Cinnamon In Tea Benefits: पावसाळ्यात चहा म्हणजे अनेकांसाठी अमृततुल्य मानला जातो. भारतीयच नव्हे तर जगभरातील चहाप्रेमींची संख्या ही मोजता येण्यापलीकडे आहे. पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीची एक गडद बाजू असतेच. तसंच चहाला जोडून अनेक त्रास उद्भवण्याचा धोका असतो. डायबिटीज रुग्णांना तर चहा हा वर्ज्यच करण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, चहा बनवण्याची पद्धत व त्यासाठी वापरले जाणारे साहित्य जर आपण नीट निवडले तर आरोग्याला नुकसान न पोहोचवता सुद्धा आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवू शकता. अमृता हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ डॉ. चारू दुआ यांनी याविषयी माहिती दिली आहे. चहामध्ये दालचिनी टाकल्यास मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होत असल्याचे दावे अनेकजण करतात पण यात खरोखर तथ्य आहे का हे पाहूया..

Cinnamomum वंशाच्या झाडाच्या आतील सालापासून दालचिनी मिळते जी विशेषतः स्वयंपाक आणि बेकिंगमध्ये वापरली जाते. पारंपारिक आयुर्वेदामध्ये, दालचिनीचा अर्क संधिवात, अतिसार, मासिक पाळीची अनियमितता आणि दाहक रोगांसारख्या आजारांवर उपचार म्हणून प्रसिद्ध आहे. दालचिनीमध्ये सीरम लिपिड आणि रक्तातील ग्लुकोज कमी करण्याची क्षमता असल्याने याचे महत्त्व विशेष वाढले आहे. दालचिनीचे बायोएक्टिव्ह कंपाऊंड रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते. मात्र रक्तातील साखर लक्षणीयरीत्या कमी करण्यास दालचिनीची मदत होते हे सिद्ध करण्यासाठी आंकजी अभ्यास होणे गरजेचे आहे.

5 superfoods that can help prevent clogged arteries
रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून खा हे पाच सुपरफूड! तज्ज्ञांचा सल्ला
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
Pear For Gut Health
Benefits Of Pear Fruit: पेर फळ रोज खाल्ल्यानं कोणते आरोग्यदायी फायदे मिळतात? जाणून घ्या
RRC NCR Apprentice Recruitment 2024: Apply for 1679 posts at rrcpryj.org know how to apply
RRC NCR Recruitment 2024: रेल्वेत १६७९ रिक्त पदांची भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Review of collaborative filtering technology
कुतूहल : आवडीतील साधर्म्यानुसार शिफारस
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा

दालचिनी रक्तातील साखरेवर कसे कार्य करते?

२०१२ च्या अभ्यासात चीनमधील टाइप २ मधुमेह असलेल्या ६९ रुग्णांचे निरीक्षण करण्यात आले. एका गटाने दररोज १२० मिलीग्राम दालचिनी, दुसऱ्या गटाने ३६० मिलीग्राम दालचिनीचे सेवन केले तर तिसऱ्या गटाने दालचिनी टाळली. तीन महिन्यांनंतर, दालचिनी टाळणाऱ्या गटात कोणताही बदल दिसला नाही, तर दालचिनी घेत असलेल्या दोन गटांमध्ये A1C पातळी कमी केली होती. २०१३ मध्ये, १० प्रतिनिधींवर झालेल्या अभ्यासात असे आढळून आले की दालचिनीचे सेवन केल्याने ग्लूकोज, एकूण कोलेस्ट्रॉल, LDL आणि ट्रायग्लिसराइड्समध्ये ‘लक्षणीय’ घट झाली आहे. यामुळे HDL किंवा चांगले कोलेस्टेरॉल वाढण्यास देखील मदत झाली होती. परंतु प्रत्येक अभ्यासात दालचिनीचा प्रकार वेगळा असल्याचे संशोधकांनी नमूद केले. २०१९ च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ३ ते ६ ग्रॅम दालचिनीचे सेवन रक्ताच्या विशिष्ट गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम दर्शवत होते .

अन्य एका अभ्यासात, १ ग्रॅम दालचिनी पावडर १२ आठवडे घेतल्याने टाइप २ मधुमेहाच्या रूग्णांच्या रिकाम्या पोटी रक्तातील ग्लुकोजचे आणि ग्लायकोसिलेटेड प्रमाण कमी , तर सीरम ग्लूटाथिओन आणि एसओडीची पातळी वाढल्याचे दिसून आले होते. दालचिनी ही यामुळेच एक अँटीडायबेटिक आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध पारंपरिक औषधी मसाला म्हणून ओळखली जाऊ लागली.

काही अभ्यासात असे आढळून आले आहे की दालचिनी हिमोग्लोबिन A1c देखील कमी करू शकते, जो दीर्घकालीन रक्तातील साखर नियंत्रणाचा एक उपाय ठरू शकतो. तब्ब्ल ८४ प्रतिनिधींवर झालेल्या अभ्यासात असे दिसून आले, की दालचिनीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडेंटमुळे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि PCOS चा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.

आहारात दालचिनीचे सेवन कसे करावे?

दालचिनी विविध स्वरूपात वापरली जाऊ शकते. अगदी चहापासून ते भाज्या, बिर्याणी बनवण्यासाठी सुद्धा दालचिनी वापरता येऊ शकते. दालचिनीची पावडर सफरचंदाच्या फोडींवर किंवा स्मूदीमध्ये वापरून खाल्ल्यास हे एक चविष्ट कॉम्बिनेशन ठरते. शिवाय केक, कुकीज बेक करताना सुद्धा दालचिनी एक वेगळा गंध व चव देऊ शकते. दालचिनीचे सेवन योग्य प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे. दिवसाला साधारण अर्धा ते १ टीस्पून (3-5 ग्रॅम) दालचिनीचे सेवन हे योग्य ठरेल.

हे ही वाचा<< तुमच्या वयानुसार किती व कोणता व्यायाम करायला हवा? कमी- जास्त नकोच, ‘हा’ सोपा फिटनेस फंडा वाचा 

दालचिनीचे काही दुष्परिणाम आहेत का?

प्राण्यांवरील अभ्यासात दालचिनीच्या सेवनामुळे हेपेटोटोक्सिसिटी दिसून आली होती. जी सी कॅसियाच्या सालामध्ये आढळणाऱ्या कॉमरीन आयसोलॅट्समुळे, प्लेटलेटची संख्या कमी होणे, रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढणे, सीरममध्ये कमतरता येणे, एकूण कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडची सांद्रता आणि एचडीएल-सीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढणे व यामुळे ऍलर्जीची तीव्रता वाढणे असे त्रास निर्माण करू शकते. त्यामुळे यकृत संबंधित आजार असणाऱ्या रुग्णांनी, अँटीकोआगुलंट किंवा अँटीप्लेटलेट थेरपी घेणाऱ्यांनी, अँटीलिपिडेमिक असलेले रुग्ण किंवा ज्यांना ऍलर्जी आहे अशा सगळ्यांनी दालचिनीचे सेवन टाळायला हवे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, तुम्ही गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या)