“कित्ती गोड हसतं बाळ तुझं!” एक जण दुसरीला म्हणाली. बाळाची आई सुखावली. म्हणाली, ‘अगं, हसराच आहे तो. कुणाकडेही बघून हसतो.”
बाबा गमतीने म्हणत होते,” आमची मुलगी वाट्टेल त्याच्याकडे पाहून हसत नाही. अगदी ६ महिन्यांचीच आहे, पण एकदम choosy! हळूहळू गप्पा मारत तिला खुलवायला लागतं. नीटनेटके कोणी असेल तर लवकर खूष होऊन हसते!”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरी कोणी आई तक्रारीच्या स्वरात सांगत असते, “ एक तर रात्री धड झोपत नाही आणि मग दिवसभर रड रड करतो! कधी कधी कळतच नाही, काय करावे ते!” अगदी लहानपणापसून असे आपल्या स्वभावाचे रंग बाळ दाखवू लागते. प्रत्येक मुलाची प्रकृती वेगळी. अगदी जन्मापासून बाळाची भावना व्यक्त करण्याची पद्धत आणि वातावरणातील विविध गोष्टींना प्रतिक्रिया देण्याची पद्धत याला त्या बाळाची ‘स्वाभाविक मनोवृत्ती’(temperament) म्हटले जाते. सर्वसाधारणपणे बाळांचे तीन प्रकारचे स्वभाव असतात. Easy child, slow to warm child and difficult child. वरील उदाहरणांमध्ये कोणते बाळ कोणत्या प्रकारात मोडते ते आपल्या लगेच लक्षात येते. थॉमस आणि चेस या दोन मानसशास्त्रज्ञांनी बाळांच्या या स्वाभाविक मनोवृत्तीचे काही गुणधर्म वर्णन केले आहेत. हालचालीचे प्रमाण, नियमितता, नवीन माणसे किंवा परिस्थितीला बाळाची पहिली प्रतिक्रिया, बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता, संवेदनशीलता, उर्जा, मूड म्हणजे हसरे, रडके, कुरकुर करणारे इ., एक गोष्ट लक्ष देऊन करत राहणे, कशानेही लक्ष विचलित होणे किंवा दुसरीकडे लक्ष वेधले जाणे असे ते गुणधर्म बाळाच्या स्वभाव विशेषांविषयी बरेच काही सांगून जातात.

हेही वाचा : पूनम पांडेचं ‘सर्व्हीकल कॅन्सर’मुळे निधन! गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले १० मुद्दे

सहज स्वभावाची मुले(easy child) नवीन माणसे, नवीन परिस्थितीला चांगल्या पद्धतीने सामोरे जातात. सहज जुळवून घेतात. मूडही छान असतो, सकारात्मक असतो. नव्या नव्या गोष्टीना तीव्र प्रतिसाद देत नाहीत, तर सहज प्रतिसाद देतात. त्यांच्या खाणे, पिणे, झोपणे अशा क्रियाही नियमित असतात. ही मुले सहजपणे मिसळतात. एक खेळ थांबवून दुसरा खेळायचे म्हटले तर त्याला लगेच तयार होतात.

आडमुठ्या स्वभावाची मुले (Difficult children) नवीन माणसे आणि नवीन परिस्थितीला सहजपणे सामोरे जाऊ शकत नाहीत. त्यांच्या प्रतिक्रिया तीव्र असतात, मूड नकारात्मक असतो. सहजपणे कशाशी जुळवून घेऊ शकत नाहीत. ह्या मुलांच्या सावयीसुद्धा नियमित नसतात. झोप नीट लागत नाही, मध्यरात्री जग आल्यावर परत झोपवायला खूप त्रास होतो. बाळ रडके, चिडके असते आपले बाळ ‘आडमुठे’ आहे हे आई वडिलांना जाणवत राहते. एक खेळ बंद करून सगळ्यांनी मिळून दुसरे काही खेळायचे ठरले, तर हा मुलगा थयथयाट करतो आणि सगळ्यांशी जुळवून घेऊ शकत नाही. सहजपणे सगळे ठरवतील ते करणे त्याला फार कठीण वाटते.

हेही वाचा : दररोज नारळाच्या पाण्यात ‘हा’ पदार्थ टाकून प्या; वाढत्या वजनासह बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर?

