How much Protein can you get for 100 Rupees : न्यूट्रिशन, फिटनेस आणि वेलनेससाठी प्रोटिनचे सेवन फायदेशीर मानले जाते. स्नायू वाढवण्यासाठी किंवा वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात प्रोटिनचा समावेश करणे गरजेचे आहे. नवी मुंबई येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ प्रतीक्षा कदम(Pratiksha Kadam) सांगतात, “प्रोटिन शरीराला अमिनो अॅसिड, हार्मोन्सच्या वाढीसाठी महत्त्वाचे घटक प्रदान करते. दूध, चिकन, अंडी आणि मासे यांमध्ये खूप जास्त प्रोटिन असते. मसूर, बीन्स, सोया पदार्थांमध्ये तसेच काजूमध्ये वनस्पती आधारित प्रोटिन असतात. शाकाहारी लोकांसाठी हे पदार्थ प्रोटिनचा चांगला स्त्रोत ठरू शकतात.
सामान्य माणसांसाठी पैसा हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि प्रोटिन स्वस्त मिळत नाही. किराणा बजेट टिकवून महागड्या प्रोटिनयुक्त पदार्थांची खरेदी करणे हा कधी न संपणारा संघर्ष वाटू शकतो, पण टेन्शन घेऊ नका; कारण आज आपण फक्त १०० रुपयांमध्ये प्रोटिन कसे मिळवायचे, हे जाणून घेणार आहोत.
१०० रुपयांमध्ये प्रोटिन कसे मिळवू शकता?
चेन्नईच्या प्रॅग्मॅटिक न्यूट्रिशन येथील मुख्य न्यूट्रिशनिस्ट मीनू बालाजी सांगतात की, लोकांना वाटतं की सप्लिमेंट्स हा प्रोटिन मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे आणि त्यांना हे कळत नाही की ते खूप महाग आहेत आणि प्रत्येकाला त्याची आवश्यकता नाही. १०० रुपयांमध्ये तुम्ही विविध पदार्थांद्वारे प्रोटिन मिळवू शकता.
बालाजी पुढे सांगतात, “जर तुम्ही बॉडीबिल्डिंगसाठी ट्रेनिंग घेत असाल तर तुम्हाला प्रोटिनची आवश्यकता जास्त भासेल. तुम्ही चिकन, मासे आणि अंड्याचा पांढरा भाग यांसारख्या स्रोतांमधून प्रोटिन घेऊ शकता. या पदार्थांचे सेवन तुम्ही एका ठराविक प्रमाणात तुमच्या दैनंदिन जीवनात करू शकता.”
त्या पुढे सांगतात की, व्हिटॅमिन डी मिळवणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे, कारण ते कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते, जे हाडांचे आरोग्य आणि विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. धान्य, फॅट्स आणि तेल, फळे आणि भाज्यांकडे कधीही दुर्लक्ष करू नयेत, कारण ते शरीराला ऊर्जा प्रदान करतात तसेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससुद्धा एकूण चांगल्या आरोग्यास प्रोत्साहन देतात.
बालाजी यांनी आणखी काही किफायतशीर प्रोटिन स्रोतांविषयी सांगितले –
१. दही
२. सोयाबीनचे तुकडे
३. भाजलेले चणे
४. मूग डाळ
५. बेसन
६. बाजरी
७. सातू
आपल्या नियमित आहारात प्रोटिन हा एक महत्त्वाचा घटक आहे, तरीसुद्धा बालाजी यांनी न्यूट्रिशनसाठी सर्व पदार्थांचे सेवन स्वीकारण्याचे महत्त्व सांगितले आहे. विविध गटांतील अन्न पदार्थांचा समावेश आहारात केल्याने संतुलित आहार घेता येतो आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते.