हिवाळा हा आपल्याप्रमाणेच पाळीव प्राण्यांसाठीही आव्हानात्मक असू शकतो. थंडी वाढल्याने अगदी नेहमीची अंघोळ करणेदेखील अत्यंत कठीण वाटू शकते. त्यामुळे अनेक जण थंडीत एकावर एक स्वेटर घालतात आणि काही लोक अंघोळ न करता, परफ्युम्स वापरतात. पण, थंडीचा आपल्या पाळीव प्राण्यांच्या अंघोळीच्या दिनचर्येवर कसा परिणाम होतो? हे जाणून घेण्यासाठी Indianexpress.com ने थंडीच्या महिन्यांत पाळीव प्राण्यांची स्वच्छता राखण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नईच्या ईस्ट कोस्ट पेट हॉस्पिटलमधील डॉ. रचना यांनी कुत्र्यांना महिन्यातून एकदा किंवा हिवाळ्यात अगदी आवश्यक असेल तेव्हाच अंघोळ घालण्याची शिफारस केली. “थंड हवामानामुळे त्यांची त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे वारंवार अंघोळ करणे अनिष्ट ठरते. त्यांना स्वच्छ ठेवण्याचा आणि त्यांचे आरोग्य राखण्यासाठी नियमित घासणे हा एक चांगला मार्ग आहे,” असे त्यांनी सांगितले.

डॉ. रचना यांनी, “जास्त प्रमाणात अंघोळ केल्याने त्यांच्या त्वचेतून नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे व रुक्षपणा येतो. अशा स्थितीत पाळीव प्राणी अस्वस्थ होतात.”

SAVET या अॅनिमल बिझनेस युनिटचे हेड महेंद्र ग्रोव्हर यांनी, पाळीव प्राण्यांना पंधरवड्याने अंघोळ घालण्याचा सल्ला दिला किंवा त्यांच्या त्वचेचे आरोग्य जपताना त्यांची स्वच्छता राखण्यासाठी आठवड्यातून एकदा पाणी न वापरता, त्यांची साफसफाई (Dry Bath) करण्याचा सल्ला दिला.
“माणसांप्रमाणे पाळीव प्राण्यांची त्वचा पातळ असते आणि त्यामुळे त्यांचे संरक्षणात्मक कवच गमावण्याची अधिक शक्यता असते,” असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा –नाश्ता किंवा रात्रीचे जेवण न करणे; उपवास करण्याची कोणती पद्धत तुमच्या आरोग्यासाठी आहे उत्तम?

कार्निवेलचे बिझनेस हेड जे. एस. रामकृष्ण यांच्या मते, “जास्त प्रमाणात अंघोळ केल्याने पाळीव प्राण्याचे थंड हवामानापासून नैसर्गिक संरक्षण कमकुवत होऊ शकते.”

“जर पाळीव प्राण्याची त्वचा खूप कोरडी झाली किंवा फर त्याचे इन्सुलेट गुणधर्म गमावत असेल, तर त्यांना सर्दी होऊ शकते किंवा ते त्वचेच्या संसर्गास अधिक संवेदनक्षम होऊ शकतात. हिवाळ्यात डेहराडून आणि मुंबईसारख्या प्रदेशांमध्ये विशेषतः हवेत आर्द्रता असते आणि जास्त अंघोळ केल्याने पाळीव प्राणी थंड वारे आणि हवामानाच्या परिस्थितीला असुरक्षित बनवू शकतात,” ते म्हणाले.

हेही वाचा –आले-लिंबाचे पाणी खरंच यकृताच्या आरोग्यासाठी योग्य आहे का? शरीरावर कसा होतो परिणाम?

हिवाळ्यात प्राण्यांची अशी घ्या काळजी

डॉ. रचना यांनी हिवाळ्यात पाळीव प्राण्यांच्या काळजीसाठी सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे :

  • तापमानाचे निरीक्षण करा : अत्यंत थंड किंवा वादळी परिस्थितीत कुत्र्याला चालण्यासाठी घेऊन जाणे टाळा.
  • स्वेटर वापरा : छोट्या केसांच्या प्राण्यांना चालताना कोट किंवा स्वेटर घाला; ज्याचा त्यांना फायदा होऊ शकतो.
  • पंजे संरक्षित करा : पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षित डी-आयसिंग उत्पादने किंवा बुटीज वापरा; जेणेकरून त्यांचे पंजे मीठ आणि रसायनांपासून संरक्षित राहतील.
  • चालल्यानंतरची काळजी : शीत प्रदेशात बाहेर चालून आल्यानंतर पायांना बर्फ लागला असेल किंवा इतर ठिकाणी दवामुळे पाय ओले झाले असतील, तर तो ओलसरपणा काढून टाकण्यासाठी टॉवेलने त्यांचे पंजे पुसून टाका.
  • उबदारपणा : घरामध्ये आरामदायी, उबदार अंथरुणाची सोय करा.
  • आहार : हिवाळ्यात उर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या अन्नाचे प्रमाण थोडे वाढविण्याचा विचार करा.
  • अँटीफ्रिज एक्स्पोजर टाळा : अँटीफ्रिज उत्पादने प्राण्यांपासून दूर ठेवा. कारण- ती चूकूनही त्यांनी खाल्ल्यास त्यांच्यासाठी ती अत्यंत विषारी ठरू शकतात.
  • सर्दीची लक्षणे ओळखा : थरथर कापणे, रडणे, आळस किंवा बाहेर पाऊल ठेवण्याची अनिच्छा यांसारखी लक्षणे ओळखा.
मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How often should you bathe your pets in winter experts weigh in snk