Jaggery Benefits : गूळ हा ऊस आणि ताडाच्या झाडाच्या रसापासून तयार करण्यात येणारा गोड पदार्थ आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुळाला विशेष महत्त्व आहे. हा पदार्थ मुख्यत: चिक्की किंवा लाडू तयार करण्यासाठी वापरला जातो.

जरी गुळाच्या सेवनाने अनेक पौष्टिक फायदे मिळतात तरीही त्याचा प्राथमिक घटक साखर आहे आणि त्यामुळे गुळाच्या सेवनाविषयी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विशेषत: मधुमेह असणाऱ्या लोकांनी साखरेच्या सेवनावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अशा वेळी साखरेची पातळी न वाढवता, आपण गुळाचे पौष्टिक गुणधर्म कसे मिळवू शकतो? हे जाणून घेणे आवश्यक आहे.
याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या न्युट्रिशनिस्ट कनिका नारंग यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली. (How much jaggery should eat everyday read how is it beneficial than sugar)

Sugar factory workers warn of strike Government announces committee for wage hike Mumbai news
साखर कारखाना कामगारांचा संपाचा इशारा; वेतनवाढीसाठी सरकारकडून समितीची घोषणा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
clean up marshal action against those responsible for littering
क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३ कोटी दंड जमा
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड

साखरेपेक्षा गूळ कसा वेगळा आहे?

गूळ हा प्रक्रिया करून तयार करण्यात येतो आणि गुळामध्ये पौष्टिक घटक आढळतात. गुळामध्ये सुक्रोज असते. तसेच लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम व कॅल्शियम यांसारखी खनिजे असतात. गुळामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्ससुद्धा असतात. गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ५५ असतो; तर रिफाइंड साखरेचा ६५ असतो.
एक चमचा (२० ग्रॅम) गुळामध्ये अंदाजे ६५-७५ कॅलरी असतात आणि १५-१६ ग्रॅम साखर असते. त्याचबरोबर त्यात ११ टक्के लोह व चार टक्के मॅग्नेशियम असते.

हेही वाचा : Eating Peanuts Every Day: दररोज मूठभर शेंगदाणे खाणं योग्य ठरेल का? आहारतज्ज्ञांनी सांगितलेले हे चार फायदे-तोटे जाणून घ्या

सुक्या मेव्यासह गुळाचे सेवन कसे फायदेशीर ठरते?

बदाम, काजू व शेंगदाण्यांसारख्या सुक्या मेव्यामुळे चांगले फॅट्स, प्रोटिन्स व फायबर मिळते. त्यामुळे साखरेचे शोषण कमी करण्यास मदत होते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. वेलची, दालचिनी व बडीशेप यांसारखे पदार्थ फक्त जि‍भेची चवच वाढवत ना,त तर ते रक्तातील साखरही नियंत्रित करतात. उदा. चिक्की किंवा गूळ-शेंगदाणे प्रोटीन्स आणि चांगले फॅट्स शरीराला पुरवतात, जे गुळातील कार्बोहायड्रेट संतुलित करण्यास मदत करतात.

तिळाचे लाडू करताना त्यात गुळाचा समावेश करा. तिळामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम असतात. चहामध्ये गूळ, आले व दालचिनी टाका. या पदार्थांमधीलअँटिऑक्सिडंट्समुळे पचनाशी संबंधित फायदे वाढतात.

सेवनाचे प्रमाण ठरवा

डब्ल्यूएचओ (WHO)च्या शिफारशीनुसार, साखर ही तुमच्या दररोजच्या कॅलरीज सेवनामध्ये पाच टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. २००० कॅलरीयुक्त आहारासाठी दररोज गूळ आणि इतर गोड पदार्थांचा समावेश करून २५-५० ग्रॅम साखरेचे सेवन करावे.

ज्या लोकांना मधुमेह नाही, त्यांनी दैनंदिन जीवनात १०-१५ ग्रॅम म्हणजेच अंदाजे एक चमचा साखर घ्यावी. उदा. गूळ आणि सुक्या मेव्याचा एक तुकडा सकाळी, दुपारच्या जेवणानंतर घ्यावा. त्यामध्ये प्रोटीन्स आणि फायबरचा समावेश केला, तर मधुमेह असलेल्या लोकांना ५-१० ग्रॅम साखरेचे सेवन करता येते.

हेही वाचा : Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स

कोणत्या वेळी गुळाचे सेवन करावे?

सकाळी आणि दुपारच्या जेवणानंतर स्नॅक म्हणून तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. त्यामुळे चयापचय क्रिया सुरळीत राहते. चहा, तसेच गोड व खमंग पदार्थांमध्ये गुळाचा समावेश करा आणि एकूण साखरेचे सेवन तपासा.

Story img Loader