How Much Carbs are Okay To Eat In A Day: वजन कमी करायचंय? लगेच कार्ब्स बंद कर. केस गळतायत? कार्ब्स सोड यार, त्वचा खराब होतेय? याला कारण एकच कार्ब्स! सोशल मीडियावर कार्ब्सला अगदी राक्षसी रूप दिलंय. पण तुम्हाला माहित आहे का की दिवसभर आपल्याला शक्ती देण्यासाठी कार्ब्सच ऊर्जा प्रदान करतात. वय, लिंग, कामाची तीव्रता व वारंवारता आणि एकंदर आरोग्य या घटकांवर अवलंबून आपण दिवसभरात कार्ब्स किती प्रमाणात खायला हवेत यांचे प्रमाण बदलते. जी. सुषमा, क्लिनिकल आहारतज्ज्ञ, केअर हॉस्पिटल्स, बंजारा हिल्स, हैदराबाद यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितल्याप्रमाणे, “खाल्लेल्या कार्बोहायड्रेट्सच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे जास्त आवश्यक आहे. संपूर्ण किंवा प्रक्रिया न केलेले स्त्रोत हे सामान्यतः परिष्कृत आणि प्रक्रिया केलेल्या स्त्रोतांपेक्षा निरोगी असतात. अर्थात, वैयक्तिक गरजा भिन्न असू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जास्त कार्ब खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का?

जास्त कार्बोहायड्रेट खाणे, विशेषतः प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या स्वरूपात कार्ब्सचे सेवन करणे तुमच्या वजनाच्या वाढीला व लठ्ठपणाला कारणीभूत ठरू शकते. तसेच याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो. या प्रकारचे कार्ब्स ट्रायग्लिसराइड्सची (खराब कोलेस्ट्रॉल) वाढवून, एचडीएल (चांगला कोलेस्ट्रॉल) कमी करू शकतात ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका वाढतो. कार्बोहायड्रेट्सच्या अतिसेवनामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता आणि रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते, जे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढवणारे घटक आहेत. या अत्यंत गंभीर समस्या जरी आपण टाळल्या तरी अतिप्रमाणात कार्ब्सचे सेवन हे खालील समस्यांना सुद्धा वाढवू शकतात.

दातांच्या समस्या: साखरेच्या रूपात कार्बोहायड्रेटच्या अतिसेवनाने दातांच्या समस्या जसे की पोकळी आणि हिरड्यांचे आजार होऊ शकतात.

पचन समस्या: कार्ब्स काहींच्या बाबत पचनात अडथळा आणू शकतात. ज्यामुळे पोट फुगणे आणि अनियमित आतड्यांसंबंधी हालचाल जाणवू शकतात, याशिवाय एखाद्या विशिष्ट डाळ, भाजीची आपल्याला ऍलर्जी नाही ना हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे .

टाईप 2 मधुमेहाचा धोका: कार्ब्सयुक्त परिष्कृत (रिफाईंड) पदार्थांच्या आहारामुळे इन्सुलिन प्रतिरोधकता वाढू शकते आणि टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

हे ही वाचा<< किडनीतुन विषारी घटक बाहेर फेकण्यासाठी ‘हे’ ५ पदार्थ ठरतात सुपरफूड; शाकाहारी व मांसाहारी, दोन्ही पर्याय वाचा

एका दिवसात किती कार्ब्स खावेत?

कार्ब्सचे प्रमाण हे तुमच्या एकूण दैनंदिन कॅलरीजचा सेवनाच्या ४५ ते ६५ टक्के असावे. यामध्ये संपूर्ण धान्य (पोळ्या, भात) फळे आणि भाज्या (बटाटा) या कार्ब्सचा तसेच साखरेसारख्या साध्या कार्बोहायड्रेट्सचा सुद्धा समावेश असावा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How much rice roti sabji sugar to eat in a day to control carbs intake does carbohydrate cause heart diseases perfect portion control svs
Show comments