Brushing Tips: दात घासणे हे एक रुटिनच आहे. पण, तुम्ही कधी हा विचार केला आहे का की, दात घासताना विशिष्ट प्रमाणातच टूथपेस्ट वापरावी का? आणि ब्रश करण्यासाठी योग्य टेक्निक आहे का? याचबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही डॉ. सबद्राज अ‍ॅडव्हान्स्ड डेंटिस्ट्री सेंटरचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल सबद्रा यांच्याशी संपर्क साधला.

जास्त टूथपेस्ट वापरण्याचे धोके

डॉ. सबद्रा यांनी स्पष्ट केले

फ्लोराइडचा अत्यधिक वापर : प्रौढांमध्ये हे कमी होणारे असले तरी फ्लोराइड जास्त प्रमाणात वापरल्यामुळे विषबाधा होऊ शकते (उलटी, मळमळ किंवा अत्यधिक प्रमाणात घेतल्यास गंभीर परिणामही होऊ शकतात).

इनॅमल घासणे : जास्त टूथपेस्ट वापरल्याने इनॅमल घासले जाऊ शकते. विशेषत: जर दात घासताना जर हार्ड ब्रिसेल असणारा ब्रश वापरला जात असेल तर.

लहान मुलांसाठी

डेंटल फ्लोरोसिस : इनॅमल फॉर्मेशनच्या वेळेस जास्त प्रमाणात फ्लोराइड घेतल्याने दातांचा रंग बदलतो किंवा पांढरे डाग पडतात.

गिळण्याचा धोका : मुले टूथपेस्ट गिळू शकतात, ज्यामुळे फ्लोराईडचे सेवन सुरक्षित पातळीपेक्षा जास्त होऊ शकते.

किती प्रमाणात टूथपेस्ट वापरण्याची शिफारस केली जाते?

प्रौढांसाठी

शिफारस केलेले प्रमाण : वाटाण्याएवढी टूथपेस्ट.

का?

हे प्रमाण दात मजबूत करण्यासाठी आणि जास्त संपर्काचा धोका न घेता पोकळी रोखण्यासाठी पुरेसे फ्लोराइड प्रदान करते, असे डॉ. सबद्रा म्हणाले.

मुलांसाठी

३ वर्षांखालील : तांदळाच्या दाण्याएवढी टूथपेस्ट वापरा.

३ ते ६ वर्षे : वाटाण्याच्या दाण्याएवढी टूथपेस्ट वापरा.

बहुतांशी लहान मुलांना ब्रश करण्याची योग्य पद्धत माहीत नसते आणि ते चुकून टूथपेस्ट गिळू शकतात.

टूथपेस्ट कमी प्रमाणात वापरल्याने फ्लोरोसिसचा (दातांच्या विकासादरम्यान जास्त फ्लोराईड घेतल्याने उद्भवणारी स्थिती) धोका कमी होतो.

दातांच्या स्वच्छतेबद्दल महत्त्वाच्या गोष्टी

मुलांच्या ब्रशिंगवर लक्ष ठेवा : जोपर्यंत मुले (सहसा वयाच्या ६ वर्षापर्यंत) योग्यरीत्या थुंकू शकत नाहीत आणि तोंड नीट धुऊ शकत नाहीत तोपर्यंत पालकांनी मुलांच्या दात घासण्यावर लक्ष ठेवायला हवे.

फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट वापरा : दात किडण्यापासून रोखण्यासाठी फ्लोराइड आवश्यक आहे. मुलांसाठी वयानुसार टूथपेस्ट निवडून, हळूहळू फ्लोराइडचे प्रमाण कमी करा.

थुंका; धुऊ नका : मोठ्यांना आणि मुलांना दोघांनाही टूथपेस्ट थुंकण्यास प्रोत्साहित करा; परंतु ब्रश केल्यानंतर लगेच तोंड धुणे टाळा, जेणेकरून फ्लोराइड दातांवर जास्त काळ टिकून राहील.

जास्त ब्रशिंग करणे टाळा : दिवसातून दोनदा ब्रश पुरेसे आहे. जास्त ब्रशिंग केल्याने दातांवरील संरक्षक मुलामा (इनॅमल) निघून जाण्याचा धोका असतो) आणि हिरड्या खराब होऊ शकतात.

नियमित दंतचिकित्सकांना भेटी : नियमित तपासणीमुळे दातांच्या आरोग्याचे निरीक्षण करण्यास आणि योग्य तोंडाची स्वच्छता राखण्याच्या पद्धती सुनिश्चित करण्यास मदत होते.