How much hair loss is natural? : केस हा प्रत्येकासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण- केस व्यक्तीचे सौंदर्य वाढवितात. प्रत्येकाला जाड, चमकदार केस आवडतात, बरोबर? पण, आजकाल केस गळणे आणि पातळ होणे अगदी सामान्य झाले आहे. अनेकांना केसगळतीचा सामना करावा लागतो. ताणतणाव, जीवनशैली, प्रदूषण व योग्य पोषक घटकांचा अभाव यांमुळे केसगळतीची समस्या उद्भवते. केसांची निगा राखण्यासाठी आपण शॅम्पूपासून ते तेलांपर्यंत अनेकविध साधनांचा वापर करतो. केस गळणे हे एक नैसर्गिक चक्र मानले जाते. तज्ज्ञांनुसार सामान्य केसगळती असेल, तर काळजी करण्यासारखे काहीही नसते. या लेखातून आपण दररोज किती केस गळणे सामान्य असते आणि कधी सावध व्हायला हवे याबाबत जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई येथील स्किन केअर क्लिनिकच्या त्वचाविज्ञानी डॉ. शरीफा चौसे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. डॉक्टर सांगतात, “केस धुताना केस गळणे पूर्णपणे सामान्य बाब आहे. त्यावेळी सरासरी दररोज ५० ते १०० केस गळणे सामान्य आहे आणि शॅम्पू करताना थोडे अधिक.”

मात्र, काही वेळा केसगळतीकडे गांभीर्याने बघण्याची गरज असते. केसांचे झुपके, अचानक वाढलेले केस गळणे किंवा केस पातळ होणे असे काही दिसल्यास ते तणाव, हार्मोनल असंतुलन किंवा पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे होऊ शकते. अशा परिस्थितीत मूळ कारण शोधणे महत्त्वाचे आहे.

डॉ. चौस यांनी केसांची काळजी घेण्याच्या दृष्टीने सुचवलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स खालीलप्रमाणे :

सौम्य शैम्पू निवडा : तुमच्या केसांच्या प्रकाराला अनुकूल असा सल्फेटमुक्त
सौम्य शैम्पू निवडा. कठोर रसायने कालांतराने केस कमकुवत करू शकतात.

केस धुण्याआधी विंचरा : केस तुटणे टाळण्यासाठी आणि गुंता होऊ नये म्हणून, तसेच केसगळती कमी करण्यासाठी शॅम्पू करण्यापूर्वी केस हलक्या हाताने विंचरून घ्या.

गरम पाणी टाळा : गरम पाण्याने केस धुण्याने नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्यामुळे केस कमकुवत होतात. त्याऐवजी थंड किंवा कोमट पाणी वापरा.

टाळूला हलक्या हाताने मसाज करा : केसा़च्या मुळांशी जास्त घासणे टाळा. मुळांना ताण न देता स्वच्छ करण्यासाठी तुमच्या टाळूला हलक्या हाताने मसाज करा.

ओव्हरवॉश करू नका : वारंवार केस धुण्यामुळे टाळू कोरडी होऊ शकते आणि त्यामुळे केस तुटणे वाढू शकते. आठवड्यातून दोन ते तीनपेक्षा जास्त वेळा केस धुऊ नये.

केसगळती केव्हा चिंतेचे कारण असते? तुमचे केस एकत्र आणि मोठ्या प्रमाणात गळत असतील आणि टाळूवर टक्कल पडत असेल, तर ते चिंतेचे कारण असू शकते. तुमच्या केसगळतीची समस्या आरोग्याशी संबंधित असू शकते. अशा प्रकारची केसगळती ही एखाद्या गंभीर आजाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. केसगळती जास्त प्रमाणात होत
असल्यास आवर्जून तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सहज करता येणाऱ्या या सोप्या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करा.