How Long Human Can Survive Without Food And Water: माणसाच्या तीन मूलभूत गरजांपैकी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे अन्न. अन्न व पाण्याचे महत्त्व तर अनन्यसाधारण आहे. अन्नाचे सेवन जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपण किती प्रमाणात जेवतोय हे सुद्धा बारकाईने पाहायला हवे. अलीकडे काही जण आवडीच्या नावावर प्रमाणाच्या पेक्षा जास्त जेवतात तर काही जण बारीक होण्याच्या किंवा गरजांच्या नावावर आपल्या वय, वजन, उंचीला ‘आवश्यक’ आहे तितकंही खात नाहीत. अतिजेवणाचे त्रास आपण सगळेच जाणतो पण अशाप्रकारे उपोषण किंवा अन्नत्याग करणे शरीरावर काय परिणाम करू शकते याविषयी आज जाणून घेऊया..

एखादी व्यक्ती अन्नाशिवाय किती दिवस जिवंत राहू शकते याविषयी हेल्थलाईनने सविस्तर माहिती दिली आहे. त्याआधारे असे समजते की, जगभरात आजवर न जेवता ८ ते २१ दिवस लोक जिवंत राहू शकतात अशा नोंदी आहेत. एखादी व्यक्ती अन्नाशिवाय किती काळ जगू शकते हे विविध घटकांवर अवलंबून असते, जसे की व्यक्तीचे वय आणि आरोग्य शिवाय पाण्याची उपलब्धता, इत्यादी..

Which of the raw and pasteurized milk is beneficial
कच्चे व पाश्चराइज्ड यापैकी कोणते दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर? तज्ज्ञांचे मत घ्या जाणून…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
kudo millets elephants death
‘कोदो मिलेट’च्या सेवनाने तीन दिवसांत १० हत्तींचा मृत्यू; कारण काय? काय आहे कोदो मिलेट?
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
What is the right time to have breakfast
सकाळी ८ ते १० नाही, तर नाश्त्याची ही वेळसुद्धा ठरू शकते फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचे मत…
Six hundred gram babys struggle to survive is finally successful
सहाशे ग्रॅम वजनाच्या बाळाचा जगण्याचा संघर्ष अखेर यशस्वी!
Belly fats how to burn belly fat using 5 20 30 method know from expert
Belly Fats: पोटाची चरबी वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ पद्धत एकदा वापरून पाहा

जेवण बंद केल्यास मृत्यू होऊ शकतो का? (Can A Person Die If Doesn’t Eat)

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीराला त्याची नेहमीची कामे पार पाडण्यासाठी पुरेशा कॅलरी मिळत नाहीत, तेव्हा शरीरावर साहजिकच वाईट परिणाम दिसू लागतात. यात एक भाग म्हणजे आपण अन्नाचे सेवनच कमी प्रमाणात करता किंवा दुसरं म्हणजे अन्नाचे सेवन करूनही तुमचे शरीर आवश्यक पोषक सत्वांचे शोषण नीट करू शकत नाही. जेव्हा या आवश्यक कॅलरीज दीर्घकाळासाठी शरीराला पुरवल्या जात नाहीत तेव्हा ऊर्जेसाठी शरीर तुमच्या स्नायूंची शक्ती खर्ची करण्यास सुरुवात करते आणि तरीही आपण लक्ष न दिल्यास यातून मृत्यूही ओढवू शकतो.

तुम्ही अन्नाशिवाय किती काळ जगू शकता हे सांगणारा काही ठोस फॉर्म्युला नाही. अन्न आणि पाणी नसल्यामुळे, शरीर जास्तीत जास्त एक आठवडा जगू शकते असे मानले जाते. पण जर तुम्ही अन्न टाळत असाल, आणि निदान पाणी वेळच्या वेळी मुबलक प्रमाणात पित असाल तर तुम्ही साधारण २ ते ३ महिने जगू शकता. मात्र पुन्हा आम्ही हेच अधोरेखित करू इच्छितो की ही शरीरासाठीची आदर्श स्थिती नाही.

बॉडी मास इंडेक्स किती असायला हवे? (How Much Should Be Your BMI?)

वजन कमी असणे, बॉडी मास इंडेक्स (BMI) १८.५ पेक्षा कमी असणे, हे कुपोषित असल्याचे लक्षण मानले जाते. यामुळे व्यक्तीचे आयुर्मान सुद्धा कमी होऊ शकते, याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, पाचक स्थितीत बिघाड आणि कर्करोग यांसारखे धोकेही वाढतात. २०१८ च्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की BMI १८.५ पेक्षा कमी असल्यास पुरुषांसाठी सरासरी ४.३ वर्षे आणि महिलांसाठी ४.५ वर्षे आयुष्य कमी होऊ शकते.

