Health Special बऱ्याचदा आमच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक प्रश्न विचारतात की, मी रोज किती पाणी पिऊ? पाणी पिणे ही नेहमीचीच गोष्ट असली तरी सुदृढ किंवा रुग्णाने दररोज किती पाणी प्यावे, हे समजून घेणे आवश्यक आहे. शरीर टिकवण्यासाठी पाणी हा मूलभूत घटक असून, विविध शारीरिक कार्यांमध्ये तो महत्त्वाची भूमिका बजावतो.

पाणी पिण्याचे प्रमाण

सर्वसामान्य शिफारस अशी आहे की, दिवसातून सुमारे आठ ग्लास (२५० एमएलचा एक ग्लास) पाणी प्यावे, जे अंदाजे दोन लिटर किंवा अर्धा गॅलन असते. तथापि, वय, वजन, काम करण्याची पातळी आणि हवामान यासारख्या घटकांवर आधारित वैयक्तिक पाण्याची आवश्यकता बदलू शकते. एखाद्याने किती पाणी प्यावे, हे वय आणि स्त्री की पुरुष या प्रमाणे बदलते. सात ते १२ महिन्याच्या बाळाला दिवसा ०.८ लिटर पाण्याची आवश्यकता असते. ते दूध, इतर द्रव पदार्थ किंवा पाणी यातून घेतले जाते. एक ते तीन वयोगटातील बालकाला दिवसाला १.३ लिटर पाणी लागते. चार ते आठ वर्षे वयोगटातील मुलासाठी १.७ लीटरची आवश्यकता असू शकते. जेव्हा मुले नऊ वर्षांची होतात तेव्हा लिंगानुसार पाण्याची आवश्यकता बदलते. ९- १३ वयोगटातील मुलाला दिवसाला २.४ लिटर पाणी लागते आणि त्याच वयाच्या मुलीला २.१ लिटर पाणी लागते. १४- १८ वर्षे वयोगटातील पौगंडावस्थेतील मुलांना दिवसाला ३.३ लिटर आणि मुलींना २.२ लिटर आवश्यक असते.

attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम

हेही वाचा : उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे? जाणून घ्या, मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे फायदे

उन्हाळ्यात अधिक गरज

१९- ७० वयोगटातील प्रौढांना पुरुष आणि महिलांसाठी अनुक्रमे ३.७ आणि २.७ लिटर आवश्यक आहे. याशिवाय, गरोदर मातेसाठी दररोज ३ लिटर पाण्याचा वापर होतो. हे सर्वसाधारण शरीरयष्टी असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. सरासरीपेक्षा जास्त किंवा कमी वजन असलेल्या व्यक्तींना वजना प्रमाणे जास्त – कमी पाणी लागते. रोजच्या पाण्याच्या गरजेचा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे हवामान व ज्या परिस्थितीत आपण काम करतो, ते वातावरण. खेळताना, उन्हामध्ये काम करताना किंवा ट्रेकिंगला जास्त पाणी लागते. उन्हाळ्यात जिथे खूप गरम कोरडी हवा असते तिथे उदाहरणार्थ – नागपूर – इथे जास्त पाणी आवश्यक असते. उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे घाम येणे वाढू शकते आणि जास्त पाणी कमी होऊ शकते, ज्यामुळे द्रवपदार्थाचे जास्त सेवन करणे आवश्यक आहे.

हिमालयात अधिक गरज

थंडीमध्ये किंवा दमट हवेमध्ये पाणी कमी प्यावे लागते. जेव्हा आपण हिमालयात जास्त उंचीवर ट्रेक करायला जातो तेव्हा जास्त पाणी प्यावे. ह्या मुळे रक्ताभिसरण चांगले होऊन altitude sickness (ऊंचीमुळे मेंदूचा रक्तपुरवठा कमी होणे व त्यामुळे विविध लक्षणे दिसणे) होण्याची शक्यता कमी होते. संध्याकाळी आमच्या ट्रेकमध्ये नेहमीच छोटा मग भरून बोर्नविटा किंवा गरम पाणी प्यायला लावत असतं ते ह्याचमुळे.

