द्राक्ष खायला कोणाला आवडतं नाही? क्वचितच एखादी व्यक्ती असेल जी द्राक्ष खात नसेल. द्राक्ष खाण्याचे आरोग्यासाठी कित्येक फायदे आहेत. द्राक्ष खाल्यानंतर आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे देखील आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. या आधीच्या लेखात आपण द्राक्ष खाल्याने आपल्या आतड्यावर कसा परिणाम होतो हे पाहिले. द्राक्षांच्या सेवनामुळे आतड्यातील काही बॅक्टेरिया कमी होता तर काही वाढतात असे एका संशोधनातून स्पष्ट झाले. तसेच द्रांक्षाच्या सेवनामामुळे आपल्या ह्रद्याच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? द्राक्षांमुळे कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढते का?याबाबत आपण डॉक्टरांकडून जाणून घेतले. आता या लेखात आपण द्राक्षांचे सेवन कसे करावे याबाबत जाणून घेणार आहोत. एका दिवसात किती द्राक्ष खावे? तसेच मधूमेही व्यक्तींनी द्राक्षाचे सेवन कसे करावे याबाबत अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ याय
एका दिवसात किती द्राक्षे खाऊ शकता?
प्रत्येक व्यक्तीसाठी द्राक्षांच्या सेवनाचे प्रमाणा वेगवेगळे असू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक आहाराच्या गरजा, एकूण उष्मांक आणि वैयक्तिक प्राधान्य यासारख्या घटकांवर अवलंबून द्राक्षांच्याचे सेवनाचे प्रमाण बदलू शकतो. पण, एक सामान्य मार्गदर्शक तत्त्वे म्हणून, अमेरिकन हार्ट असोसिएशनने संतुलित आहाराचा भाग म्हणून दररोज सुमारे १.५ ते २ कप फळे खाण्याची शिफारस केली आहे.
हेही वाचा – द्राक्षांमुळे कोलेस्टॉलची पातळी कमी होते का? ह्रदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम?
जेव्हा द्राक्षांचा विचार केला जातो तेव्हा सामान्य सर्व्हिंगचे प्रमाण सुमारे २ कप असते, जे अंदाजे ३२ द्राक्षांच्या इतके असतो. हे सर्व्हिंग सुमारे १०४ कॅलरीज देते. लक्षात ठेवा की ,द्राक्षांमध्ये नैसर्गिक शर्करा तुलनेने जास्त आहे, म्हणून ते कमी प्रमाणात सेवन करणे आणि कॅलरीचे प्रमाण संतुलित करण्यासाठी काही कार्ब मोजणे महत्वाचे आहे.
हेही वाचा – रोज द्राक्ष खाल्यामुळे आतड्यांतील बॅक्टेरिया वाढतात का? जाणून घ्या काय सांगते संशोधन
मधुमेही व्यक्तींनी आहारात द्राक्षांचा समावेश कसा करावा?
1)द्राक्ष खाण्याचे प्रमाण नियंत्रित करा: साधारण १७ लहान किंवा अर्धा कप द्राक्षांमध्ये अंदाजे १५ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. तुम्हाला द्राक्ष खायचे असल्यास पदार्थांमधून मिळणारे कार्बोहायड्रेट कमी करावे लागेल.
2) कार्बोहायड्रेट्सचे पचन कमी करण्यासाठी प्रथिने आणि फायबरच्या जोडीने द्राक्षांचे सेवन करा.
३) द्राक्षांचा तुमच्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे निरीक्षण करा आणि आवश्यकतेनुसार बदल करा.