जेवण बंद केल्यावर प्रत्येक दिवशी शरीरात काय बदल होतात?

अन्न आणि पाण्याशिवाय दिवस आणि आठवडे जगणे आपल्यापैकी अनेकांना अशक्य वाटते. अगदी, अन्न आणि पाण्याशिवाय दिवसभराचा उपवास किंवा अगदी तासभराचा ताण आपल्यापैकी अनेकांची चिडचिड वाढवू शकतो. अल्पवधीसाठी अन्न त्याग करूनही फिट राहण्याचं/दिसण्याचं एक कारण म्हणजे ग्लुकोज. सामान्य परिस्थितीत, तुमचे शरीर अन्नाचे ग्लुकोजमध्ये विघटन करते. ग्लुकोज शरीराला ऊर्जा पुरवते. पहिल्या २४ तासांत अन्नाशिवाय, तुमचा ग्लुकोजचा साठा कमी झाल्यामुळे, तुमचे शरीर तुमच्या यकृत आणि स्नायूंमधून ग्लायकोजेनचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करू लागेल.

दुसऱ्या दिवशी अन्न न घेतल्यास तुमचे ग्लुकोज आणि ग्लायकोजेन कमी होते. आपले शरीर ऊर्जा प्रदान करण्यासाठी स्नायूंच्या ऊतींचे विघटन करण्यास सुरवात करेल. पण, आपले शरीर स्नायूंचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे, ते तोडण्यासाठी नाही. त्यामुळे तुमची चयापचय क्रिया मोठ्या प्रमाणात बदलत असताना हा टप्पा तात्पुरती ऊर्जा प्रदान करतो. स्नायूंचे या पेक्षा जास्त नुकसान टाळण्यासाठी, शरीर ऊर्जेसाठी केटोन्स तयार करण्यासाठी चरबीचा साठा वापरू लागते ही प्रक्रिया केटोसिस म्हणून ओळखली जाते.

पहिल्या पाच दिवसात अन्नाशिवाय, एखाद्या व्यक्तीने रोज १ ते २ किलो वजन कमी होऊ लागते. हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने कमी होणारे वजन इलेक्ट्रोलाइट असंतुलनाशी संबंधित आहे. काही दिवसांनी शरीरातील बदलांमुळे सामान्यत: दररोज सरासरी 0.3 किलोग्राम वजन कमी होते.

जितके जास्त फॅट उपलब्ध असतील तितके जास्त काळ एखादी व्यक्ती अन्नाशिवाय जगू शकते. मात्र एकदा का चरबीचे साठे पूर्णपणे वापरले गेले की मग, शरीर उर्जेसाठी स्नायूंच्या विघटनाकडे परत येते, कारण शरीरात हा एकमेव उरलेला इंधन स्त्रोत आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नल ट्रस्टेड सोर्स मधील एका अभ्यासात असे म्हटले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या शरीराच्या वजनाच्या १८% वजन अचानक कमी करते तेव्हा शरीराची एकूण कार्यक्षमता तितकीच कमी होत असते.

पाण्यात कॅलरीज नसूनही, फक्त पाण्यावर माणूस जिवंत कसा राहतो? (Does Water Has Calories)

पुरेशा प्रमाणात पाणी घेतल्याने, काही लोक काही आठवडे किंवा कित्येक महिने अन्नाशिवाय जगले आहेत. पाण्याच्या सेवनाने जगण्याची वेळ जास्त असते कारण शरीरात कॅलरीजची जागा पाणी घेत असते. १९९७ मधील एका अभ्यासात असे समजले होते की, एखाद्या व्यक्तीला जास्त काळ अन्न त्याग करून जिवंत राहण्यासाठी दिवसाला सुमारे १. ५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. लेखकाने पाण्यात दिवसभरात अर्धा चमचे मीठ घालण्याचा सल्ला दिला आहे.

हे ही वाचा<< १०० टक्के पोट कधीच भरू नये! जेवल्यावर ‘या’ ७ चुका तुमच्याकडूनही होतात का? त्याचे परिणाम वाचा 

टीप: वरील माहिती ही दुर्घटनेत अडकलेल्या किंवा जिवंत पुरल्या गेलेल्या काही दुर्दैवी घटनांमधील अभ्यासातून समोर आलेली आहे. अशा प्रकारचे कोणतेही प्रयोग प्रत्यक्ष अभ्यासासाठी झाले नाहीत, कारण ते नैतिकतेला धरून नाहीत.