हळू हळू खुलणारा स्वभाव(slow to warm) असलेली मुले शांत असतात, चळवळी नसतात. ही सुद्धा नवीन माणसे आणि नवीन परिस्थितीने बावरून जातात, सहजपणे जुळवून घेऊ शकत नाहीत. काहीशी नकारात्मक असतात. पुरेशी ओळख झाली की मात्र त्या माणसाचा स्वीकार करतात, हसतात, खेळतात, बोलतात आणि मोकळेपणाने वागतात. एखाद्या एकत्रीकरणाच्या प्रसंगी इतर मुलांना खेळताना ही पाहत राहतात. थोड्या वेळाने, हळू हळू सगळ्यांमध्ये सामील होतात आणि मग मजा अनुभवतात.

आपले मूळ लहानपणी कसे वागते यावर त्याचा पुढील स्वभाव अवलंबून असतो का? लहानपणी आडमुठ्या स्वभावाचे असलेले मूळ मोठेपणीही तसेच राहते का? लहानपणी लाजाळू असलेले मूळ पुढे जाऊन लाजाळूच राहते का? या बरोबरच माझ्या मुलाच्या स्वभावाप्रमाणे माझे वागणे बदलले पाहिजे का? मी एक चांगला पालक आहे ना? असे अनेक प्रश्न आणि शंका मनात निर्माण होऊ शकतात.

जन्मतः असणारी स्वाभाविक मनोवृत्ती(temperament) ही अनुवांशिकता आणि बाळाच्या अवतीभवतीची परिस्थिती या दोहोंच्या एकत्रित परिणामातून बनते. बाळामध्ये काही विशिष्ट जनुके असली आणि बाळाची आईही त्याला असंवेदनशील पद्धतीने हाताळत असेल तर बाह्य वर्तणुकीच्या समस्या (externalizing behavioural issues) जास्त प्रमाणात दिसतात, याच बाळाची आई त्याला संवेदनशीलपणे हाताळत असेल, तर त्याच्या बाह्य वर्तणुकीच्या समस्या खूप कमी आढळतात. आडमुठ्या स्वभावाच्या मुलाला उत्तम प्रकारे वाढवणारे पालक लाभले तर त्याची बौद्धिक, भावनिक, सामाजिक प्रगती अगदी सहज स्वभावाच्या मुलापेक्षाही जास्त प्रमाणात होते! म्हणजेच, अनुवंशिकतेबरोबरच वातावरण, पालकत्त्व या सगळ्याचा मुलाच्या स्वाभाविक मनोवृत्तीवर आणि विकासावर परिणाम होतो.

हेही वाचा : Soaked Raisins : रात्रभर भिजवलेले मनुके खाणे का चांगले आहेत? जाणून घ्या मनुके खाण्याचे फायदे, तज्ज्ञ सांगतात…

सहजपणे न मिसळता येणे, नवीन माणसांसमोर किंवा नवीन परिस्थितीत बुजून जाणे असा स्वभाव लहानपणी असला तर मोठेपणी समाजात वावरताना बुजरेपणा निर्माण होऊ शकतो, तसेच अतिचिंतेचा त्रास होऊ शकतो. पण मूलतः लाजऱ्याबुजऱ्या स्वभावाच्या मुलाला वाढवताना आई वडील कसे वागले हे ही महत्त्वाचे ठरते. सतत मुलाच्या सुरक्षिततेबाबत शंका घेऊन ‘हे करू नकोस’, ‘इथे चढू नकोस’ असे बंधने घालणारे पालक असतील, किंवा मुलाला निर्णय घेण्याचे, नवीन काही करून पाहण्याचे स्वातंत्र्य न देणारे पालक असतील तर मनातली भीती वाढते. लक्षात ठेवले पाहिजे ते असे की अशा मुलांपैकी ५०% मुलांपेक्षा अधिक मुलांना अतिचिंता निर्माण होत नाही. हे ही महत्त्वाचेच!

आपल्या वयाच्या मुलांमध्ये मिसळण्याची सवय झाली, मित्र मैत्रिणी मिळाले, तर मुलांची निरोगी वाढ आणि विकास व्हायला नक्कीच मदत होते. मुलांच्या विकासामध्ये पालकत्वाची मोठी भूमिका असते असे लक्षात येते. त्या संबंधी पुढील लेखात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many types of natural temperament babies have hldc css
Show comments