गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये फिजिओथेरपीचा आवाका अतिशय मोठा आहे. पुढील कारणांमुळे गुडघ्याच्या ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये फिजिओथेरपीकडे एक holistic treatment म्हणजेच समग्र उपचार म्हणून पद्धती म्हणून बघितल गेलं पाहिजे. सौम्य आणि मध्यम प्रकारच्या ऑस्टिओआर्थरायटिसवर फिजिओथेरपी या तत्वांवर काम करते.
⦁ पेशंट एज्युकेशन आणि पेन एड्युकेशन: मागच्या दोन भागात आपण ऑस्टिओआर्थरायटिसबद्दल पूर्ण माहिती त्याच्या टप्प्यांसहित समजून घेतली. फिजिओथेरपिस्ट, रूग्णाला ही माहिती त्याला समजेल अशा भाषेत उदाहरणांसहित समजावून देतात, यामुळे रुग्णाच्या मनातील गैरसमज दूर होतात, भीती कमी होते, आणि आपल्याला नक्की काय झालंय हे कळल्यामुळे पुढचा प्रवास सोपा होतो. गुडघ्यामधे वेदना का होते आहे, होणार्या वेदनेवर कसे उपाय करता येतील, आपला या वेदनेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला हवा असे अनेक पैलू यातून उलगडतात.
⦁ मसल स्ट्रेन्थ वाढवणं :यामध्ये गुडघ्याच्या आणि खुब्याच्या आजूबाजूच्या स्नायूंची शक्ती वाढवणारे व्यायाम रूग्णाला शिकवले जातात. बर्याच वेळा रुग्णांना मसल स्पेसिफिक व्यायाम आणि शारीरिक हालचाल या वेगळ्या गोष्टी आहेत हे माहिती नसतं. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये जितकी गरज ही शारीरिक हालचालीची असते तितकीच मसल स्पेसिफिक व्यायामांचीहि असते. मनाने केले जाणारे योगासनाचे प्रकार किंवा हालचाली या फिजिओथेरपिस्टने शास्त्रीय दृष्टिकोनातून ठरवून दिलेल्या व्यायामांची जागा घेऊ शकत नाहीत. आपल्याला गुडघ्याचा त्रास असताना खुब्याच्या स्नायूंचे व्यायाम करण्याची काय गरज हा ही प्रश्न रुग्णांना पडतो. आपल्या शरीरातील स्नायू हे कायनेटिक चेनने एकमेकांशी जोडलेले असतात, त्यामुळे फक्त गुडघ्याच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित न करता प्रभावीपणे खुब्याच्या आजूबाजूचे स्नायू किंबहुना बर्याच वेळा पोटाच्या स्नायूंचा म्हणजेच कोर मसल्सचा ही समावेश शक्ती वाढवण्याच्या यादीत करावा लागतो.
आणखी वाचा: Health Special: ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय?
⦁ एरोबिक व्यायाम : यामध्ये रूग्णाला अनुसरून चालणं, सायकल चालवणं किंवा शक्य असेल तेव्हा स्विमिंग करणं असे व्यायाम प्रकार त्यांच्या कालावधी आणि तीव्रतेनुसार शिकवले सांगितले जातात. हे जनरल बॉडी एक्सरसायजेस असतात ज्यामुळे वजन कमी होणं, हृदयाची क्षमता वाढणं, वेदनेची तीव्रता कमी होणं, मूड सुधारणा असे फायदे दिसून येतात. हे रूग्णाला अनुसरून असल्याने यामध्ये व्यक्तीगणिक भिन्नता असते, विशेषकरून चालण्याचा व्यायाम हा वजन घेण्याचा म्हणजेच वेट बेयरिंग व्यायाम असल्याने याबद्दलचा निर्णय हा गुडघ्यांची परिस्थिती बघून ओरथोपेदिक आणि फिजिओथेरपिस्ट यांचा संयुक्त निर्णय असतो.
⦁ मसल स्ट्रेचिंग
ज्याप्रकारे गुडघ्याच्या आणि खुब्याच्या आजूबाजूच्या स्नायूंची शक्ती वाढवणारे व्यायाम सांगितले जातात त्याचप्रमाणे यापैकी काही स्नायूंना ताण देणारे व्यायाम देखील आवश्यक असतात, शक्ती वाढवणारे आणि लवचिकता वाढवणारे व्यायाम हे एकमेकांना परस्पर पूरक असतात. कुठल्या स्नायूंना बळकटी वाढवण्याच्या व्यायामांची गरज आहे आणि कोणत्या स्नायूंना लवचिकता वाढवणार्या व्यायामांची गरज आहे हे ओळखून त्यानुसार व्यायाम ठरवले जातात.
⦁ जीवनशैलीतील बदल : आपला आहार, झोप, विचार, वजन, सवयी या गुडघ्यामध्ये होणार्या वेदनेवर कसा आणि कुठपर्यंत परिणाम करू शकतात, आणि यात सुधारणा करण्यासाठी कोणते बदल करायला हवे याची सखोल माहिती रूग्णाला दिली जाते.
आणखी वाचा: Health Special: आर्थरायटिस आणि वेदना
⦁ तोल आणि चपळता वाढवणारे व्यायाम
गुडघ्याचा ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये या व्यायामांची काय गरज असा प्रश्न रुग्णांना पडणं स्वाभाविक आहे पण त्यांच्या रोजच्या आयुष्यातील चालणं, पायर्या कुठल्याही आधाराशिवाय चढणं आणि उतरणं, उठबस करणं, हातात वजन उचलून चालणं, या आणि अशा अनेक हालचाली सुलभ आणि आत्मविश्वासपूर्ण होण्यासाठी या व्यायामांची नितांत गरज असते. हे सगळे उपचार सौम्य आणि मध्यम टप्प्यात करायचे व्यायाम आहेत.
तिसर्या टप्प्यात म्हणजेच तीव्र टप्प्यात जिथे रुग्ण हे नी रिप्लेसमेंट ऑपरेशन साठी जाणार आहे या टप्प्यात देखील फिजोथेरपीचं महत्व तितकंच आहे.
यात रूग्णाला ऑपरेशन आधी करायचे व्यायाम म्हणजेच प्रीहाबीलीटेशन आणि ऑपरेशन नंतर करायचे म्हणजेच रीहॅबिलिटेशन अशा दोन टप्प्यात फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करण आवश्यक आहे.