चिप्स हे आपल्यापैकी जवळपास सर्वांचे आवडते स्नॅक्स आहे. कुरुकुरीत आणि चविष्ट चिप्स खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आजकाल बाजारामध्ये विविध फ्लेवरचे चिप्स उपलब्ध आहेत; ज्यांची चव आपल्या जिभेवर रेंगाळते. पण, चिप्स खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का, याबाबत तुम्ही कधी केलाय? तुम्हाला माहितीये का, तुम्ही खात असलेल्या चिप्सद्वारे तुमच्याकडून रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे (साखरेचे) भरपूर प्रमाण असलेल्या स्नॅकचे सेवन केले जाते. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. याबाबत सहमती दर्शवत अहमदाबाद येथील झायडस हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ श्रुती के. भारद्वाज यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्ट केले, “सहसा चिप्समध्ये आढळणारी साखर ही अनेकदा प्रक्रिया करताना वापरली जाते; ज्यामुळे निर्माण होणारी चव आपल्याला खूप आवडते. त्याव्यतिरिक्त चिप्समध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तदाब वाढतो आणि शरीरातील पाण्याची पातळी दीर्घ काळ टिकून राहते.”

एका चिप्सच्या पॅकेटमध्ये असलेल्या साखरेचे प्रमाण हे प्रत्येक ब्रॅण्ड आणि त्यांच्या चवीवर अवलंबून असते आणि जे वेगवेगळे असू शकते. “सामान्यत: पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या बटाट्याच्या चिप्समध्ये साखरेचा समावेश नसतो; पण जर त्यात बार्बेक्यू किंवा स्वीट चिली फ्लेवर जोडला असेल, तर त्यांच्या मसाला मिश्रणात साखर मिसळलेली असू शकते,” असे बंगळुरूच्या क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या चीफ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट असलेल्या व्ही. अभिलाषा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
National Sugar Factory Federation made various demands to the Central government
साखर उद्योग आर्थिक संकटात ? राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केंद्राकडे केल्या विविध मागण्या
Corn-Rawa Balls recipe
अवघ्या १५ मिनिटांत बनवा कॉर्न- रवा बॉल्स; वाचा सोपी रेसिपी

कधीतरी चिप्स खाणे हे हानिकारक नाही; पण नियमितपणे चिप्स खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अति प्रमाणात चिप्स खाल्यास त्यातील रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि साखरेमुळे वजन वाढू शकते. तसेच इन्सुलिन प्रतिरोधक क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि टाईप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. ज्यांना रक्तदाब किंवा हृदयविकाराचा धोका आहे, त्यांना चिप्समधील जास्त सोडियम घटकामुळे त्रास होऊ शकतो.

चिप्समधील साखरेचे प्रमाण आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत अभिलाषा यांनी सांगितलेले काही महत्त्वाचे मुद्दे :

चिप्समध्ये किती प्रमाणात आणि कोणत्या प्रकारची साखर आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे

सामान्यत: चिप्समध्ये विशेषत: साखरेचे प्रमाण जास्त नसते; पण विविध प्रकारच्या फ्लेवरनुसार चिप्समध्ये साखरेचे प्रमाण कमी-जास्त असू शकते हे लक्षात घ्या

चिप्सच्या पॅकेटवरील साहित्याच्या यादीमध्ये सुक्रोज, ग्लुकोज, फ्रॅक्टोज किंवा इतर गोड पदार्थांच्या स्वरूपात साखर वापरल्याचे दिसून येईल; जे सहसा मसाला तयार करण्यासाठी वापरले जाते.

चिप्स खाण्यामुळे होणारे परिणाम

चिप्समध्ये आरोग्यास हानिकारक फॅट्सचे जास्त प्रमाण असते. सामान्यतः सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात चिप्सचे सेवन करणे, वजन वाढणे आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

नियमितपणे चिप्स खाल्यास त्यात सोडियम घटक भरपूर प्रमाणात असल्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.

चिप्स कॅलरीजने समृद्ध असतात आणि त्यात पौष्टिक घटक कमी असतात. जर आहारात आरोग्यदायी पदार्थांऐवजी चिप्सचे सेवन केले, तर त्यामुळे वजन वाढू शकते आणि शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता होऊ शकते.

हेही वाचा – रात्री फ्रिजमध्ये ठेवलेली पोळी सकाळी खावी का? शिळी पोळी रक्तातील साखरेचे नियमन करू शकते का? तज्ज्ञ काय सांगतात

तुमच्या आवडत्या चिप्समध्ये साखर आहे का? (How to know if your favourite packet of chips has any added sugar?)

विशिष्ट ब्रॅण्ड किंवा चिप्सच्या फ्लेवरमध्ये असलेले साखरेचे अचूक प्रमाण शोधण्यासाठी चिप्सच्या पॅकेजिंगवर असलेल्या पौष्टिक घटकांचे लेबल तुम्ही तपासू शकता. “पॅकेजवर एकूण कर्बोदक विभागामध्ये (Total Carbohydrates) दिलेल्या साखरेचे प्रमाण पाहा. ते सूचित करेल की, त्यात साखरेचे प्रमाण किती आहे. लक्षात ठेवा की, “प्रत्येक प्रकारच्या चिप्समध्ये साखर वापरलेली नसते. विशेषत: सामान्य (Normal) चिप्समध्ये साखर वापरत नाहीत”, असे अभिलाषा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या

या गोष्टी लक्षात ठेवा

चिप्सचे सेवन केल्याने मुले आणि गरोदर आईच्या आहारातील पौष्टिक घटकांवर परिणाम होतो आणि आरोग्याचा धोका निर्माण होतो असे अभिलाषा यांनी नमूद केले.

चिप्स खाण्याचा आनंद मनापासून घेण्यासाठी ते किती प्रमाणात खात आहोत याकडे लक्ष द्या आणि शक्य असेल तेव्हा बेक केलेले किंवा एअर-पॉप प्रकारचे चिप्स निवडा. “चिप्सच्या पॅकेटवरील पोषण लेबले वाचताना, चिप्सचा आकार व त्यातील घटक लक्षात घेऊन तुम्ही आरोग्यासाठी योग्य ठरतील अशा चिप्सची निवड करू शकता. भाज्या किंवा प्रथिने यांसारख्या आरोग्यदायी पर्यायांसह चिप्सचे सेवन केल्यास, तो संतुलित नाश्ता ठरू शकतो”, असे भारद्वाज यांनी पुढे सांगितले.

शेवटी, संयम महत्त्वाचा आहे. संतुलित आहारामध्ये अधूनमधून चिप्सचा आनंद घेतल्यास लक्षणीय प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाही. पण, त्यांचे सतत अति प्रमाणात सेवन केल्यास कालांतराने आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.