हेही वाचा : रोज नाश्त्यामध्ये आंबा खाणे फायद्याचे की तोट्याचे? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला वाचाच

प्रवासातही पाणी प्या

तुम्ही दिवसाचा जास्त काळ एअर कंडिशनमध्ये काम करत असाल तर व आद्रता योग्य असेल तर पाणी कमी लागते. वातानुकूलित वातावरणात काम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या द्रव पदार्थाच्या गरजा कमी करू शकतात. डेस्कवर पुन्हा वापरण्यायोग्य पाण्याची बाटली ठेवणे दिवसभर नियमितपणे पाणी पिण्याची आठवण म्हणून कार्य करू शकते. प्रवासात देखील पाणी जास्त प्यावे. तुम्हाला किती तहान लागते व लघवी होते या वर पाणी प्यायचे ते ठरवावे. मुले, वृद्ध प्रौढ आणि विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती असलेल्या व्यक्तींमध्ये हायड्रेशनची आवश्यकता भिन्न असू शकते. मोठ्या लठ्ठ व्यक्तींना योग्य हायड्रेशन पातळी राखण्यासाठी सामान्यत: जास्त पाण्याची आवश्यकता असते.

क्रीडापटूंसाठी आवश्यक

शारीरिक काम करणारे आणि व्यायामामुळे शरीराच्या पाण्याची गरज वाढते. अॅथलीट आणि कठोर शारीरिक क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींनी घामाद्वारे द्रव पदार्थाचे नुकसान भरून काढण्यासाठी अतिरिक्त पाणी प्यावे. बऱ्याचदा मोठी प्रशिक्षण सत्रे किंवा स्पर्धांदरम्यान घामातून गमावलेल्या इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करण्यासाठी सरबते, स्पोर्ट्स ड्रिंक्स वापरतात. अशा वेळी पाण्याबरोबर लघवीच्या रंगाचे निरीक्षण केल्यानेही हायड्रेशन स्थितीबद्दल अंदाज येतो. फिकट पिवळा मूत्र सामान्यत: पुरेसे हायड्रेशन दर्शविते, तर गडद मूत्र डिहायड्रेशनचे संकेत देऊ शकते.

हेही वाचा : Health Special: डिमेन्शियाच्या रुग्णांवर कसे व किती प्रकारचे उपचार केले जातात?

ज्येष्ठ व्यक्ती

वृद्ध प्रौढांमध्ये तहान संवेदना कमी होऊ शकते, ज्यामुळे ते डिहायड्रेशनसाठी अधिक संवेदनशील होतात. त्यांना नियमितपणे पाणी पिण्यास प्रोत्साहित करणे आणि फळे आणि भाज्या यासारख्या हायड्रेटिंग पदार्थांचे सेवन करणे डिहायड्रेशन टाळण्यास मदत करू शकते. एखाद्या व्यक्तीला जास्त तहान लागत असेल, जास्त लघवी होत असेल व जास्त भूक येत असेल तर डॉक्टरकडे जाऊन मधुमेह आहे का हे प्रथम बघितले पाहिजे. यकृताचे आजार, मूत्रपिंडचे आजार या मध्ये पाणी कमी प्यावे व डॉक्टरांच्या सल्याने दिवसा १ – १.५ लिटर पर्यंतच पाणी प्यावे.

गूळ आणि पाणी

पूर्वीच्या काळी कोणी आपल्या घरी आले की ,पाण्याचा गडू व गूळ देत असत. चालत आलेल्या व्यक्तीला पाणी, ऊर्जा व क्षार या तीनही गोष्टी यातून मिळायच्या. ह्या पारंपरिक रुढीमध्ये शास्त्रीय आधार नक्कीच आहे. शेवटी, एखाद्याने किती पाणी प्यावे हे समजून घेण्यासाठी वय, वजन, कामाची पातळी आणि पर्यावरणीय परिस्थिती यासारख्या विविध घटकांचा विचार करणे समाविष्ट आहे. आवश्यक असेल तर तेवढेच पाणी पिऊन पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच पाण्याचा तुटवडा अनेक ठिकाणी असतो. तेव्हा वैयक्तिक गरजेनुसार व तहान या सारखे शारीरिक संवेदना समजून पाण्याचा योग्य वापर केला तर सर्वांना आवश्यक ते पाणी मिळू शकेल. हे आपले सामाजिक कर्तव्य आहे व ह्याचे आपण सामाजिक बांधिलकी म्हणून पालन केले पाहिजे.

हेही वाचा : सफरचंदाचा रस दारू इतकाच घातक असतो? काय सांगतात तज्ज्ञ एकदा घ्या समजून….

पाणी जपून वापरा करा बचत नेहमी, तर कधी ना होणार कुणालाच पाणी कमी…
जल म्हणजे जीवन याचे ठेवू सर्व भान, अपव्यय होऊ नये याचे नित्य ठेवू ध्यान.
-उमा पाटील