मी सॅलड मध्ये दाण्याचा कूट वापरु का?
जेवताना दाण्याची चटणी चालेल का?
असे प्रश्न आहार तज्ञांना सवयीचे आहेत. विगन आहार पद्धतीमुळे सध्या दाणे आणि त्याचे विविध पदार्थ बाजारात मिळू लागले आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय शेंगदाणे दिवस 13 सप्टेंबर रोजी असल्याने दाण्यांची माहिती घेणे हक्काच ठरतं तर शेंगदाणे हा महाराष्ट्रीयन तसेच अनेक आहार पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून आहार समाविष्ट करणे किंवा शेंगदाण्याची चटणी तयार करणे किंवा कोशिंबीर तयार करताना त्यात शेंगदाणे घालून किंवा पोहे तयार करताना तेलावरच शेंगदाणे परतून घेणे किंवा कोणतीही पालेभाजी तयार करताना त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थांचे योग्य प्रमाण यावे म्हणून शेंगदाण्याचा कूट तयार करणे किंवा उपवासाच्या दिवशी स्निग्ध पदार्थांचा योग्य प्रमाणात वापर यासाठी देखील दाण्यांचा सर्रास वापर केला जातो.
दाणे भाजलेल्या स्वरूपात उकडलेला स्वरूपात किंवा कोणत्याही वेगळ्या स्वरूपामध्ये नेहमी आहारामध्ये समाविष्ट केले जातात. जगामध्ये अनेक भागांमध्ये शेंगदाण्याचे उत्पन्न घेतले जातात आणि भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो ज्यावेळेला शेंगदाण्यांचा विचार होतो त्या वेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दाण्यांचा उपयोग कधीपासून सुरू झाला.
आणखी वाचा: डाएट जीआय म्हणजे काय कमी जीआय असलेले पदार्थ कोणते
दाण्यांच्या वापराची सुरुवात खरंतर पेरू देशापासून झाली सुमारे 1860 च्या दरम्यान देवासाठी प्रसाद म्हणून दाणे दाणे वाहिले जायचे त्यानंतर 1960 च्या सुमारास जॉर्ज कारवर नावाच्या व्यक्तीने ज्यांना दाण्याच्या बाजारातील पदार्थांबद्दलचा पिता असेच मानले जाते यांनी दाणे आणि त्यापासून बनणाऱ्या व्यवस्थित विविध पदार्थांच्या व्यवसायांसाठी अमेरिकेत सुरुवात केली. प्राणीजन्य प्रथिना ऐवजी वनस्पतीजन्य प्रथिने म्हणून उपयुक्त प्रथिनांचा स्त्रोत म्हणून गणला जाऊ लागला. भारतामध्ये दाण्यांची आहारातील महती फार मोठी आहे.
दाण्यांमध्ये असणारे रिझर्वेट्रॉल, फिनालिक ऍसिड आणि फायटिंग कंपाउंड यांच्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊ शकते मात्र दाणे खाताना एकावेळी किंवा दिवसभरात १६ ते २० दाण्यांपेक्षा जास्त दाणे खाऊ नये. दाण्यां मध्ये को एनझाइन क्यू टेन आणि अनेक उत्तम अमायनो ऍसिड्स असतात.
आणखी वाचा: Health Special: ‘हा’ आहे हॅपी डाएटिंगचा फंडा
दाणे आहार शास्त्रातील देखील अत्यंत उपयुक्त आहेत ठाण्यामध्ये असणाऱ्या उत्तम प्रकारच्या मोनो अनसॅच्युरिटेड ऍसिड्समुळे त्याचे शरीरातील पचन देखील अत्यंत चांगल्या स्वरूपात होऊ शकते दाण्यांमध्ये किमान 26 टक्के प्रथिने असतात त्यामुळे वनस्पतीजन्य आहारामध्ये दाण्यांचे महत्त्व अमाप आहे मात्र यासोबत दहा ते १४ टक्के असणाऱ्या ट्रान्स फॅट्स मुळे दाण्यांचे आहारातील वापरावर काही अंशी परिणाम होऊ शकतो ज्यांना अल्झायमर आहे किंवा ज्यांना कोणत्याही प्रकारचा मेंदूशी निगडित आजार आहे त्यांच्यासाठी दाणे वरदान आहेत. लहान मुलांमध्ये तसेच वाढत्या वयातील मुलांमध्ये ऊर्जेचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि तल्लख बुद्धीसाठी किमान दहा ग्राम दाणे खाणे आवश्यक आहे अनेक अनेक संशोधनानुसार दाण्यांचा आहारातील नियमित वापर किमान दहा ते चौदा टक्के वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते त्यामुळे दाण्यांचा आहारात वापर करताना तो माफक प्रमाणात पण नित्यनियमाने केल्यास कोणतेही नुकसान होत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दाण्यांच्या बाबतीत त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे तुमची शरीरातील साखर वाढत नाही त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांना देखील दाणे खाण्यास हरकत नाही.
काही व्यक्तींमध्ये दाण्यांची ऍलर्जी आढळून येते या एलर्जीचे कारण दाण्याचे आवरण आणि दाण्यामुळे असलेल्या विशेष प्रकारची प्रथिने असू शकतात. अशा व्यक्तींमुळे मध्ये दाणे खाल्ल्या खाल्ल्या डोळ्यांना सूज, ओठ सूजणे, उलटी होणे किंवा शरीरावर चट्टे उठणे अशा प्रकारचे परिणाम आढळून येतात या लोकांनी दाणे किंवा कोणताही पदार्थ खाताना तो दाण्यांसोबत तयार केलेला नाहीये ना याची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या बाजारामध्ये वनस्पतीजन्य आहाराच्या निमित्ताने तुम्हाला दाण्याचे दूध किंवा दाण्यापासून तयार केलेले पनीर असे पदार्थ तयार केले जातात हे सगळे पदार्थ आरोग्यासाठी पोषक आहेत मात्र आहार नियमन करताना किंवा कोणताही आहार फॉलो करताना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये .