : मधुमेह , बी जीवनसत्वाची कमतरता, दारूचे व्यसन) पण त्यासोबत अंगावर वरील सांगितलेली लक्षणे असतील तरच ते कुष्ठरोगामुळे असू शकते . या अवस्थेत नाकामधेही जाड स्त्राव जमतो, नाकपुडीत खपल्या जमतात व कधीकधी नाकातून रक्त येते. जास्त आजार असल्यास नाकाचा मधला पडदा नष्ठ होतो व नाक बसके बनते . हातापायांच्या नसांना आजाराचा संसर्ग आल्यामुळे स्नायूंमधे कमकुवतपणा येतो व बोटांच्या हालचाली नीट होत नाही. पायातून चप्पल सटकते किंवा पाय उचलून टाकावा लागतो ( foot drop). या अवस्थेत डोळ्याच्या वर असलेल्या नसांना संसर्ग झाल्यास पापणीचे स्नायू कमकुवत बनतात व झोपेत डोळा पूर्ण बंद होत नाही. त्यामुळे बुब्बुळ सुकून डोळ्यात फुल पडू शकते. ( corneal opacity)

कधीकधी औषधोपचार सुरू केल्यानंतर काही दिवसांनी  रुग्णाला ताप  येऊन सांधे सुजतात. त्याचे चट्टे लाल होऊन ते सुजतात. अशा वेळी रुग्णाचा समज होतो की औषधांचा दुष्परिणाम झाला अथवा डॉक्टरांनी चुकीची औषधे दिली. लक्षात घ्या, या रोगाचे जंतू सहजपणे मरत नाहीत, तर त्यांची माणसाच्या रोगप्रतिकारकशक्ती बरोबर मारामारी चालू असते.  त्यामुळे असे होऊ शकते. ताबडतोब तुमच्या त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्या. आपल्या मनाने औषध बंद करू नका. 

या रोगाचे निदान कसे केले जाते – एखादा पांढुरका किंवा लालट चट्टा असल्यास त्या जागेचे स्पर्शज्ञान तपासण्यासाठी निर्जंतुक टाचणी ( वेदना ) , कापसाची वात ( हळुवार स्पर्श ) व गरम/ थंड पाण्याची काचनळी ( तापमानाची जाणीव ) यांचा वापर केला जातो . आसपासची नस जाड व दुखरी आहे का हे तपासले जाते . खात्री करण्यासाठी या चट्टायाचा छोटा तुकडा ( ३-४ मिमी एवढा ) तपासासाठी ( biopsy ) काढला जातो . आजार पुढच्या अवस्थेत असल्यास तसा तुकडा काढण्याऐवजी कानाच्या पाळ्यांची तसेच शरीरावरील एखाद्या गाठीची लस तपासासाठी घेऊन त्यामधे कुष्ठरोगाचे जंतू आहेत का हे सूक्ष्मदर्शकाखाली तपासले जाते .

या आजारावर उपाय काय आहे – आधुनिक औषधोपचार पद्धतीने हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो . यासाठी dapsone , clofazimine , rifampicin ही ३ औषधे वापरली जातात . कधी कधी clarithromycin, minocycline, ofloxacin ही प्रतिजैविके वापरली जातात. iआजार कमी असल्यास ६ महिने व आजार जास्त असल्यास १ ते २ वर्ष औषधोपचार नियमित घ्यावा लागतो. पायांना सुन्नपणा असल्यास microcellular rubber च्या सँडल्स वापरल्यास इजा होण्याची शक्यता कमी रहाते व जखमा होत नाहीत.

हातांना सुन्नपणा असल्यास गरम , धारदार वस्तूंशी संपर्क होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक असते. आजार बरा झाल्यानंतरही सुन्नपणा पूर्णपणे जातो असे नाही . त्यामुळे जखमा होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. खेचणे, खणणे, पिळणे अशा गोष्टी टाळाव्यात. हात पाय दुखल्यास गरम वस्तूने शेकू नयेत. लादी, जमीन  उन्हाने तापली असल्यास त्यावर अनवाणी चालू नये. आजार पूर्ण बरा झाल्यानंतर हातापायात काही विकृती राहिली असल्यास त्यासाठी सुधारात्मक शस्त्रक्रिया ( corrective surgery ) केल्या जातात.

लक्षात ठेवा- एखादा चट्टा फार दिवस अंगावर असेल व त्याला खाज येत नसेल तरी दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. हातापायांना वारंवार जखमा होत असतील पण ते समजून येत नसेल तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुष्ठरोगामुळे हातापायाची बोटे झडत नाहीत, पण  कुष्ठरोगांमध्ये हातापायांना सुन्नपणा येऊ शकतो व अशा व्यक्तीने  धगीजवळ किंवा घर्षणयुक्त काम करताना विशेष काळजी न घेतल्यास बोटांना वारंवार जखमा होऊन त्यामुळे बोटे आखूड होतात.

कुष्ठरोग हा इतर संसर्गजन्य आजारांप्रमाणेच एक आजार आहे . त्याची घृणा बाळगू नका . असा रुग्ण आपल्या घरी किंवा शेजारी किंवा कामाचे ठिकाणी असल्यास घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. नुसत्या प्रासंगिक ( casual ) स्पर्शाने तो आजार होत नाही. ज्याचा आजार कमी अवस्थेतील आहे त्यांच्याकडून तो दुसऱ्यांना पसरत नाही. 
 
कुष्ठरोगाचे निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित औषधे घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतः औषधे बंद करू नका. आधुनिक उपचार पद्धतीने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.