Jaggery Benefits : गूळ हा ऊस आणि ताडाच्या झाडाच्या रसापासून तयार करण्यात येणारा गोड पदार्थ आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुळाला विशेष महत्त्व आहे. हा पदार्थ मुख्यत: चिक्की किंवा लाडू तयार करण्यासाठी वापरला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जरी गुळाच्या सेवनाने अनेक पौष्टिक फायदे मिळतात तरीही त्याचा प्राथमिक घटक साखर आहे आणि त्यामुळे गुळाच्या सेवनाविषयी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विशेषत: मधुमेह असणाऱ्या लोकांनी साखरेच्या सेवनावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अशा वेळी साखरेची पातळी न वाढवता, आपण गुळाचे पौष्टिक गुणधर्म कसे मिळवू शकतो? हे जाणून घेणे आवश्यक आहे.
याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या न्युट्रिशनिस्ट कनिका नारंग यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली. (How much jaggery should eat everyday read how is it beneficial than sugar)
साखरेपेक्षा गूळ कसा वेगळा आहे?
गूळ हा प्रक्रिया करून तयार करण्यात येतो आणि गुळामध्ये पौष्टिक घटक आढळतात. गुळामध्ये सुक्रोज असते. तसेच लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम व कॅल्शियम यांसारखी खनिजे असतात. गुळामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्ससुद्धा असतात. गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स ५५ असतो; तर रिफाइंड साखरेचा ६५ असतो.
एक चमचा (२० ग्रॅम) गुळामध्ये अंदाजे ६५-७५ कॅलरी असतात आणि १५-१६ ग्रॅम साखर असते. त्याचबरोबर त्यात ११ टक्के लोह व चार टक्के मॅग्नेशियम असते.
सुक्या मेव्यासह गुळाचे सेवन कसे फायदेशीर ठरते?
बदाम, काजू व शेंगदाण्यांसारख्या सुक्या मेव्यामुळे चांगले फॅट्स, प्रोटिन्स व फायबर मिळते. त्यामुळे साखरेचे शोषण कमी करण्यास मदत होते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. वेलची, दालचिनी व बडीशेप यांसारखे पदार्थ फक्त जिभेची चवच वाढवत ना,त तर ते रक्तातील साखरही नियंत्रित करतात. उदा. चिक्की किंवा गूळ-शेंगदाणे प्रोटीन्स आणि चांगले फॅट्स शरीराला पुरवतात, जे गुळातील कार्बोहायड्रेट संतुलित करण्यास मदत करतात.
तिळाचे लाडू करताना त्यात गुळाचा समावेश करा. तिळामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम असतात. चहामध्ये गूळ, आले व दालचिनी टाका. या पदार्थांमधीलअँटिऑक्सिडंट्समुळे पचनाशी संबंधित फायदे वाढतात.
सेवनाचे प्रमाण ठरवा
डब्ल्यूएचओ (WHO)च्या शिफारशीनुसार, साखर ही तुमच्या दररोजच्या कॅलरीज सेवनामध्ये पाच टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. २००० कॅलरीयुक्त आहारासाठी दररोज गूळ आणि इतर गोड पदार्थांचा समावेश करून २५-५० ग्रॅम साखरेचे सेवन करावे.
ज्या लोकांना मधुमेह नाही, त्यांनी दैनंदिन जीवनात १०-१५ ग्रॅम म्हणजेच अंदाजे एक चमचा साखर घ्यावी. उदा. गूळ आणि सुक्या मेव्याचा एक तुकडा सकाळी, दुपारच्या जेवणानंतर घ्यावा. त्यामध्ये प्रोटीन्स आणि फायबरचा समावेश केला, तर मधुमेह असलेल्या लोकांना ५-१० ग्रॅम साखरेचे सेवन करता येते.
कोणत्या वेळी गुळाचे सेवन करावे?
सकाळी आणि दुपारच्या जेवणानंतर स्नॅक म्हणून तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. त्यामुळे चयापचय क्रिया सुरळीत राहते. चहा, तसेच गोड व खमंग पदार्थांमध्ये गुळाचा समावेश करा आणि एकूण साखरेचे सेवन तपासा.